CM Kisan Kalyan Yojana देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे राज्य तसेच केंद्र सरकार देखील वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतात अशाच प्रकारे मध्य प्रदेश राज्य शासनाने मुख्यमंत्री किसान कल्याण योजना शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे या योजनेची सुरुवात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी 2020 मध्ये सुरू केली होती
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि त्यांना शेतीसाठी आर्थिक मदत करणे हा होता या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी ४००० रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत हे २ हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत दर ६ महिन्याला एक हप्ता मिळणार आहे. पी एम किसान सन्मान निधी या योजनेचे ६००० रुपये आणि मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचे 4000 रुपये अशाप्रकारे एकूण दहा हजार रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार आहेत.
Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना
या योजनेचा पहिला हप्ता ५ जुलै 2024 ला जमा झालेला आहे आणि हा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही हे कशाप्रकारे चेक करायचे. या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र असतील यासाठीचे अर्ज प्रक्रिया कागदपत्रे तिचा उद्देश काय आहे याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आम्ही दिलेली आहे तरी ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी
The CM Kisan Kalyan Yojana is a scheme aimed at improving the financial condition of farmers in Maharashtra. In this program, eligible farmers receive ₹10,000 annually, and the first installment can be checked by verifying your name in the list. The initial deposit for this scheme was made on 5th July 2024, and you can confirm if it has been credited to your bank account. The main objective of the CM Kisan Kalyan Yojana is to make farmers self-reliant by utilizing new technology for agricultural development and improving their economic situation. Under this scheme, eligible farmers from the lower and middle-income groups in Madhya Pradesh receive ₹4,000 annually, which is an addition to the benefits provided by the PM Kisan Samman Nidhi Yojana. Therefore, farmers benefiting from the PM Kisan Samman Nidhi Yojana are also eligible for the CM Kisan Kalyan Yojana.
मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा उद्देश
मध्यप्रदेश राज्यातील शेती व्यवसाय प्रमुख उद्योग धंदा बनविणे शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे उद्देशाने तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे
मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेअंतर्गत मध्य प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी ४००० रुपये मिळणार आहे या योजनेचा लाभ गरीब व मध्यम वर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला जोडलेली आहे त्यामुळे जे शेतकरी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत ते शेतकरी मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेसाठी ही पात्र असतील.
Mukhymantri Kisan Kalyan Yojana 2024 overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री किसान कल्याण योजना |
राज्याचे नाव | मध्य प्रदेश |
उद्देश | शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे |
लाभार्थी | मध्यप्रदेश राज्यातील शेतकरी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
ऑफिशियल वेबसाईट | https://saara.mp.gov.in/ |
मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचे फायदे
मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी ४०००रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे ही मदत राज्यातील शेतकऱ्यांना दर सहा महिन्याला 2000 अशा दोन टप्प्यात दिली जाणार आहे
या योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान सन्मान निधीचे ६०००रुपये असे एकूण १०००० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे.मध्यप्रदेश राज्य सरकार या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेत जमा करणार आहेत.
Mukhymantri Kisan Kalyan Yojana eligibility
- लाभार्थी हा मध्य प्रदेश राज्यातील मूळ रहिवासी असावा.
- तो शेतकरी असायला पाहिजे अर्जकर्ता पी एम किसान सन्माननिधी योजनेद्वारे रजिस्टर असायला पाहिजे
- अर्ज करता जवळ स्वतःची शेती असायला पाहिजे व तो त्यावर शेती करत असायला पाहिजे
- अर्ज करण्याची वय 18 वयापेक्षा जास्त असावे
- या योजनेचा लाभ फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे
- अर्जकत्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नसावे
- तो शासकीय नोकरीत नसावा
ही योजना देखील बघा पीएम किसान सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती
Mukhymantri Kisan Kalyan Yojana document
शेतकरी मित्रांनो आपल्याला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे यासाठी जे काही महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत ते खालील प्रमाणे आहेत
- मूळ रहिवासी दाखला
- पी एम किसान सन्मान निधी रजिस्ट्रेट नंबर
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- किसान क्रेडिट कार्ड
- पॅन कार्ड
Mukhymantri Kisan Kalyan Yojana ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची
- आपल्याला राज्य शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे
- त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेच्या पर्यायावरती क्लिक करायचे आहे
- त्यानंतर आपल्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल यावरती आपल्याला मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे
- तो फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे या फॉर्म ला जोडून घ्यायचे आहे
- मग ते कागदपत्रे आपल्याला गावातील ग्रामसेवकाकडे जमा करायचे आहे
- मग तो आपले कागदपत्रे तपासून मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तपासून घेईल
- अशाप्रकारे आपण मध्य प्रदेश सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊ शकता.
ही योजना पहा नमो शेतकरी योजना
मुख्यमंत्री किसान कल्याण योजना लाभार्थी यादी कशी चेक करायची? How to check chief minister Kisan Kalyan Yojana beneficiary list?
CM Kisan Kalyan Yojana चा पहिला हप्ता 5 जुलै म्हणजे शुक्रवारी दिला गेला आहे जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सीएम किसान कल्याण योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आहे की नाही हे चेक करायचे असेल तर ते तुम्ही खालील प्रमाणे चेक करू शकता तिथे तुम्हाला माहिती सांगितली आहे
- तुम्हाला सर्वात पहिले ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे https://saara.mp.gov.in/saaraweb/publicreport/pmKisanReport.aspx
- या वेबसाईटवर आल्यानंतर beneficiary list या पर्यायावर क्लिक करा.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज येईल त्यावर आपले राज्य जिल्हा गाव सलग करून टाका
- आता गेट रिपोर्ट वर क्लिक करा
- अशाप्रकारे आपल्यासमोर CM Kisan Kalyan Yojana beneficiary list ओपन होईल व त्या मध्ये आपले नाव तुम्ही चेक करू शकता.
मुख्यमंत्री किसान कल्याण योजना काय आहे?
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री द्वारा शेतकऱ्यांना दरवर्षी चार हजार रुपये मिळतात ही योजना 2020 ला शिवराज सिंह यांनी सुरू केली होती.
या योजनेद्वारे किती पैसे जमा होणार आहेत?
या योजनेद्वारे दरवर्षी चार हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये दर सहा महिन्याला जमा होणार आहेत
मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार आहे?
या योजनेचा पहिला हप्ता 5 जुलै 2024 ला जमा झालेला आहे