महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय ! आता कर्मचाऱ्यांना…unified pension scheme 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

unified pension scheme 2024 :केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला. ही नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस स्कीम पुढील वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.

युनिफाईड पेन्शन योजना 2024 कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये होणार 18.5 टक्के वाढ unified pension scheme 2024

युनिफाईड पेन्शन योजना वर्ष 2025 -2026 मध्ये लागू करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्टला UPS युनिफाईड पेन्शन योजना यास मान्यता दिली आहे

दरम्यान, केंद्राच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे.

या योजनेअंतर्गत 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि राज्य सरकारने ही योजना सुरू केल्यास जवळजवळ 90 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे

बांधकाम कामगारांवर पैशाचा पाऊस कामगारांना मिळणार 6 लाख रुपये Bandhkam kamgar Yojana 2024 benifits

2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे. मात्र ही नवीन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून यामध्ये पेन्शनची कोणतीच गॅरंटी नसल्याने ही योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी योजना लागू करावी अशी मागणी होती. राज्याप्रमाणेच केंद्रातही अशीच मागणी जोर धरत होती.

दरम्यान केंद्रातील सरकारने यावर तोडगा काढत युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याची मोठी घोषणा केली. यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य सरकारने देखील हीच योजना राज्य कर्मचाऱ्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतलाय.

महाराष्ट्र हे केंद्रातील युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे पहिले राज्य ठरले. दरम्यान आता याच संदर्भात राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2024 ! या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 18 व्या हप्त्याचे 4000 रूपये

म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना ही नवीन पेन्शन स्कीम लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, काही कर्मचाऱ्यांनी युनिफाईड पेन्शन स्कीमचा देखील विरोध केला आहे. यामुळे कर्मचारी संघटनांची या संदर्भात काय भूमिका राहते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

unified pension scheme 2024 काय आहे?

युनिफाईड पेन्शन योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आहे या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन देण्यात येणार आहे ही पेन्शन सरकारी कर्मचारी निवृत्त होण्या अगोदरच्या 12 महिन्याच्या काळामध्ये त्याला जो पगार होता त्याच्या 50 टक्के रक्कम टेन्शन म्हणून दिली जाणार आहे या योजनेचा फायदा फक्त ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोकरी केली आहे त्यांनाच मिळणार आहे.

माझा लाडका शेतकरी योजना शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये ladka shetkari yojana maharashtra online apply

युनिफाईड पेन्शन योजना केव्हा चालू होणार आहे?

युनिफाईड पेन्शन योजना ही 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे तोपर्यंत या योजनेच्या नियमा वलीवर काम केले जाणार आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे.

unified pension लाभ

  • या योजनेचा भार सरकारी कर्मचाऱ्यांवर पडणार नाही आधी सरकारी कर्मचाऱ्यांकडून दहा टक्के योगदान दिलं जात होतं त्याचप्रमाणे सरकार देखील दहा टक्के योगदान देत होतं
  • 2019 मध्ये सरकारने सरकारी योगदान वाढवून 14 टक्के केले होते आता युनिफाईड पेन्शन योजनेद्वारे ही योगदान वाढवून 18.5% केले जाणार आहे
  • त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेत NPS जायचे की युनिफाईड पेन्शन योजनेत Ups मध्ये जायचे याचे पर्याय उपलब्ध असतील असे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना आता शेतकऱ्यांचे होणार 2 लाखापर्यंत कर्ज माफ पहा योजना mahatma jyotiba phule karj mafi yojana list 2024

Unified pension scheme अटी

युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत किमान 25 वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर त्यांच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के एवढी पेन्शन दिली जाणार आहे. जर दहा वर्षे व त्याहून अधिक काळ सेवा दिलेली असेल तर रिटायरमेंट नंतर किमान दहा हजार रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे.

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर फॅमिली पेन्शन म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन पैकी 60% रक्कम त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे. सध्याच्या नवीन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन साठी कर्मचाऱ्यांना दहा टक्के आणि सरकारला 14% योगदान द्यावे लागते.

मात्र या युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत सरकारला 18% आणि कर्मचाऱ्याला दहा टक्के योगदान द्यावे लागणार आहे. नवीन पेन्शन स्कीम किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी कोणती तरी एकच पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांपुढे राहणार आहे.

UPS pension scheme पार्श्वभूमी

जुन्या पेन्शन योजनेनुसार सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम मासिक पेन्शन म्हणून दिली जात होती त्यामध्ये महागाई वाढीनुसार बदल देखील केले जात होते मात्र या पेन्शनचा भार सरकारच्या तिजोरीवर पडत होता त्यामुळे 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये namo mahasanman nidhi yojana maharashtra 2024

ज्यामध्ये सरकार सोबतच पेन्शनसाठी योगदान कर्मचाऱ्यांच्या पगारातून घेतले जात होते परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर अलीकडेच वाद निर्माण झाला होता

यातून सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी केली याद्वारे अनेक राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना सुरू देखील केली आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना ही सुरू केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment