unified pension scheme 2024:युनिफाईड पेन्शन योजना वर्ष 2025 -2026 मध्ये लागू करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्टला UPS युनिफाईड पेन्शन योजना यास मान्यता दिली आहे
देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर निवृत्ती वेतन खात्रीशीर कुटुंब निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
बांधकाम कामगारांवर पैशाचा पाऊस कामगारांना मिळणार 6 लाख रुपये Bandhkam kamgar Yojana 2024 benifits
या योजनेअंतर्गत 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि राज्य सरकारने ही योजना सुरू केल्यास जवळजवळ 90 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे
पेन्शन योजनेवर अनेक दिवसांपासून देशांमध्ये आंदोलने होत होती याचमुळे आता केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे
सुकन्या समृद्धी योजना!आता मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सरकार देणार खर्च बघा योजना काय आहे?
unified pension scheme 2024
युनिफाईड पेन्शन योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आहे या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन देण्यात येणार आहे ही पेन्शन सरकारी कर्मचारी निवृत्त होण्या अगोदरच्या 12 महिन्याच्या काळामध्ये त्याला जो पगार होता त्याच्या 50 टक्के रक्कम टेन्शन म्हणून दिली जाणार आहे या योजनेचा फायदा फक्त ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोकरी केली आहे त्यांनाच मिळणार आहे.
युनिफाईड पेन्शन योजनेतील तरतुदी खालील प्रमाणे आहेत
खात्रीशीर निवृत्ती वेतन
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी 25 वर्षे नोकरी केलेली आहे त्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती होण्यापूर्वी शेवटच्या एका वर्षात जेवढा पगार मिळायचा त्याच्या 50 टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे
खात्रीशीर किमान निवृत्तीवेतन
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी दहा ते पंचवीस वर्षे दरम्यान नोकरी केलेली आहे त्यांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे
खात्रीशीर कौटुंबिक निवृत्ती वेतन
एखाद्या वेळेस कर्मचाऱ्यांचा सेवेच्या दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या (पती किंवा पत्नीला) 60 टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे
नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता
महागाईनुसार मांडणी
कर्मचारी आणि कौटुंबिक निवृत्तीवेतन हे महागाईशी जोडले गेले आहे त्यामुळे महागाई वाढीनुसार कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखील बदल केले जाणार आहेत
ग्रॅज्युटीशिवाय नोकरी सोडल्यास एक रकमी रक्कम दिली जाईल
सेवानिवृत्त झाल्यावर, कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीसह एकरकमी वेतन मिळण्याचा अधिकार आहे. कर्मचाऱ्यांच्या दर सहा महिन्याच्या सेवेतील मूळ वेतन आणि महागाई भत्ता चा दहावा भाग या प्रमाणात हिशोब केला जाईल या रकमेचा कर्मचाऱ्यांच्या खात्रीशीर निवृत्तीवेतनावर परिणाम होणार नाही
युनिफाईड पेन्शन योजना का सुरू करण्यात आली?
जुन्या पेन्शन योजनेनुसार सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम मासिक पेन्शन म्हणून दिली जात होती त्यामध्ये महागाई वाढीनुसार बदल देखील केले जात होते मात्र या पेन्शनचा भार सरकारच्या तिजोरीवर पडत होता त्यामुळे 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती
ज्यामध्ये सरकारसोबतच पेन्शनसाठी योगदान कर्मचाऱ्यांच्या पगारातून घेतले जात होते परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर अलीकडेच वाद निर्माण झाला होता
यातून सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी केली याद्वारे अनेक राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना सुरू देखील केली आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना ही सुरू केलेली आहे
युनिफाईड पेन्शन योजनेचा लाभ
या योजनेचा भार सरकारी कर्मचाऱ्यांवर पडणार नाही आधी सरकारी कर्मचाऱ्यांकडून दहा टक्के योगदान दिलं जात होतं त्याचप्रमाणे सरकार देखील दहा टक्के योगदान देत होतं
2019 मध्ये सरकारने सरकारी योगदान वाढवून 14 टक्के केले होते आता युनिफाईड पेन्शन योजनेद्वारे ही योगदान वाढवून 18.5% केले जाणार आहे
त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेत NPS जायचे की युनिफाईड पेन्शन योजनेत Ups मध्ये जायचे याचे पर्याय उपलब्ध असतील असे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे
Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा
युनिफाईड पेन्शन योजना केव्हा लागू होणार आहे?
युनिफाईड पेन्शन योजना ही 1एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे तोपर्यंत या योजनेच्या नियमावलीवर काम केले जाणार आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय पेन्शन योजना
भारत सरकारने देशामध्ये पेन्शन क्षेत्रामध्ये विकास आणि विनिमय करण्यासाठी 10 ऑक्टोंबर 2003 रोजी पेंशन निधि विनियामक और विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) स्थापित केले होते
राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक जानेवारी 2004 पासून देशांमध्ये सुरू करण्यात आली होती सर्व नागरिकांना सेवानिवृत्तीचे उत्पन्न मिळावे या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली.
NPS चे उद्दिष्ट पेन्शन सुधारणांची स्थापना करणे आणि नागरिकांमध्ये सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देणे आहे.एनपीएस सुरुवातीला नवीन सरकारी भरतीसाठी (सशस्त्र दलांव्यतिरिक्त) सुरू करण्यात आले होते.
1 मे 2009 पासून स्वयंसेवी आधारावर असंघटित क्षेत्रातील कामगारांसह देशातील सर्व नागरिकांना NPS प्रदान करण्यात आले आहे.याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने सह-योगदान पेन्शन योजना स्वावलंबन योजना सुरू केली – बाह्य वेबसाइट जे केंद्रीय अर्थसंकल्प 2010-11 मध्ये एका नवीन विंडोमध्ये उघडते जे सेवानिवृत्तीसाठी असंघटित क्षेत्राद्वारे स्वयंसेवी बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी.
स्वावलंबन योजनेअंतर्गत – एका नवीन विंडोमध्ये उघडणारी बाह्य वेबसाइट, सरकार प्रत्येक NPS ग्राहकाला रु. 1000 ची रक्कम प्रदान करेल जे दरवर्षी किमान रु 1000 आणि कमाल रु 12000 चे योगदान देतात. ही योजना सध्या आर्थिक वर्ष २०१६-१७ पर्यंत लागू होती
जुनी पेन्शन योजना
अधिकृत वेतन संरचना (OPS) अंतर्गत, सार्वत्रिक वेतन संरचना (UPS) प्रमाणे, केंद्र आणि राज्य किंवा दोन्ही स्तरावरील सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेली पेन्शन त्यांच्या शेवटच्या काढलेल्या मूळ वेतनाच्या 50 टक्के निर्धारित केली जाईल.
Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
शिवाय, कंडक्टरच्या सतत वाढत असलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी, एक महागाई भत्ता (DA) समाविष्ट केला गेला असता, ज्याची गणना मूळ वेतनाचा एक भाग म्हणून केली गेली असती.म्हणून, प्रत्येक वेळी सरकार तुमचा महागाई भत्ता वाढवते, तेव्हा सरकार निवृत्तांच्या महागाई भत्त्यातही वाढ करते. नियमांनुसार, OPS हमी देते की सेवानिवृत्तीनंतर, एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराच्या 50% पेन्शन म्हणून मिळेल.
OPS मध्ये, सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) म्हणून ओळखली जाणारी एक यंत्रणा आहे, जी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग बाजूला ठेवण्यास सक्षम करते. संचित व्याजासह समान रक्कम त्यांच्या निवृत्तीनंतर हस्तांतरित केली जाईल.शिवाय, OPS अंतर्गत, कर्मचारी जास्तीत जास्त 20 लाख रुपयांच्या ग्रॅच्युइटी पेमेंटसाठी पात्र आहेत.
OPS द्वारे सुविधा दिलेली देय रक्कम सरकारी तिजोरीतून काढली जाते, हे सुनिश्चित करून पेन्शनचा निधी थेट सरकारद्वारे दिला जातो. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की OPS अंतर्गत पेन्शन योगदानाच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही कपात केली जात नाही.
निष्कर्ष
भारत सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासंदर्भात युनिफाईड पेन्शन योजनेला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिलेली आहे ही योजना 1 एप्रिल 2025 पासून देशांमध्ये लागू होणार आहे या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर 18.5% पेन्शन सरकारतर्फे दिले जाणार आहे
FAQ
2024 मध्ये युनिफाइड पेन्शन योजना काय आहे?
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी 25 वर्षे नोकरी केलेली आहे त्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती होण्यापूर्वी शेवटच्या एका वर्षात जेवढा पगार मिळायचा त्याच्या 50 टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे
युनिफाईड पेन्शन योजना देशामध्ये केव्हा लागू होणार आहे?
युनिफाईड पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 रोजी लागू होणार आहे
युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना किती टक्के पेन्शन मिळणार आहे
युनिफाईड योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाच्या 18.5% एवढी पेन्शन मिळणार आहे
युनिफाईड पेन्शन योजनेसाठी कोणते सरकारी कर्मचारी पात्र असणार आहे
जे सरकारी कर्मचारी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी नोकरीत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे