नवीन युगातील सर्वोत्तम सवारी! धडक डिझाइन आणि जबरदस्त सुरक्षा सुविधांसह TVS Jupiter CNG स्कूटर

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पेट्रोलच्या वाढत्या किमती पासून सुटका करून घ्यायचे असेल त्याच्यासाठी तुम्ही एक अशी सीएनजी बाईक शोधत असाल तर तुमच्यासाठी TVS Jupiter 125 CNG ही बाइक एक उत्तम पर्याय असणार आहे.TVS Motor Company कंपनीने या स्कूटरचे अनावरण भारतामध्ये केले आहे आणि ही बाईक लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार आहे. या स्कूटरमध्ये पेट्रोल सोबतच सीएनजी चे ऑप्शन देखील तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या पेट्रोलच्या खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे . अशाप्रकारे उत्कृष्ट मायलेज आणि परवडणाऱ्या खर्चामुळे ही स्कूटर बाजारामध्ये खूप लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया मग या स्कूटरची संपूर्ण माहिती सविस्तरपणे!

TVS Jupiter 125 CNG चे इंजिन

TVS Jupiter 125 CNG
TVS Jupiter 125 CNG

TVS Jupiter 125 CNG मध्ये 124.8cc का एयर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे जे तुम्हाला स्मूथ आणि दमदार प्रवासाचा अनुभव देतील. या इंजिनला अशाप्रकारे डिझाईन केले आहे की त्यामुळे तुम्ही सहजपणे पेट्रोल आणि सीएनजी यामध्ये बदल करू शकता त्यामुळे ग्राहकांना ही बाईक वापरताना लवचिकता मिळते.

TVS Jupiter 125 CNG चे वैशिष्ट्ये

या स्कूटरचे इंजिनच नाहीतर यामध्ये दिले जाणारे फीचर्स देखील दमदार आहेत.या स्कूटरमध्ये तुम्हाला LED हेडलाईट्स टेल लाईट दिलेले असल्यामुळे या स्कूटरला फॅन्सी लुक मिळतो.ही स्कूटर रात्रीला सुद्धा प्रवास करण्यास चांगला अनुभव देते.त्याचप्रमाणे या स्कूटरमध्ये ड्रम आणि डिस्क ब्रेक दोन्हीचे ऑप्शन दिल्यामुळे या स्कूटरची सुरक्षा अधिक वाढते. या स्कूटरमध्ये तुम्हाला 9.5 लिटर ची सीएनजी टाकी दिलेली आहे.

TVS Jupiter 125 स्कूटर ची किंमत आणि लॉन्च डेट

TVS बाईक निर्मात्या कंपनीने या स्कूटरची अधिकृत किंमत अजून तरी जाहीर केलेली नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या स्कूटर ची किंमत अंदाजे 1.20 लाखापर्यंत असू शकते. कंपनीने या स्कूटरची लॉन्च डेट देखील अजून निश्चित केलेली नाही परंतु आशा आहे की ही स्कूटर लवकरच भारतीय बाजार मध्ये उपलब्ध होईल.

हे देखील पहा

Leave a comment