Toyota Rumion आली धडाक्यात! फॅमिली कारमध्ये लक्झरी, जबरदस्त कम्फर्ट आणि भन्नाट फीचर्स!

Toyota Rumion ही एक उत्तम फॅमिली MPV असून ती दमदार 1.5-लिटर K-सिरीज इंजिन, आधुनिक Neodrive तंत्रज्ञान, आणि इंधनाची बचत व्हावी यासाठी ही E-CNG तयार करण्यात आली आहे. यामध्ये spacious इंटीरियर, उत्तम मायलेज, आणि स्मार्ट फीचर्स यामुळे ही कार कुटुंबासाठी उत्तम पर्याय असणार आहे या कारचे आरामदायी सेट्स आणि स्मृत ड्रायव्हिंग अनुभव मुळे ही कार दररोजच्या वापरासाठी आणि आमच्या प्रवासासाठी एक चांगली कार आहे टोयोटा कंपनीच्या चाहत्यांसाठी Rumion ही कार स्टायलिश डिझाईन आणि दमदार पावर असणारी ठरणार आहे. चला तर पाहूया मग या कारची संपूर्ण वैशिष्ट्ये.

Toyota Rumion चे दमदार मायलेज

Toyota Rumion
Toyota Rumion

Toyota Rumion ही एक spacious आणि इंधन कार्यक्षम 7-सीटर MPV आहे, जी फॅमिली आणि लॉन्ग ड्राईव्हसाठी एक उत्तम पर्याय आहे. याचे पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 20.51 km/l, पेट्रोल ऑटोमॅटिक 20.11 km/l, आणि CNG व्हेरिएंट 26.11 km/kg चे मायलेज देते, जे नियमित प्रवासासाठी किफायतशीर ठरते. कारच्या इंटीरियरमध्ये मोठी आणि आरामदायी सीट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पहिली आणि दुसरी रांग प्रवाशांसाठी अत्यंत कंफर्टेबल आहे. तिसऱ्या रांगेतील जागा थोडी कॉम्पॅक्ट असली तरी तीही उपयुक्त आणि प्रवासासाठी सोयीस्कर आहे. जर तुम्हाला spacious, स्टायलिश आणि उत्तम मायलेज असलेली फॅमिली कार हवी असेल, तर Toyota Rumion एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो.

सुरक्षा फीचर्स

Toyota Rumion
Toyota Rumion

Toyota Rumion मध्ये अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत, जे ही कार अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवतात. यामध्ये दोन एयरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट, ISOFIX माउंट्स, रियर पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखे स्टँडर्ड फीचर्स उपलब्ध आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये सहा एयरबॅग्स, फ्रंट फॉग लॅम्प्स आणि रियर पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामुळे सुरक्षेचा आणखी एक स्तर वाढतो. सध्या या कारचा सेफ्टी स्कोअर टेस्ट झालेला नाही, पण ही Maruti Ertiga चे री-बॅज वर्जन असल्याने, 2019 मध्ये Ertiga ला मिळालेली 3-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग विचारात घेता, Rumion देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगला पर्याय ठरू शकतो.

Toyota Rumion – आकर्षक रंग, विविध व्हेरिएंट्स आणि उत्तम फीचर्स

Toyota Rumion
Toyota Rumion

Toyota Rumion ही पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – स्पंकी ब्लू, रस्टिक ब्राउन, आयकॉनिक ग्रे, कॅफे व्हाइट आणि एंटिसिंग सिल्व्हर. यातील रस्टिक ब्राउन रंग सर्वाधिक लक्षवेधी मानला जातो.

व्हेरिएंट्स आणि किंमती

ही कार S, G आणि V अशा तीन व्हेरिएंट्समध्ये येते. बेस व्हेरिएंट S ची किंमत ₹10.44 लाखांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंट V ₹13.73 लाखांपर्यंत जातो. CNG पर्याय फक्त S व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे इंधन कार्यक्षमतेच्या दृष्टीने तो एक चांगला पर्याय ठरतो.

G व्हेरिएंट – ‘वॅल्यू फॉर मनी’ पर्याय

G व्हेरिएंट हा सर्वाधिक किफायतशीर मानला जातो, कारण ₹11.60 लाखांच्या किंमतीत तो उत्तम फीचर्स देतो. यामध्ये 7-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, ऑटोमॅटिक एसी, 4-स्पीकर साउंड सिस्टम आणि स्टेअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स यांसारख्या सुविधा मिळतात.

read more

Leave a comment