Sunny Leone:छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातून आलेल्या या धक्कादायक बातमीनुसार, ‘महतारी वंदन योजना’ अंतर्गत एका काँग्रेस नेत्याच्या कुटुंबातील तीन महिलांसोबतच, बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी पोर्न स्टार सनी लियोनी यांचं नावही लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट असल्याचं समोर आलं आहे.
२०२५ मध्ये अक्षय कुमारचे आगामी सिनेमे: बॉक्स ऑफिसचा खिलाडी पुन्हा सज्ज!
Sunny Leone
या योजनेंतर्गत दरमहा 1000 रुपये मिळाल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणामुळे प्रशासन आणि लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, बस्तरचे कलेक्टर हरिस एस यांनी महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांना या अनियमिततेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी संबंधित बँक खाते सील करण्याचे, बेकायदेशीररीत्या काढलेल्या रकमेची वसुली करण्याचे आणि दोषींविरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारीनुसार सनी लियोनी यांच्या नावाने 1000 रुपये मिळत असल्याचे समजले. प्राथमिक चौकशीत हे उघड झाले की, अर्ज ग्राम तालूर येथील अंगणवाडी कार्यकर्ती वेदमती जोशी यांच्या आयडीचा वापर करून नोंदवण्यात आला होता.
सखोल तपासात हे स्पष्ट झाले की, वीरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीने फसवणूक करून ही रक्कम अवैधरित्या आपल्या खात्यावर वळवली होती.महिला व बाल विकास विभागाने या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध आणि इतर दोषींविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई सुरू केली आहे.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…