Sanjay Gandhi niraadhar Yojana 2024 Maharashtra:संजय गांधी निराधार योजनेद्वारे राज्यातील निराधार घटकांना दर महिन्याला आर्थिक मदत करण्यासाठी चालू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.सध्या अलीकडेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग बांधवांसाठींच्या योजनांसह सर्व प्रकारच्या विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने भरीव निधीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर त्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.आणि या योजनेचे पैसे महिन्याच्या निश्चित तारखेला जमा करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत.त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर दर महिन्याच्या पाच तारखेला १५०० रुपये जमा होणार आहे.

संजय गांधी निराधार योजना थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार योजना |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2024 |
लाभ | निराश्रीत व्यक्ती व महिलांसाठी दर महिना 1500 रुपये मिळणार |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व निराधार घटक |
उद्देश | महाराष्ट्रातील निराश्रीत घटकांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करणे |
अधिकृत वेबसाईट | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Login |
संजय गांधी निराधार योजनेच्या पात्रता
- लाभार्थ्याची वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 रुपये पेक्षा जास्त नसावे
- . महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 21 हजारापेक्षा जास्त असू नये
- दिव्यांगासाठी वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 50 हजार रुपये त्यापेक्षा जास्त असू नये.
लाभार्थी
विधवा, दिव्यांग ,गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती ,अनाथ, देवदासी ,वैश्य व्यवसायापासून मुक्त झालेली महिला, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुख व्यक्तीच्या पत्नीस,65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला तसेच कुष्ठरोग क्षयरोग एड्स कर्करोग यासारख्या आजारामुळे आपला चरितार्थ न चालू शकणारे पुरुष व महिला,35 वर्षापेक्षा जास्त वय असलेली अविवाहित निराधार महिलाइतर समाजातील दुर्बल निराधार घटक
Sanjay Gandhi niraadhar Yojana 2024 Maharashtra
The woman who has become widowed, disabled, seriously ill, orphaned, a devadasi, liberated from the prostitution business, the wife of the head of a family who is deprived of education due to poverty, as well as men and women above the age of 65 who are financially unsupported, suffering from diseases such as leprosy, tuberculosis, AIDS, and cancer, are vulnerable individuals in society who are unmarried and financially unsupported, and are older than 35 years.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ
प्रत्येक लाभार्थ्याला 600 रुपये प्रति महिना तसेच एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी असेल तर त्या परिवाराला 900 रुपये प्रति महिना मिळणार आहे. हा लाभ लाभार्थ्याला त्याचे अपत्य 25 वर्षे होई पर्यंतच किंवा त्याला रोजगार मिळत नाही तोपर्यंतच मिळणार आहे. लाभार्थ्याला जर केवळ मुलीच असेल तर हा लाभ मुलीचे 25 वर्षे वय झाले किंवा तिचे लग्न झाले तरी सुद्धा हा लाभ लाभार्थ्याला मिळत राहणार आहे .
संजय गांधी निराधार योजनेचे कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- वयाचा दाखला किमान 18 ते 65 वर्षे(18 पेक्षा कमी वया असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या पालकाच्या मार्फत लाभ मिळणार आहे)
- किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- विधवा महिलांसाठी त्यांच्या पतीच्या मृत्यूचा दाखला
- दिव्यांगांसाठी जिल्हा शल्यचिकितिस्ताचा दिव्यांग असल्याचा दाखला आवश्यक (किमान 40% )
- अनाथ दाखला
- दिव्यांग वार्षिक उत्पन्न मर्यादा कमाल 50 हजार रुपये
- इतर सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 21000 रुपये
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्न दाखला /दारिद्ररेषेचे प्रमाणपत्र
- आजाराने ग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र (सरकारी दवाखान्यातील सिविल सर्जन द्वारा सुरू केलेले प्रमाणपत्र)
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज नोंदणी कशाप्रकारे करायची?
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- येथे आल्यानंतर तुम्हाला नवीन युजर येथे नोंदणी करा हे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती दोन पर्याय दिसतील
- त्यातील पहिले ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
- आता खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे मोबाईल नंबर टाकून तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तेथे टाकायचा आहे
- इतर माहिती भरून सबमिट बटनावरती क्लिक करायचे
- आहे अशा प्रकारे तुमची नवीन युजर नोंदणी पूर्ण होईल .
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची?
संजय गांधी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया तुम्ही दोन मार्गाने करू शकता एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरी ऑफलाईन
संजय गांधी निराधार योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- आता तुम्हाला लॉगिन करण्यासाठी होम पेज वरचे आहे.
- येथे आल्यानंतर तुम्ही तयार केलेले युजर नेम आणि पासवर्ड तसेच कॅपच्या कोड टाकून तुमचा जिल्हा निवडा आणि लॉगिन बटनावरती क्लिक करायचे आहे .
- तुम्हाला अर्ज करण्यासाठी आता मराठी किंवा इंग्लिश दोन ऑप्शन दिसेल त्यातील तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कोणतीही एक ऑप्शन निवडा
- आता तुम्हाला डाव्या बाजूला खाली येऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग निवडायचा आहे.
- आता विशेष सहाय्य योजना हे पर्यायावर क्लिक करून पुढे जा हे बटन क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती देखील विशेष सहाय्य योजना हा पर्याय निवडायचा आहे.
- आता तुमच्यासमोर योजनेची पात्रता कागदपत्रे इतर सर्व माहिती दिसेल ती तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या आणि आता खाली येऊन पुढे सुरु करा या बटणावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही दारिद्र रेषेखालील असाल तर होय नाही तर नाही पर्याय वरती क्लिक करून पुढे जा हे बटणावरती क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक फॉर्म येईल त्यावरती खालील माहिती भरायची आहे.
- आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यावर ते ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे
- तुमचे नाव वडिलांचे नाव ई-मेल अड्रेस तुमचा आधार कार्ड वरती जो पत्ता असेल तो टाकायचा आहे
- तुमचा व्यवसाय इतर सर्व माहिती भरायची आहे
- आता खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा उपविभाग निवडण्यासाठी दोन पर्याय समोर येतील शहरी आणि ग्रामीण तुम्ही ज्या भागातील असाल तो पर्याय निवडायचा आहे
- आता तुम्हाला योजनेचा तपशील भरायचा आहे त्यामध्ये खालील माहिती तुम्हाला भरायची आहे
- तुम्ही ज्या प्रकारातून लाभ घेणार आहे तो प्रकार निवडायचा आहे, महाराष्ट्रात किती वर्षापासून रहिवासी आहे जात निवडायचे आहे
- कुटुंबातील सदस्य संख्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
- विकलांग असल्यास प्रकार निवडून टक्केवारी टाकायची आहे
- आता खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची संपूर्ण माहिती तिथे भरायची आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला अर्ज मंजूर करण्यासाठी मला मंजूर आहे या पर्यायावर क्लिक करून अर्ज जतन करून घ्यायचा आहे.
- आता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे
- आता तुम्हाला 33 रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे त्यानंतर तुमचा अर्ज 30 दिवसांसाठी मंजुरीसाठी तहसील कार्यालय मध्ये जाणार आहे.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यास काही अडचण येत असल्यास तुम्ही तुमच्या जवळील सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा तो अर्ज घेऊन तहसील कार्यालयामध्ये देऊ शकता आणि जर तुमचा अर्ज 30 दिवसांमध्ये मंजूर झाला नाही तर तुम्हाला तुमची कागदपत्रे घेऊन तहसीलदारांना भेटून तुमचा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया करू शकता.
निष्कर्ष
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करीत असतात यामध्ये सर्व निराधार अपंग ट्रान्सजेंडर व वरती दिलेल्या सर्व प्रकारचे प्रवर्ग यांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे या योजने साठीच्या पात्रता कागदपत्रे अर्ज कशा प्रकारे करायचा नोंदणी कशाप्रकारे करायची या योजनेचा लाभ काय आहे?याची संपूर्ण माहिती वरती लेखामध्ये दिलेली आहे तरी आपली ही माहिती समजली असेल.
संजय गांधी निराधार योजने मार्फत दर महिन्याला किती रक्कम मिळते?
संजय गांधी निराधार योजनेमार्फत लाभार्थ्याला दर महिन्याला सहाशे रुपये तसेच एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास 900 रुपये दर महिन्यात देण्यात येतो.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?
या योजनेसाठी राज्यातील निराश्रीत विधवा महिला अपंग 65 वर्षाखालील निराश्रीत व्यक्ती व महिला वेश्या व्यवसायापासून मुक्त झालेली महिला घटस्फोटीत महिला 35 वर्षापेक्षा जास्त वय असलेली अविवाहित महिला योजनेसाठी पत्र असणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा काय आहे?
अपंग असल्यास वार्षिक उत्पन्न 50 हजारापेक्षा जास्त नसावी व इतर सर्व घटकांसाठी वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त 21 हजार रुपये आहे.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…