उद्योजकांसाठी मोठी संधी! Rural Business Credit Card योजनेद्वारे केंद्र सरकारकडून मिळवा 5 लाख रुपये

Rural Business Credit Card:ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योजक घडविण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते त्यामुळे ते व्याज किंवा बँक यांच्याकडून कर्ज घेत असतात परंतु आता त्यांना केंद्र सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे यामध्ये लहान व्यापारी शेतकरी महिला बचत गट तसेच नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे हे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असून अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Rural Business Credit Card योजना

“Rural Business Credit Card” ही योजना केंद्र सरकारने सुरू केल्या असून या योजनेद्वारे ग्रामीण भागातील उद्योजक शेतकरी आणि लहान व्यवसाय असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज हे कमी व्याज दरात आणि अतिशय सोप्या पद्धतीने या कर्जाचे वितरण केले जाणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसायाला चालना मिळणार आहे.

उद्देश

“Rural Business Credit Card” या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच आपला लहान व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करून सक्षम बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

किती कर्ज मिळणार आहे?

“Rural Business Credit Card” या योजनेद्वारे अर्जदारांना त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार काही ठराविक मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाणार आहे या कर्जाची साधारण रक्कम 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंत असू शकते या कर्जाची दिली जाणारी रक्कम ही कर्जदाराच्या व्यवसायाची पात्रता प्रकार आणि बँकेच्या निकषावरती अवलंबून असणार आहे त्याचप्रमाणे व्याजदर आणि परत पिढीचा कालावधी संबंधित बँकेच्या धोरणानुसार ठरविले जाईल.

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात?

“Rural Business Credit Card” या योजनेसाठी ग्रामीण भागातील लहान उद्योजक शेतकरी महिला बचत गट तरुण आणि छोटे व्यापारी त्याचप्रमाणे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असणारे तरुण या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कोठे करायचा?

“Rural Business Credit Card” योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थी जवळच्या राष्ट्रीयकृत, सहकारी किंवा ग्रामीण बँकेत जाऊन अर्ज करू शकतात. तसेच, अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारेही ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज प्रक्रियेसाठी ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि व्यवसायाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. मंजुरीनंतर अर्जदाराला ठराविक मर्यादेपर्यंत कर्ज मिळू शकते, ज्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यास किंवा वाढवण्यास मदत होईल.

हे देखील पहा

Leave a comment