Ration card Anandacha sidha 2024: महाराष्ट्र सरकार गणेशोत्सवाच्या वेळी आनंदाचा शिधा देणार आहे. हा आनंदाचा शिधा मागील दोन वर्षापासून रामनवमी पासून देण्यात येत आहे याचा लाभ राज्यातील एक कोटी सत्तर लाख 82 हजार 86 लोक घेत आहेत. यासाठी शासनाने 562 कोटी 51 लाख रुपये खर्चाची निधी देखील मंजूर केलेली आहे.मागील वर्षीपासून गौरी गणपती दिवाळी गुढीपाडवा या निमित्ताने आनंदाच्या शिधाचे वाटप सरकारद्वारे केले जाते.
Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024!प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची,पात्रता, कागदपत्रे,लाभ
राज्यातील नागरिकांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत असतो. त्यामुळे राज्याने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी आनंदाचा शिधा यामध्ये साखर ,हरभऱ्याची डाळ, रवा आणि सोयाबीन तेल, या चार वस्तू देण्यात येणार आहे.गणेशोत्सव हा सर्वांनी आनंदात साजरा करावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.या शासन निर्णयानुसार शिधापत्रिका धारकांना 100 रुपयांमध्ये चार वस्तू देण्यात येणार आहे.तर या वस्तू आपल्याला देखील मिळवायचे असतील तर यासाठीच्या पात्रता कागदपत्रे आणि हा आनंदाचा शिधा किती तारखेला मिळणार आहे? त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

Ration card Anandacha sidha 2024
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी 10/1/ 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची स्थापना अयोध्या मध्ये होणार होती. त्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी व्हावी. या उद्देशाने महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना या दिवशी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल. असा ठराव संमत केला होतामात्र मागील वर्षी 18 ऑगस्ट 2023 रोजी गौरी गणपती आणि दिवाळीच्या वेळेस हा आनंद शिधा रेशन कार्ड धारकांना 100 रुपयांमध्ये चार वस्तू देण्याचे निर्णय राज्य शासनाने घेतला होता.
हा आनंदाचा शिधा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना देण्यात येत असतो. त्याचप्रमाणे पूर्वी हा आनंदाचा शिधा छत्रपती संभाजी नगर अमरावती विभागाचे सर्व जिल्हे नागपूरमधील वर्धा व 14 आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील व केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिधा दिला होता. प्रत्येक शिधापत्रिकेमागे हा आनंदाचा शिधा मिळत असतो यासाठी शासनाने 562 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे.त्याचप्रमाणे यावर्षी देखील गौरी गणपतीच्या वेळेस रेशन कार्ड लाभार्थ्यांना शंभर रुपयांमध्ये चार वस्तू देण्यात येणार आहेत. त्यासाठीची पात्रता वाटप कशा प्रकारे होणार आहे? काय प्रक्रिया करावी लागणार आहे? याची माहिती खाली दिली आहे.
आनंदाचा शिधा यासाठी पात्रता काय आहे?
आनंदाचा शिधा मिळविण्यासाठी रेशन कार्ड ही E-KYC करणे अनिवार्य केले आहे. कारण धान्य वाटपाचे वेळी होणारे घोटाळे रोखण्यासाठी ही E-KYC करणे आवश्यक आहे. यासाठी E-KYC करणे आवश्यक आहे. नाही तर तुम्हाला धान्य मिळणार नाही. तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल. तर तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांची ही केवायसी करणे गरजेचे आहे.
आनंदाचा शिधा वस्तू कशा प्रमाणे मिळवायच्या?
सर्व रेशन दुकानावर आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे रेशन कार्डधारकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन या वस्तू प्राप्त करून घ्यायचे आहेत. वाटप व्यवस्थित व्हावे व गर्दी टाळण्यासाठी रेशन दुकानदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आनंदाचा शिधा मिळवण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डधारकांना पुढील काळजी घ्यायची आहे. रेशन कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे E-KYC असणे आवश्यक आहे. धान्य केंद्रावर जाताना आधार कार्ड रेशन कार्ड सोबत घेऊन जावे.रेशन कार्ड च्या दुकानात दिलेल्या वेळेत व त्यास तारखेला जाऊन मिळालेल्या वस्तूंची यादी तपासून घ्या व त्याची पावती घ्या.
आनंदाचा शिधा देण्यामागचा सरकारचा उद्देश काय आहे?
गणेश उत्सव हा धार्मिक सण नसून तो सार्वजनिक एकात्मतेचा सण आहे.सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे. त्याचबरोबर या सणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकत्र येतील व आनंद साजरा करतात म्हणून काही कुटुंबांना आर्थिक परिस्थितीनुसार हा उत्सव साजरा करणे शक्य होत नाही. त्यांना या परिस्थितीमध्ये सरकारची ही योजना दिलासा देणारआहे .हाच उद्देश्य यामागे राज्य शासनाचा आहे की, समाजातील गरिबातील गरीब कुटुंबाला देखील हा सण आनंदाने साजरा करता यावा.
आनंदाचा शिधाद्वारे कोणत्या वस्तू मिळणार आहेत?
महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा या योजनेमार्फत एक कोटी 70 लाख 82 हजार 86 लोक लाभ घेत आहेत यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेशन कार्डधारकांना चार वस्तू शंभर रुपयामध्ये देण्यात येणार आहेत. त्या मिळणाऱ्या वस्तूंचा एक संच तयार केला जाणार आ.. आणि प्रति शिधापत्रिकेमागे एक संच देण्यात येणार आहे .तर त्या संचामध्ये खालील चार वस्तूंचा समावेश आहे.
- एक किलो रवा
- एक किलो हरभरा डाळ
- एक किलो साखर
- एक लिटर सोयाबीन तेल
अशा प्रकारे तुम्हाला हा आनंदाचा शिदा मिळणार आहे.
आनंदाचा शिधा वाटप केव्हा होणार आहे?
हा आनंदाचा शिधा राज्यातील लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये देण्यात येणार आहे.

आनंदाचा शिधा कोणाला मिळणार आहे?
राज्य सार्वजनिक वितरण संस्थेमार्फत अन्न कुटुंब प्राधान्य योजनेअंतर्गत जे जिल्हे आहेत त्यांना हा आनंदाचा शिधा भेटणार आ.. प्रति शिधापत्रिका मागे एक शिधा संच मिळणार आहे.राज्यातील स्वस्त धान्य दुकानात दारिद्र्यरेषेखालील पिवळे व केशरी शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
निष्कर्ष
अयोध्येतील राम मंदिरामध्ये श्रीरामांचे मूर्ती स्थापनेच्या वेळी संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी केली जावी. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा हा राज्यातील जनतेला दिला जा.. त्या मार्फत रेशन कार्ड धारकांना चार वस्तू देण्यात येतात त्याम…ध्ये हरभरा डाळ रवा गोड तेल साखर इत्यादी या गोष्टींचा समावेश असतो मागील वर्षीपासून हा आनंदाचा शिधा गौरी गणपतीच्या वेळी आणि दिवाळीच्या वेळेस देण्यास निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आ.. गणेशोत्सव हा समाजातील गरीब घटकांना देखील आनंद साजरा करता यावा व यातून एकात्मतेचे निर्मिती व्हावी. या उद्देशाने हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आ.. या संबंधीची संपूर्ण माहिती वरती आम्ही लेखामध्ये दिलेली आहे..ती तुम्ही वाचावी धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…