Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana महिलांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी 25 लाखापर्यंत कर्ज पहा कशाप्रकारे

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana : महाराष्ट्र राज्य शासन विधानसभा निवडणुकीआधी विविध प्रकारच्या नवनवीन योजना घेऊन येत आहेत त्यामध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू करण्यात आले आहेत त्यामध्येच अजून भर घालण्यासाठी अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्प जाहीर करत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
महिलांना उद्योगधंदा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते . महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी अडथळा निर्माण होतो.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजने अंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक ते 25 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन आत्मनिर्भर बनणार आहे.
राज्यामध्ये सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या महिलांच्या नेतृत्वाखाली शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मधून तयार झालेले नवीन उद्योग यांना प्रोत्साहित करून राज्यात सुरू असणाऱ्या इन्युबेशन सेंटरच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणे तसेच प्रोटोटाइप बनविणे इत्यादी करिता साहाय्य करणे आवश्यक आहे.

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana 2024


महिलांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे अर्थसाह्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळेल तसेच राज्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होईल व महिलांच्या नेतृत्वाखाली असलेल्या स्टार्टअप मुळे स्थानिक गरजेवर आधारित असलेल्या व स्थानिक कच्च्या मालावर महिला व्यवसाय सुरू करू शकतील.
स्टार्टअप विकासाद्वारे महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांच्यात व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल तसेच ग्रामीण व शहरी भागात स्टार्ट परिसंस्थेमध्ये विकासात वाढ होईल यासाठी महिलांना आर्थिक निधीची आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे
आपल्याला या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येणार आहे? यासाठीची पात्रता काय असणार आहे? या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहे? योजनेच्या पात्रता, लाभ या सर्वांची संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे.

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana 2024 थोडक्यात माहिती

योजनेचे नावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
राज्यमहाराष्ट्र
योजनेची घोषणा28 जून 2024
संबंधित विभागकौशल्य रोजगार उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग
लाभार्थीराज्यातील उद्योजक महिला
लाभराज्यातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखापासून 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.
उद्देशमहिलांना उद्योग धंद्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.msins.in/
अर्ज करण्याची सुरुवातदिनांक ९ जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 ऑगस्ट 2024

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana 2024: योजनेचे उद्दिष्टे

  • महाराष्ट्रातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे
  • राज्यातील महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्ट व नवीन संकल्पना असलेल्या उद्योगधंद्यांना विकसित करण्यासाठी एक वेळेस निधी उपलब्ध करून देणे
  • राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे
  • देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील रोजगाराला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे
  • राज्यातील महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअप यांना त्यांच्या उलाढालीनुसार 1 ते 25 लाखापर्यंत आर्थिक निधी उपलब्ध करून देणे.
  • या योजनेअंतर्गत 25% रक्कम शासनाद्वारे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana योजनेच्या पात्रता

  • लाभार्थी महिला महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असावी
  • संबंधित महिला उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार मान्यताप्राप्त नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप असावी
  • संबंधित महिलाचा स्टार्टअप व्यवसायात महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक यामध्ये किमान 51 टक्के वाटा असणे आवश्यक आहे
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून चालू असावा
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असावी
  • महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून अनुदान स्वरूपात आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्जप्रक्रिया महिलांना मिळणार १५००रुपये बँक खात्यात कसे ते पहा |ladki bahin yojana online apply

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana लाभार्थी निवड

या योजनेअंतर्गत आश्वासक व नाविन्यपूर्ण, प्रभावी स्टार्ट ला प्राधान्य देण्यात येणार आहे
ज्या स्टार्टअप मधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल अशा व्यवसायांना देखील विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करणार आहे व या समितीमार्फत प्राप्त अर्जांमधील प्राप्त निकषाद्वारे स्टार्टअप ची निवड करण्यात येईल
याकरिता स्टार्टअप क्षेत्रातील/बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहाय्याने कार्यवाही करण्यात येईल
पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप यांना देण्यात येणारे रक्कम ही अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • कंपनी प्रस्ताव
  • एमसीए प्रमाणपत्र (कंपनी नोंदणीकृत प्रमाणपत्र)
  • डीपीआयआयटी प्रमाणपत्र
  • लेखापरीक्षण अहवाल
  • कंपनीचा लोगो
  • कंपनी संस्थापकाचा फोटो
  • उत्पादन सेवा फोटो
  • अर्जदाराने याआधी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेले स्वयघोषणा पत्र
  • कंपनी बँक खाते तपशीलकंपनी बँक खाते तपशील

Punyashlok ahilyadevi Holkar mahila startup Yojana योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची?

  • तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे यासंबंधीचे अर्ज प्रक्रिया सुरू झालेले असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 ऑगस्ट 2024 देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची सर्व स्टेप बाय स्टेप माहिती आम्ही खाली दिलेली आहे
  • सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • येथे आल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल.
  • येथे तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना बटन वरती क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
  • त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे.
  • त्या अर्जामध्ये खालील प्रमाणे माहिती विचारली जाईल.
    • स्टार्टअप चे नाव
    • महिला संस्थापकाचे नाव
    • कंपनीचे नाव
    • ई-मेल
    • श्रेणी निवड
    • मोबाईल नंबर
    • स्टार्ट अपचा संघ
    • आकार
    • स्प्रे सेक्टर
    • कंपनीचा प्रकार
    • स्टार्टअप चे नोंदणी, क्रमांक, दिनांक,
    • कंपनीचे वेबसाईट
    • कंपनीचा पत्ता, जिल्हा, शहर,
    • स्टार्टअप चे वर्णन
    • काही अडचणी येत असल्यास त्याचे वर्णन
    • सेवायुक्तादन वर्णन
    • स्टार्टअपचा मोठ्या प्रमाणावर होणारा परिणाम स्पष्ट करणे
    • उलाढाल तपशील इत्यादी
  • अशाप्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावरती क्लिक करा
  • आपली अर्ज प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेली असेल.

FAQ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत किती कर्ज मिळणार आहे?

या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या स्टार्टअप च्या उलाढालीनुसार 1 लाख ते 25 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप महिला योजनेचा फायदा कोणत्या महिलांना मिळणार आहे?

महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून अनुदान स्वरूपात आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी वार्षिक उलाढाल किती असायला पाहिजे ?

महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून चालू असावा
महिला नेतृत्वातील स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असावी.