Protsahan Anudan Yojana :महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याच्या आवाहन सरकारमार्फत करण्यात आलेली आहे
बांधकाम कामगारांवर पैशाचा पाऊस कामगारांना मिळणार 6 लाख रुपये Bandhkam kamgar Yojana 2024 benifits
सन 2017- 18, 2018- 19, 2019- 20 या तीन वर्षे पैकी कोणत्याही दोन वर्षांमध्ये आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते
सरकारचे शेतकऱ्यांना e-kYC करण्याचे आवाहन
या अंतर्गत 14,60,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ वितरित देखील केला गेला आहे परंतु या अनुदान योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचे वितरण अजून करणे बाकी आहे त्यामध्ये 33356 शेतकऱ्यांची यादी सरकार मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे व यांना ई केवायसी करण्याच्या आवाहन सरकारने केलेली आहे
माझा लाडका शेतकरी योजना शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये ladka shetkari yojana maharashtra online apply
शेतकऱ्यांना किती रकमेपर्यंत अनुदान मिळेल
ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहे व ज्या शेतकऱ्यांना मेसेज द्वारा कळविण्यात आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी आपली ही केवायसी करणे आवश्यक आहे ही ही केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त 50000 रुपयांचे अनुदान जमा केले जाणार आहे या योजनेत मुद्दल रक्कम विचारात घेऊन ज्या शेतकऱ्यांचे कर्जाची मुद्दल 50 हजारापेक्षा जास्त आहे त्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे ऊर्जा शेतकऱ्यांची मुद्दल रक्कम 50 हजार रुपये पेक्षा कमी आहे त्यांना कर्जाच्या मुद्दलीच्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे
अनुदान मिळवण्यासाठी ekyc करणे का आवश्यक आहे
राज्यातून जवळजवळ 33,356 शेतकरी हे ही केवायसी करण्याचे राहिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरले आहेत त्यांना मेसेज द्वारा कळविण्यात आलेले आहे एखाद्या शेतकऱ्याला मेसेज आलेला नसेल तर त्यांनी बँकेत जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे यासाठी बँकेला देखील सरकारने आदेश दिलेले आहेत की आपल्या शाखेतून एखादा शेतकरी या योजनेसाठी पात्र झालेला असेल तर त्याला आपण कळवावे आणि त्याची ही केवायसी करून घ्यावी ही केवायसी तुम्ही बँकेतून ही करू शकता आणि आपले सरकार शासनाच्या पोर्टलवर जाऊनही तुम्ही करू शकता सात सप्टेंबर 2024 पर्यंत केवायसी करण्याच्या आव्हान सरकारने शेतकऱ्यांना केलेले आहे
या योजनेसाठी 15,40000 शेतकरी पात्र झालेली आहेत त्यापैकी 33,356 केवायसी करण्याचे बाकी आहेत पहिल्या टप्प्यामध्ये 8,15000खातेदारांचे प्रोत्साहन पर अनुदान यासाठी आधारित प्रमाणीकरण पूर्ण झालेली आहेत व काहींना अनुदानाची रक्कम देखील जमा करण्यास सुरुवात झालेली आहे मात्र अजूनही लाखो शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
Protsahan Anudan Yojana eligibility criteria
- कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
- या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
- सन २०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.
अपात्रता
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
- महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/ माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.
- केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
- राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस टी महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
- शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
- निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये २५००० पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
- कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
निष्कर्ष
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे यासाठी शेतकऱ्यांना ही केवायसी करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत 33 हजार 356 शेतकरी या योजनेसाठी पात्र असून देखील त्यांनी ई केवायसी न केल्याने त्यांना याचा लाभ मिळालेला नाही
FAQ
शासनाकडून प्रोत्साहन अनुदान किती रुपयापर्यंत मिळते
शेतकऱ्यांच्या कर्जाचे रक्कम पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर त्याला 50000 अनुदान मिळते त्याचप्रमाणे त्याची कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास त्याला मुद्दलीचे रकमेप्रमाणे अनुदान मिळते