Pm Surya Ghar muft bijali Yojana ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मधून केली होती. या योजनेमुळे 50 लाख रुपयांची बचत होणार आहे देशात दरवर्षी 75 हजार कोटी रुपये विजेसाठी खर्च होतात.या योजनेचा उद्देश देशातील गरीब कुटुंबांना मोफत वीज देणे हा आहे या योजने अंतर्गत देशातील एक कोटी गरीब कुटुंबांच्या घरावर सौर पॅनल बसविण्यात येणार आहे यासाठी त्यांना सौर पॅनलच्या एकूण किमतीच्या 40% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे याचा फायदा देशातील एक कोटी कुटुंब घेणार आहे.Pm Surya Ghar muft bijali Yojana योजनेद्वारे 300 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे या योजनेसाठी केंद्र सरकारने अधिकृत वेबसाईट सुद्धा सुरू केलेली आहे तुम्हाला पण Pm Surya Ghar muft bijali Yojana योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर याची पात्रता काय आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.
Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा
Pm Surya Ghar muft bijali Yojana थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री सूर्य घर योजना |
योजनेची घोषणा | नरेंद्र मोदी |
घोषणा | 22 जानेवारी 2024 |
स्थान | अयोध्या उत्तर प्रदेश |
उद्देश | एक कोटी लोकांच्या घरावर सौर पॅनल बसविणे |
लाभार्थी | गरीब व मध्यमवर्गीय कुटुंब |
लाभ | 300 युनिट पर्यंत मोफत वीज |
अधिकृत वेबसाईट | https://www.pmsuryaghar.gov.in/ |
Pm Surya Ghar muft bijali Yojana
Pm Surya Ghar muft bijali Yojana योजनेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी केली होती या योजनेअंतर्गत मध्यम व गरीब कुटुंबांच्या घरावर सौर पॅनल बसविण्यात येणार आहे या योजनेद्वारे एक कोटी लोकांचे विजेचे प्रमाण कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करणे हा आहे.या योजनेअंतर्गत एक कोटी लोकांच्या घरावर सौर पॅनल बसविण्याचे उद्देश्य केंद्र शासनाचा आहे या योजनेचे लक्ष गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाचे वीज बिल कमी करून ग्रीन एनर्जी वाढविणे त्याचबरोबर देशातील लोकांनी विजेवर अवलंबून राहून नये हे आहे.
Pm Surya Ghar muft bijali benefits
घरांसाठी उपयुक्त रूफटॉप सोलर प्लांटची क्षमतासरासरी मासिक वीज वापर (युनिट्स) रुफटॉप सोलर प्लांटची योग्य क्षमता सबसिडी
0-150 1-2 किलोवॅट | ₹ 30,000/- ते ₹ 60,000 |
150 -300 2-3 kW | ₹ 60,000/- ते ₹ 78,000/ |
-> 300 3 kW | ₹ ७८,००० |
Pm Surya Ghar muft bijali Yojana eligibility criteria
- कुटुंब भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- सौर पॅनेल बसविण्याकरिता योग्य छप्पर असलेले घर कुटुंबाकडे असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- सौर पॅनेलसाठी कुटुंबाने इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
Pm Surya Ghar muft bijali Yojana important documents
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- वीज बिल
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- घर मालकीचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
Pm Surya Ghar muft bijali Yojana online apply
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- त्यावरती तुम्हाला खालील माहिती निवडायची आहे तुमचे राज्य निवडायचे आहे.
- वीज वितरण कंपनी निवडायची आहे वीज ग्राहक क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तिथे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला लॉगिन बटनावरती क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला सौर पॅनल साठी अर्ज फॉर्म भरायचा आहे DISCOM कडून व्यवहार्यता मंजुरीची प्रतीक्षा करा.
- एकदा तुम्हाला व्यवहार्यता मान्यता मिळाल्यावर तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांद्वारे प्लांट स्थापित करा.
- एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
- नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
- एकदा तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाला.
- पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा.
- तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.
- अशाप्रकारे आपण हर घर सौर ऊर्जा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया करू शकता.
निष्कर्ष
Pm Surya Ghar muft bijali Yojana ही एक केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे या योजनेनुसार देशातील सुमारे एक कोटी कुटुंबियांच्या घरावर सौर पॅनल बसवण्यात येणार आहे यामधून त्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज भेटणार आहे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व भविष्यात देशातील लोक विजेवर अवलंबून राहू नये म्हणून हे एक महत्वपूर्ण योजना ठरणार आहे या योजनेची पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया फायदे हे सर्व माहिती आपण वरती बघितलेली आहे तरीही माहिती तुम्हाला समजली असेल.
Pm Surya Ghar muft bijali Yojana काय आहे?
या योजनेमध्ये देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या घरावर सौर पॅनल बसविण्यात येणार आहे
Pm Surya Ghar muft bijali Yojana योजनेनुसार कोणकोणते फायदे मिळतात?
या योजनेमध्ये लाभार्थ्याला तीनशे मिनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे
Pm Surya Ghar muft bijali Yojana योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?
लाभार्थ्याकडे वैद्य वीज कनेक्शन असावी ती व्यक्ती भारतीय असावी तिच्याकडे स्वतःच्या मालकीचे पक्याछताचे घर असावे लाभार्थ्यांनी सौर पॅनल साठी कोणतेही अनुदान घेतलेले नसावे.
नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश भोंगळ आहे. मी तीन वर्षापासून लॉगिन क्षेत्रात आहे मला सरकारी योजना सरकारी नोकरी विषयी लिहिण्यासाठी आवडते.