Pm Kisan Yojana 18th installment online process शेतकऱ्यांना करावी लागेल अशा प्रकारे प्रक्रिया, नाहीतर आपल्या खात्यात ६००० रुपये जमा होणार नाही.

Pm Kisan Yojana 18th installment online process: पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्यानंतर देशातील शेतकरी आता १८ व्या हप्त्याची वाट पाहत आहे. १७ हप्त्यामध्ये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 लाख कोटी पेक्षा जास्त निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.परंतु,काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजून १७ व्या हप्त्याचे देखील पैसे जमा झालेले नाहीत.
अशाप्रकारे आपण पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचे लाभार्थी असाल व आपल्याला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला लवकर अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे नाहीतर आपला १८ वा हप्ता देखील आपल्या खात्यात जमा होणार नाही. ही ऑनलाईन प्रक्रिया कशा प्रकारे करायची. याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group WhatsApp Join Now
Telegram Group Telegram Join Now

Pm kisan samman nidhi yojana काय आहे?

Pm Kisan samman nidhi yojana देशातील छोट्या व ठराविक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना 2000 रुपये दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यामध्ये देण्यात येतात अशा प्रकारे दरवर्षी एकूण ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे. पी एम किसान योजना द्वारे सरकार दरवर्षी 75,000 कोटी रुपयांची वाटप करणार आहे.

[related_posts]

Pm kisan samman nidhi yojana उद्देश

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशांमध्ये 75 टक्के लोक हे शेती करतात भारताचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून pm किसान सन्माननिधी योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त होऊन ते आलेले पैसे द्वारे शेतकरी शेतीची कामे, खते, बियाणे, फवारणी इत्यादी मध्ये त्या पैशांचा वापर करू शकतात. व त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळते. त्याच्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजना चालू करण्यात आलेली आहे.

माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्जप्रक्रिया महिलांना मिळणार १५००रुपये बँक खात्यात कसे ते पहा |ladki bahin yojana online apply


प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना अर्ज प्रक्रिया करण्याची पात्रता

  • प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना अर्ज प्रक्रिया करण्याची पात्रता
  • लाभार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • तो कोणत्याही शासकीय नोकरीत कार्यरत नसावा.
  • सुरुवातीला दोन हेक्टर क्षेत्र असणारा शेतकऱ्यांना याचा लाभ होत होता परंतु आता देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • लाभार्थ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

Pm kisan samman nidhi yojana आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • शेत जमिनीचा दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

Pm Kisan Yojana 18th installment online process

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल व अजून तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया करू शकता

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर pmKisan.gov.inजायचे आहे.
  • येथे आल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील येथे तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • येथे तुम्हाला आवश्यक माहिती विचारली जाईल जसे की अर्ज करण्याचे नाव कॅपच्या कोड तो तुम्हाला भरायचा आहे
  • यानंतर तुम्हाला ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी भरून द्यायचा आहे
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची माहिती विचारली जाईल जसे की आधार कार्ड जमिनीचे कागदपत्र इत्यादी व ते अपलोड करायचे आहे
  • आता सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • अशाप्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

CM Kisan Kalyan Yojana मुख्यमंत्री किसान कल्याण योजना शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये दरवर्षी आपल्याला पहिला हप्ता मिळाला का अशा प्रकारे यादीमध्ये आपले नाव चेक करा.


Pm Kisan Yojana e-kYC कशाप्रकारे करायची

अर्ज प्रक्रिया व्यतिरिक्त तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा फायदा घेण्यासाठी ही केवायसी करणे आवश्यक आहे नाहीतर तुमच्या खात्यावर हप्ते जमा होणार नाहीत ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केली नव्हती त्यांचा 17 वां हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला गेला नव्हता. केवायसी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या csc केंद्रावर जाऊन किंवा बँकेतून अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर करू शकता. यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे नाहीतर तुमचा 17 वा हप्ता देखील तुम्हाला भेटणार नाही. याच प्रकारे लाभार्थी शेतकऱ्यांना भू – सत्यापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर लाभार्थ्यांनी भू- सत्त्यापन केले नाहीत तर त्यांना पीएम किसान सन्मान निधी ची मिळणारी रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार नाही.


Pm Kisan Yojana 18th installment बद्दल माहिती

पी एम किसान सन्माननिधी योजने बाबत अशा बातम्या आल्या होत्या की अर्थसंकल्प 2024 मध्ये मोठी घोषणा होऊ शकते असे वाटत होते की पीएम सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवली जाईल पण असे झाले नाही केंद्र सरकार सध्या 2000 रुपये 3 हप्त्यांमध्ये दर 4 महिन्याला दरवर्षी 6000 रुपये देत आहे.
पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत सरकारने 17 व्या हप्त्यापर्यंत 3 लाख कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिली आहे.
पंतप्रधानांनी 18 जूनला पीएम किसान सन्मान निधीचा 17 व्या हप्त्याची घोषणा केली होती तेव्हा 9 कोटी 26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये दिले गेले होते या योजनेची सुरुवात 2019 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.


FAQ
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा18 वा हप्ता कधी येणार आहे?

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता नोव्हेंबर 2024 ला मिळणार आहे.18 जूनला या योजनेचा 17 वा हप्ता आला होता. हा आता दर चार महिन्यांनी येत असल्याने आता तो नोव्हेंबर महिन्यात येणार आहे.

आधार कार्ड वरून पीएम किसन सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये कशाप्रकारे चेक करायचे?

अधिकृत वेबसाईटवर जाऊन येथे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर टाकून खाते चेक करू शकता.

WhatsApp Group WhatsApp Join Now
Telegram Group Telegram Join Now