Pm kisan samman nidhi yojana 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक डिसेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा शुभारंभ केला होता.या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे वार्षिक तीन हप्ते मिळणार होते. वर्षाला 6000 रुपये मिळतात.ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा होतात.सुरुवातीला या योजनेमध्ये फक्त दोन हेक्टर क्षेत्र असलेले शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत होता. परंतु आता प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Pm kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान मानधन योजना यालाच किसान पेन्शन योजना असेही म्हणतात या योजनेद्वारे आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17 हप्ते पाठवण्यात आलेले आहेत.आपण कशाप्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकता. याची संपूर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे.आपण जर अजूनही पीएम किसन सन्माननिधी योजनेचा फायदा घेतला नसेल. तर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची याची माहिती आम्ही या मध्ये देणार आहोत.पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय आहे.या योजनेचा उद्देश्य काय यासाठी लागणारे कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत ते तुम्ही काळजीपूर्वक बघावी
Pm kisan samman nidhi yojana 2024:
Pm Kisan samman nidhi yojana देशातील छोट्या व ठराविक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये वार्षिक तीन हप्त्यामध्ये देणार आहेत. दर चार महिन्यांनी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे. पी एम किसान योजना द्वारे सरकार दरवर्षी 75,000 कोटी रुपयांची वाटप करणार आहे.
पी एम किसान सन्माननिधी योजना 2024 याची ठराविक माहिती खालील प्रमाणे आहे
योजनेचे नाव | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी |
कोणी सुरू केली | नरेंद्र मोदी |
लाभ | देशातील संपूर्ण शेतकरी |
उद्देश | देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे |
रुपये | सहा हजार रुपये दरवर्षी |
हेल्पलाइन नंबर | 011 24 300 606, 15 52 51 |
सोळावा हप्ता | 18 जून 2019 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | Pmkisan.gov.in |
अर्थसंकल्पात तरतूद | 750000 कोटी |
पी एम किसान सन्मान निधी योजना 17 वा हफ्ता Pm kisan samman nidhi instalment
पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 17 हप्ता हस्तांतरित केलेला आहे. ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. आणि आता शेतकरी अठराव्या हप्त्याची वाट बघत आहे. आणि या हप्त्याची घोषणा देखील सरकार लवकरच करणार आहे.अठरावा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे नाहीतर आपले बँकेमध्ये अठरावा हप्ता जमा होणार नाही तेव्हा तुम्ही लवकर आपले बँक खाते केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
पी एम किसान सन्मान निधी 2024 योजनेचा उद्देश
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशांमध्ये 75 टक्के लोक हे शेती करतात भारताचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून pm किसान सन्माननीय योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त होऊन ते आलेले पैसे द्वारे शेतकरी शेतीची कामे खते बियाणे फवारणी इत्यादी मध्ये त्या पैशांचा वापर करू शकतात. व त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळते. त्याच्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजना चालू करण्यात आलेली आहे.
आता महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी!Free Flour Mill Yojana Maharashtra 2024
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना अर्ज प्रक्रिया करण्याची पात्रता
- लाभार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- तो कोणत्याही शासकीय नोकरीत कार्यरत नसावा.
- सुरुवातीला दोन हेक्टर क्षेत्र असणारा शेतकऱ्यांना याचा लाभ होत होता परंतु आता देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- लाभार्थ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- कारण हे पैसे ऑनलाईन पद्धतीने डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- शेत जमिनीचा दाखला
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
पी एम किसान सन्माननिधी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची
- पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे.https://pmkisan.gov.in/
- वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर याच्याद्वारे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा
- आपल्यासमोर आता न्यू फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल आपल्याला तिथे शहरी व ग्रामीण असे दोन विकल्प दिसतील.
- Rural farmer registration आपण ग्रामीण क्षेत्रात असाल तर हा पर्याय निवडा आणि जर तुम्ही शहरे भागात असाल तर urban farmer registration वरती क्लिक करा.
- याच्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून राज्य सेलेक्ट करून घ्यायचे आहे.
- आपल्यासमोर एक captcha code भरून सेंट ओटीपी क्लिक करायचे आहे.
- नंतर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे. अशाप्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आपले अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायचा
ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया करणे शक्य नसेल.त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकतात .आपल्याला pm kisan registration फॉर्म घेऊन जवळील जनकल्याण केंद्रामध्ये द्यायचा आहे.तिथे आपली माहिती चेक करून पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले जाईल. व आपल्याला या योजनेचा फायदा मिळेल.
हेही पहा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना
पीएम किसान सन्मान निधी योजना बेनीफिशरी सूचीमध्ये आपले नाव अशा प्रकारे चेक करा
- Pm kisan beneficiary लिस्ट चेक करायचे असेल तर आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे.
- या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला Pm kisan beneficiary या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला आपले राज्य तालुका गाव इत्यादी यांची माहिती भरून घ्यायची आहे.
- सगळी माहिती भरून घेतल्यानंतर गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचे आहे.
- मग आपल्यासमोर Pm kisan beneficiary लिस्ट येईल. व याद्वारे आपण आपले नाव या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करू शकता.
पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी केवायसी कशाप्रकारे करायची
Pm kisan ekyc या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ही केवायसी करणे अनिवार्य केले आहे अन्यथा आपल्या बँक खाते मध्ये हप्ते जमा होणार नाहीत Pm Kisan Yojana चे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी ही केवायसी कशाप्रकारे करायची त्याची माहिती खालील प्रमाणे आहे सर्वप्रथम आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे आपल्याला होम पेजवर E kyc ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा ई केवायसी ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपण एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल हे नवीन पेज आल्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड नंबर या वरती भरून सर्च वरती क्लिक करायचे आहे जो पण आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असेल त्यावर ती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून आपल्याला सबमिट करायचे आहे.अशाप्रकारे आपले पीएम किसान ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
सुकन्या समृद्धी योजना!आता मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सरकार देणार खर्च बघा योजना काय आहे?
पी एम किसान सन्माननिधी मध्ये बेनिफिशियरी स्टेटस अशाप्रकारे चेक करा
- पी एम किसान बेनिफिशियरी चेक करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे.
- होम पेजवर आल्यानंतर आपल्याला पी एम किसान बेनिफिशियरी ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- इथे आल्यानंतर आपला जो नंबर रजिस्ट्रेशन आहे तो टाकून ओटीपी वर क्लिक करायचे आहे
- व आपल्याला गेट कोड ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे व आपल्यासमोर Benifishari स्टेटस ओपन होईल.
पी एम किसान सन्माननिधी योजनेचा 16 वाह आता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे 28 फेब्रुवारी 2024 रोजी सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हेल्पलाइन नंबर काय आहे
पी एम किसान सन्मान निधी योजनेत आपल्याला काही माहिती मिळवण्यात अडथळे येत असल्यास आपल्याला पी एम किसान हेल्पलाइन नंबर 011-24300606 155261 वर आपण संपर्क करू शकता.