PM Kisan Mandhan Yojana शेतकऱ्यांना 3000 रुपये पेन्शन दर महिना! लवकर करा अशाप्रकारे अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Kisan Mandhan Yojana:आज मी तुम्हाला एका अतिशय महत्त्वपूर्ण योजनेची माहिती देणार आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे योजना सुरू केल्या परंतु त्यापैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना म्हणजे किसान मानधन योजना या योजनेला किसान पेन्शन योजना असेही म्हटले जाते

Pm Kisan Samman Nidhi Yojana 2024 ! या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 18 व्या हप्त्याचे 4000 रूपये

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे म्हणजेच वर्षाला 36000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात यासाठी शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणे आवश्यक आहे

PM Kisan Mandhan Yojana

त्याचबरोबर ही योजना 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांसाठी आहे यासाठी त्यांना दर महिन्याला त्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या बँक खात्यातून पैसे किसान मानधन योजनेच्या खात्यावरती डिपॉझिट होणार आहेत व तेवढेच पैसे त्यांना सरकार तर्फे त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे

या योजनेचा लाभ त्यांना वयाचे साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेतही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती पण देशातील बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने ते या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले होते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये namo mahasanman nidhi yojana maharashtra 2024

आज मी तुम्हाला सांगणार आहे की शेतकरी घरबसल्या कशा प्रकारे 3000 रुपये प्रतिमा पेन्शन मिळू शकतो आणि प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी शेतकरी कशाप्रकारे अर्ज प्रक्रिया करू शकतात यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आहे यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघावा.

PM Kisan Mandhan Yojana थोडक्यात माहिती

योजनेचे नावप्रधानमंत्री किसान मानधन योजना
योजनेची सुरुवात2019
योजना कोण राबवतेकेंद्र सरकार
कोणा मार्फतLIC
योजनेचा लाभ18 ते 40 वयोगटातील शेतकरी
मिळणारी पेन्शन3000 रुपये प्रति महिना
किती वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल60 वर्षानंतर
खातेदाराला दर महिना किती रक्कम करावी लागेल55 ते 200
अधिकृत वेबसाईटप्रधानमंत्री किसान मानधन योजना

नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता

PM Kisan Mandhan Yojana काय आहे?

किसान मानधन योजना ही एक शेतकऱ्यांसाठी चालू केलेली पेन्शन योजना आहे.या योजनेला केंद्र सरकार LIC मार्फत राबवित आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन देणार आहे

याचा लाभ शेतकरी 60 वर्षानंतर घेऊ शकणार आहे या योजनेत शेतकरी जेवढे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करतील तेवढेच पैसे सरकार देखील त्यांच्या खात्यावरती जमा करणार आहे हे पैसे त्यांच्या वयाच्या मर्यादा नुसार त्यांच्या बँक खात्यातून कट करून किसान मानधन योजनेच्या खात्यावरती डिपॉझिट केले जाणार आहे

माझा लाडका भाऊ योजना 2024|जॉब कार्ड,नोंदणी,अर्ज प्रक्रिया,लाभ,पात्रता,कागदपत्रे याची संपूर्ण माहिती CMYkPk

ही योजना फक्त 18 ते 40 वर्षाच्या वयोगटातील शेतकऱ्यांसाठीच आहे यासाठी त्यांच्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे

या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्या वरून दर महिन्याला त्यांच्या वयोमानानुसार कमीत कमी 55 रुपये तर जास्तीत जास्त 200 रुपये कट होऊन ती रक्कम त्यांच्या किसान मानधन योजनेत डिपॉझिट केले जाणार आहे

या योजनेचा लाभ पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील घेता येणार आहे.

PM Kisan Mandhan Yojana उद्देश्य

भारतातील शेतकरी हा एक गरीब घटक म्हणून ओळखला जातो देशातील सर्व नोकरदार वर्ग सरकारी कर्मचारी यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन मिळत असल्याने त्यांना भविष्याची चिंता नसते

परंतु शेतकऱ्यांसाठी त्या प्रकारची कोणतीही पेन्शन योजना नसल्याने शेतकऱ्याचे भविष्य हे अंधारात होते त्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांना त्यांच्या म्हातारपणात त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत दिली जावी.

Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा

ते आपले कुटुंबाचे व स्वतःचे आरोग्य यासाठी त्याचा उपयोग करू शकतील यासाठी ही योजना सुरू केली होती आणि हा तिचा मुख्य उद्देश्य देखील आहे

PM Kisan Mandhan Yojana फायदे

  • किसान मानधन योजना ही देशातील 18 ते 40 वर्षाच्या शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे
  • देशातील शेतकऱ्याला वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे
  • शेतकऱ्यांच्या खात्या वरून जेवढे रक्कम किसान मानधन योजनेवर डिपॉझिट केली जाईल तेवढेच रक्कम सरकार देखील त्याच्या खात्यावरती जमा करणार आहे.
  • या योजनेचे लाभ पती आणि पत्नी दोघेही मिळू शकतात ही योजना मध्येच थांबायची असेल तर त्या वेळेपर्यंत त्यांनी जमा केलेली रक्कम त्यांना व्याजासह परत केली जाणार आहे
  • जर पती किंवा पत्नी पैकी एकाचा मृत्यू झाल्यास दोघांपैकी एक जण ही योजना पुढे चालू ठेवू शकतील
  • लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला साठ वर्षानंतर दर महिना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

Mukhymantri annpurna Yojana Maharashtra 2024;महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 1 वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत, त्यासाठी अशा प्रकारे करावे लागणार अर्ज

  • प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक पेन्शन योजना आहे यासाठी शेतकऱ्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही

18 ते 40 वयोगटाुसार कोणाला किती हप्ता भरावा लागणार आहे?

  • 18 वर्षे वय असलेल्या शेतकऱ्याला 55 रुपये दर महिन्याला भरावे लागणार आहेत
  • 29 वर्षे वय असलेल्या शेतकऱ्याला दर महिन्याला 100 रुपये भरावे लागतील.
  • चाळीस वर्षे वयोगटासाठी शेतकऱ्याला 200 रुपये भरावे लागतील

PM Kisan Mandhan Yojana पात्रता

  • ही योजना देशातील असंघटित शेतकऱ्यांसाठी आहे
  • लाभार्थी शेतकरी हा 18 ते 40 वयोगटातील असावा.
  • त्याच्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी
  • शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये पेक्षा जास्त नसावी
  • तो शेतकरी व त्याच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत नसावी
  • त्याच्याकडे बँक खाते, आधार कार्ड ,मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

PM Kisan Mandhan Yojana आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • वयाचा पुरावा
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जमिनीचे कागदपत्रे
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज

mandhan yojana online registration

  • किसान मानधन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला सर्वप्रथम
  • www.pmkmy.gov.in वेबसाईटवर जायचे आहे
  • आता तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल त्यावरती लॉगिन हे बटन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे
  • लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकून जनरेट ओटीपी या बटनावरती क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो OTP टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे
  • अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
PM Kisan Mandhan Yojana

PM Kisan Mandhan Yojana ऑफलाईन अर्ज कसा करायचा?

देशातील अनेक शेतकरी हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार नाही त्यासाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांना csc केंद्रा वरती जायचे आहे
  • शेतकऱ्याला स्वतःचे व कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र यांची माहिती त्या केंद्रा वरती द्यायची आहे
  • CSC केंद्रावर तुमच्या जमिनीची कागदपत्रांची माहिती तेथे द्यायची आहे
  • त्याचप्रमाणे बँकेचे खात्याची आवश्यक माहिती देखील तेथे द्यावी लागणार आहे
  • ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला तिथून एक अर्ज मिळेल
  • तो अर्ज तुमच्या आधार कार्डला लिंक करून घ्यायचा आहे
  • ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला एक पेन्शन क्रमांक दिला जाईल.
  • आणि तुमची प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024 या महिलांना मिळणार (४५०० रुपये)

PM Kisan Mandhan Yojana PDF link

निष्कर्ष

भारतातील अर्थव्यवस्था ही देशातील शेतकऱ्यांच्या कष्टांवरती अवलंबून आहे तरी देखील त्याला इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा पेन्शन उपलब्ध नसल्याने त्याचे जीवन आजारपणामध्ये अंधकारामध्ये असते.

त्यामुळे सरकारने देशातील शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी ही योजना सुरू केली आहे.या योजनेचा उद्देश्य देशातील शेतकऱ्यांना म्हातार पणामध्ये त्यांचा उदरनिर्वाह व आरोग्याच्या समस्या यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देणे हा आहे

यासाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरी योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि त्यांना 60 वर्षानंतर 3000 रुपये दर महिन्याला पेन्शन ही दिली जाणार आहे या योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

FAQ

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना कशा प्रकारे बंद करायची?

ही योजना बंद करण्यासाठी बँकेत जाऊन खाते बंद करायचा फॉर्म घ्यावा लागेल तो फॉर्म भरून बँक पासबुक ला तो फॉर्म जोडून द्यायचा आहे आणि त्याच बँकेत जमा करायचा आहे अशाप्रकारे तुमचे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना खाते बंद होईल अशाप्रकारे तुमचे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना खाते बंद होईल

किसान मानधन योजनेचे अकाउंट स्टेटस कसे चेक करायचे?

Kisan mandhan या ऑफिशियल वेबसाईट वरती येऊन तुम्ही तुमच्या बँकेचे संपूर्ण स्टेटस चेक करू शकता

किसान मानधन योजनेचा हेल्पलाइन नंबर काय आहे?

14434 हा किसान मानधन योजनेचा हेल्पलाइन नंबर आहे

किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दर महिन्याला जास्तीत जास्त किती पेन्शन मिळू शकते?

किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन ही मिळणार आहे

किसान मानधन योजनेसाठी कोणत्या वयोगटातील शेतकरी पात्र असणार आहे?

18 ते 40 वयोगटातील शेतकरी किसान मानधन योजनेसाठी पात्र असणार आहे

किसान मानधन योजनेचा लाभ किती वर्षानंतर शेतकऱ्याला मिळणार आहे?

किसान मानधन योजनेचा लाभ शेतकऱ्याला 60 वर्षानंतर मिळायला चालू होणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment