PM Kisan 19th installment date :पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून, शेतकऱ्यांना यंदा मोठ्या घोषणांची अपेक्षा आहे. सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, पण यंदा ही रक्कम 12,000 रुपये करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे स्पष्ट केले आहे. सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून, यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत १९वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांची रक्कम हस्तांतरित करतील. योजनेच्या १८व्या हप्त्याचे हस्तांतर ५ ऑक्टोबर रोजी वाशिममधून करण्यात आले होते. या योजनेचा देशातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होत असून, त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्रातील मोदी सरकारने २०१९ मध्ये सुरू केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपयांच्या स्वरूपात दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेद्वारे १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? असा तपासा
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी ऑनलाइन उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १९वा हप्ता मिळणार आहे की नाही, हे ते सहज तपासू शकतात. यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या नावाची नोंदणी तपासा.
- पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या (https://pmkisan.gov.in).
- ‘Farmers Corner’ वर क्लिक करा.
- ‘Beneficiary List’ पर्याय निवडा.
- आपला राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा.
- यादीमध्ये आपले नाव शोधा.
जर आपले नाव यादीत असेल, तर आपल्याला १९वा हप्ता मिळणार आहे. याशिवाय, तुमचा हप्ता थांबला असल्यास आधार क्रमांक किंवा बँक तपशील तपासण्याचे कामही ऑनलाइन करता येते.
नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश भोंगळ आहे. मी तीन वर्षापासून लॉगिन क्षेत्रात आहे मला सरकारी योजना सरकारी नोकरी विषयी लिहिण्यासाठी आवडते.