तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेटची चिंता असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. OPPO A74 5G smartphone या स्मार्टफोन वरती सध्या ऑफर सुरू आहे या मोबाईल फोनवरती तुम्हाला ₹5,500 रुपयांची बचत करता येणार आहे. यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन किफायतशीर दरात खरेदी करू शकता. चला, जाणून घेऊया या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल, किंमत आणि उपलब्ध ऑफर्स!
OPPO A74 5G चे वैशिष्ट्ये
डिस्प्ले
मित्रांनो या मोबाईलचा डिस्प्ले कंपनीने 6.5 इंच फुल एचडी डिस्प्ले त्याचबरोबर आयपीएस एलसीडी डिस्प्ले या मोबाईल मध्ये वापरण्यात आलेला आहे या फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 90Hz आपल्याला मिळणार असून त्याचबरोबर या डिस्प्ले चा 2400 * 1080 रेजोल्यूशन आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
प्रोसेसर
ओप्पो कंपनीने या मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नैपड्रैगन 480 ऑक्टा कोर चिपसेट वापरलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला या मोबाईल फोन मध्ये हा चिप्स अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम वरती कार्य करतो. त्यामुळे तुम्हाला या फोनमध्ये दमदार परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे.
कॅमेरा

या मोबाईलचा कॅमेरा बाबत बोलायचे झाले तर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला दमदार कॅमेरा पहावयास मिळणार आहे. कंपनीने मोबाईलला 48 मेगापिक्सल चा वाइड एंगल प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे. त्याच्याबरोबर 2 मेगापिक्सल चा मायक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल चा मोनो कॅमेरा दिलेला आहे.
त्याचबरोबर या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल चा आहे.
बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग चे ऑप्शन देखील मिळणार आहे. यास फोन मध्ये तुम्हाला 5000 mAH बॅटरी मिळणारच आहे त्याचबरोबर 18 वॅट फास्ट चार्जिंग हे देखील ऑप्शन देण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही दिवसभर हा फोन वापरू शकता.
किंमत आणि ऑफर
या स्मार्टफोनच्या किमती बाबत बोलायचे झाले तर कंपनीने हा फोन लॉन्च केला होता तेव्हा या फोनची किंमत 20,099 रुपये एवढी होती परंतु आता अमेझॉन कंपनीने या मोबाईल वरती 5501 डिस्काउंट ऑफर दिल्याने आता हा मोबाईल फोन तुम्हाला 15489 रुपयाला मिळू शकतो तेव्हा तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन एक उत्कृष्ट फोन खरेदी करू शकता.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…