नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे चौथ्या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे. त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण देखील महिलांच्या खात्यावर केले जाणार आहे. अशा प्रकारे राज्यातील शेतकरी व महिला यांना रक्षाबंधनाची सरकारमार्फत गिफ्ट देण्यात येणार आहे..

नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार? किती तारखेला हा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे? या हप्त्याद्वारे शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे? या योजनेचे चौथा हप्ता व पाचवा हप्ता एकत्रित मिळणार आहे का? याची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता
महाराष्ट्रामध्ये शेतकरी राजाला आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत असतात .हे पैसे नमो किसान सन्मान निधी या केंद्र शासनाच्या योजनेबरोबरच शेतकऱ्यांना मिळत असतात. परंतु पीएम किसान सन्माननिधी योजनेचा 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळालेला आहे .परंतु अजूनही नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना भेटलेला नाही.
नमो शेतकरी योजने मार्फत वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये दर चार महिन्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये भेटत असतात. परंतु काही तांत्रिक व आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अजूनही मिळालेला नाही .तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित केला जाणार आहे. याकडे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी वर्ग आतुरतेने वाट बघत आहेत.
ह्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथा हप्ता व पाचवा हप्ता एकत्रित जमा होणार आहे काय? म्हणजे या वेळेस शेतकऱ्यांना खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार काय? हा हप्ता किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे. याची संपूर्ण माहिती खाली लेखामध्ये दिली आहे. ती तुम्ही काळजीपूर्वक नीट वाचावी.
नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | नमो शेतकरी महासन्माननिधी योजना |
संबंधित राज्य | महाराष्ट्र |
योजनेची घोषणा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
लाभार्थी | राज्यातील सर्व शेतकरी |
उद्देश्य | शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे |
लाभ | वार्षिक सहा हजार रुपये |
योजनेची सुरुवात | 2023 |
अधिकृत वेबसाईट | https://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login |
नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेच्या पात्रता
- शेतकरी हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- या योजनेसाठी पीएम किसान सन्माननिधी योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहे त्यांनाच हा लाभ देण्यात येणार आहे.
- लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असावी.
- लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी.
- तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.
- आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असावे.
- पीएम किसानची ई केवायसी असणे आवश्यक आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- जमिनीचा सातबारा
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची?
नमो शेतकरी महा सन्मान निधीचे पैसे किती तारखेला होणार जमा
नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे. त्यातील पहिला आणि दुसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी एकत्रित जमा करण्यात आला होता .आणि तिसरा हप्ता हा जुलै महिन्यात देण्यात आला होता. परंतु नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वितरित केला जाईल. याकडे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. तर याबाबत शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत .त्यामुळे नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचा चौथा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.
नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्ता तारीख
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा 15 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देखील यावेळी जाहीर केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र दौरा आहे. यामुळे या निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे
नमो शेतकरी योजनेचे स्टेटस कशाप्रकारे चेक करायचे?
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व पाचवा हप्ता शेतकऱ्यांना एकत्रित मिळणार का?
तर हो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता हा एकत्रित वितरित केला जाणार आहे म्हणजेच चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे.
निष्कर्ष
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्माननिधी योजना 2023 सुरू करण्यात आलेली आहे.पी एम किसान सन्मान निधी या केंद्र शासनाच्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या या नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेद्वारे देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात.हे पैसे शेतकऱ्यांना दर चार महिन्याला तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये अशा प्रकारे देण्यात येतात.
तर वरील लेखामध्ये आपण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता याबाबतची माहिती दिलेली आहे.का हा हप्ता शेतकऱ्यांना अजून का मिळालेला नाही? आणि हा आता कधी मिळणार आहे? आणि कोणाच्या मार्फत हा हप्ता देण्यात येणार आहे आणि एकूण किती हप्त्यांचे एकत्रित वितरण करून किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे? याची संपूर्ण माहिती वरती दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आणि किती पैसे जमा होणार याची माहिती मिळाली असेल.
नमो शेतकरी योजने बाबत विचारलेले प्रश्न
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी शेतकऱ्यांना किती तारखेला मिळणार आहे?
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा 15 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेमार्फत शेतकऱ्यांना किती हप्त्यांचे किती पैसे मिळणार आहे?
नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना चौथ्या व पाचवा हप्ता एकत्रित वितरित केला जाणार आहे चौथ्या हप्त्याचे 2000 आणि पाचव्या हप्त्याचे 2000 असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण कोणामार्फत केले जाणार आहे?
नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.
नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या पात्रता काय आहे?
शेतकरी हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
या योजनेसाठी पीएम किसान सन्माननिधी योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहे त्यांनाच हा लाभ देण्यात येणार आहे.
लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असावी
लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी
तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.
आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असावे
पीएम किसानची ई केवायसी असणे आवश्यक आहे

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…