namo mahasanman nidhi yojana maharashtra 2024: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत 4 था हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्याकरीता प्रशासकीय खर्चासाठी निधींचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनांच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आहे, त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रति वर्ष प्रति शेतकरी 6000/- रुपये या अनुदानांमध्ये राज्य शासनाची आणखी 6000/- रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास कृषी व पदुम विभागाच्या दिनांक 15 जुन 2023 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता
सदरच्या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै या करीता लाभार्थ्यांना अदा करण्याकरीता 2041.25 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास व योजना अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये 20.41 कोटी असा एकुण 2061.66 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
सदरचा निधी हा लहान / सीमान्त शेतकऱ्यांची व शेतमजुरांची योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, अर्थ सहाय्य या लेखाशिर्षाखाली खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच सदर निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त शासनांस सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता | या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
namo mahasanman nidhi yojana maharashtra 2024
योजनेचे नाव | नमो शेतकरी महासन्माननिधी योजना |
संबंधित राज्य | महाराष्ट्र |
योजनेची घोषणा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
लाभार्थी | राज्यातील सर्व शेतकरी |
उद्देश्य | शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे |
लाभ | वार्षिक सहा हजार रुपये |
योजनेची सुरुवात | 2023 |
अधिकृत वेबसाईट | https://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login |
नमो शेतकरी योजना काय आहे?
ज्याप्रमाणे केंद्रशासन पी एम किसान सन्माननिधी योजना शेतकऱ्यांसाठी राबवते त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासन नमो शेतकरी योजना ही राबवत आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात
पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 6 000व राज्य शासनाचे असे एकूण दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा होत असतात हे पैसे दर चार महिन्याला तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जात असतात
नमो शेतकरी योजनेच्या पात्रता
- लाभार्थी शेतकरी मूळ महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- पी एम किसन सन्मानित योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहे ते नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील
- लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी
- लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी
- नमो शेतकरी योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांच आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावे
- योजनेचा लाभ घेण्यासाठी e-kYC करणे आवश्यक आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जमिनीचा ७/१२
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
namo shetkari Yojana 4th installment Date|नमो शेतकरी योजनेचा 4 हप्ता या तारखेला होणार जमा,लवकर पहा
नमो शेतकरी योजनेसाठी अर्जप्रक्रिया कशाप्रकारे करायची?
नमो शेतकरी योजनासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. PM किसान सम्मान निधी योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. पी एम किसान योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र असतात.जर तुम्ही PM किसान सम्मान निधी योजनासाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ मिळेल
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी कशी चेक करायची?
- नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- मुख्यपृष्ठाच्या वरच्या उजव्या बाजूला “लाभार्थी स्थिती” टॅब शोधा
- “लाभार्थी स्थिती” टॅबवर क्लिक करा.
- कॅप्चा कोडसह तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
- तपशील प्रविष्ट केल्यानंतर “डेटा मिळवा” वर क्लिक करा.
- नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल.
- डाउनलोड बटणावर क्लिक करून तुम्ही नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी PDF देखील डाउनलोड करू शकता.
pm kisan samman nidhi yojana, online application form list प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2024
नमो शेतकरी योजनेच्या अर्जाची स्थिती कशी चेक करायची?
- नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट्सवर जा ( nsmny.mahait.org )
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला लाभार्थी स्थिती टॅब दिसेल
- लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.
- माहिती भरा, जसे की मोबाइल नंबर किंवा नोंदणी क्रमांक, त्यानंतर कॅप्चा कोड टाका
- माहिती भरून झाल्यानंतर get mobile OTP यावरती क्लिक करा
- आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.तो ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
- आता स्टेटस चेक करा बटनावरती क्लिक करा
- अशाप्रकारे नमो शेतकरी योजनेची लाभार्थी अर्जाची स्थिती तुम्हाला दिसेल.