Mukhymantri annpurna Yojana Maharashtra 2024: महाराष्ट्र राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकारच्या नवनवीन योजना घेऊन येत आहेत. त्याचप्रमाणे आता राज्यातील महिलांना 1 वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी राज्यातील 52.16 लाख लाभार्थी पात्र आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थ्यांच्या कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
आपल्याला या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास, या योजनेसाठी ची पात्रता कागदपत्रे हे सर्वांची माहिती खाली दिलेली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |
योजनेची घोषणा | 28 जून 2024 |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्रातील रहिवासी |
उद्देश्य | गरीब कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर पुनर्भरण करण्यासाठी आर्थिक मदत करणे |
अधिकृत वेबसाईट | Mukhymantri annpurna Yojana |
Mukhymantri annpurna Yojana काय आहे?
देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे. देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी इंधन पुरवणे. यातून गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे.
या उद्देशाने केंद्र शासनाने 2016 साली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे मात्र कुटुंबांना गॅस मिळाले होते.
परंतु महाराष्ट्रात सद्य स्थितीमध्ये उज्वला योजनेचा लाभ घेणारे तसेच गरीब कुटुंबातील वर्गाला गॅस सिलेंडर मिळवून देखील त्यांना गॅस सिलेंडरचे पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नसल्याने,
ते गॅस सिलेंडर संपल्यानंतर वृक्षतोड करून स्वयंपाकासाठी इंधन गोळा करतात व यातून पर्यावरणाला आणि पोहोचवतात हे शासनाच्या लक्षात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने सन 2024 -25 यावर्षी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री यांना पूर्ण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजना व माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.
Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
Mukhymantri annpurna Yojana उद्देश्य
- देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे.
- देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी इंधन पुरविणे.
- गरीब कुटुंबातील महिलांचे आरोग्य महिन्यात सुधारणा घडवून आणणे व स्त्री सक्षमीकरण करणे.
- इंधनासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने वर्षाला 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे
- या योजनेद्वारे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजना व राज्यातील माझी लाडकी बहीण योजने साठी पात्र असलेल्या सर्व कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या पात्रता
- महिलाच्या नावाने गॅस जोडणी असणे आवश्यक आहे.
- सद्यस्थितीत महाराष्ट्रात प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ 52.16 लाख लाभार्थी घेत आहेत ते सर्व या योजनेसाठी पात्र असतील
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी देखील या योजनेसाठी पात्र असतील
- शिधापत्रिकेप्रमाणे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- 1 जुलै 2024 पर्यंत ज्यांचे शिधापत्रक ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे लाभ मिळणार आहे.
- या योजनेसाठी लाभार्थ्याला आधी गॅस सिलेंडरचे पैसे भरावे लागणार आहेत व नंतर ते केंद्र सरकारद्वारे डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.
- लाभार्थ्याची कुटुंब सदस्य संख्या पाच असली पाहिजे.
- ही योजना फक्त 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांना लागू असणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वय प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- शिधापत्रिका
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- गॅस सिलेंडरचे पासबुक
- बँक खाते
Mukhymantri annpurna Yojana 2024 online apply
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- आपल्याला अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे.
- आपल्यासमोर एक होमपेज ओपन होईल त्यावरती online apply बटनावरती क्लिक करा.
- आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्म वरती आवश्यक माहिती भरून लागणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- आता सबमिट बटन वरती क्लिक करा.
- अशाप्रकारे आपण या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करू शकतात.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजने बाबतची कार्यपद्धती खालील प्रमाणे
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत होत असते.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतही लाभार्थ्यांना ३ गॅस सिलेंडर तेल कंपन्या मार्फत दिले जाणार आहेत.
सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्वला योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचे वितरणाची किंमत बाजारभावानुसार 830 रुपये आहे
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून ३०० रुपयाची सबसिडी ही ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाइन जमा केले जाते.
याच प्रकारे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यायची रक्कम अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडरअसणार आहे.
इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्या कडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची यादी दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी.
ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही
प्रत्येक जिल्ह्या नुसार गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये फरक आहे त्यानुसार सरकार तेल कंपन्यांना रक्कम देणार आहे.
तेल कंपन्यांना जिल्हा निहाय रक्कम अदा करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय यांची राहील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतची कार्यपद्धती
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायचे तीन सिलेंडर चे वितरण देखील तेल कंपन्या मार्फत होणार आहे.
सदर लाभार्थ्याला एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी भेटणार नाही.
या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर ठाणे शहर क्षेत्रामध्ये तसेच मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्र तसेच अन्नक्षेत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडर साठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी वेगवेगळ्या समिती घटित करण्यात आलेले आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरतील?
प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये एका वर्षात किती सिलेंडर मोफत मिळणार आहेत?
या योजनेनुसार एका वर्षात तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश काय आहे?
राज्यातील महिलांना धुरमुक्त जीवन जगता यावे, त्यांचे सक्षमीकरण घडून यावे सिलेंडर साठी त्यांना आर्थिक सहाय्य करणे व पर्यावरणाचे रक्षण करणे.