mukhyamantri vayoshri yojana maharashtra 2024:महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी बेरोजगार तरुणांसाठी तसेच दारिद्र रेषेखालील लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते त्यामध्ये अपंग व्यक्ती ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी देखील एखादी योजना आणणे गरजेचे होते हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने अपंगत्व असलेल्या नागरिकांसाठी त्याचप्रमाणे 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू केली आहे
या योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील अपंगत्व/ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अक्षमतेनुसार उपकरणे देऊन त्यांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात गती निर्माण व्हावी त्यांचे जीवन मनमोकळेपणाने त्यांना जगता यावे यासाठी सरकार त्यांना उपकरणे देणार आहे
तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र त्याचप्रमाणे कौटुंबिक मानसिक स्वास्थ्य आबादीत ठेवून एक अनुकूल समाज निर्माण करता यावा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने वयोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
mukhyamantri vayoshri yojana maharashtra 2024
सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्या 11.24 कोटी एवढी आहे. त्यापैकी 65 वयापेक्षा जास्त व्यक्तींची संख्या अंदाजे 1.5 कोटी एवढी आहेज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्व समस्यांचा सामना करावा लागत असतो हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने दारिद्र रेषेखालील अपंग व तसेच 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी वयोश्री योजना सुरू केली आहे
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अपंगत्वानुसार उपकरणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत यामार्फत त्यांना मानसिक स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्र या मार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहेत आणि याच दरम्यान त्यांना 3000 रुपये प्रति महिना डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर खाली या योजनेच्या पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया यांची संपूर्ण माहिती दिली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी
वयोश्री योजनेचा उद्देश्य
राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रु. ३०००/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे.
नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता
वयाश्री योजनेचा फायदा
सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/ दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने / उपकरणे खरेदी करता येतील. उदा:-
- चष्मा
- श्रवणयंत्र
- ट्रायपॉड
- स्टिक व्हील
- चेअरफोल्डिग
- वॉकरकमोड
- खुर्ची
- नि-ब्रेसलंबर
- बेल्टसर्वाइकल
- कॉलर इ.
तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनः स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
वयोश्री योजना पात्रता आणि निकष
- सदर योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यन्त वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील).
- ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
- उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.२ लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा
- सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
- मात्र दोषपूर्ण / अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात रु. ३०००/- थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
- निवड / निश्चित केलेल्या जिल्हयात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असतील.
मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे
- आधारकार्ड / मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- स्वयं-घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
mukhyamantri vayoshri yojana apply online
वयोश्री योजनेसाठी अजून ऑनलाईन वेबसाईट सरकारमार्फत जाहीर केलेली नाही तरी आपण खाली दिलेला फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यावरती संपूर्ण माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तो फॉर्म तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन जमा करायचा आहे
vayoshri yojana form
महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत नोंदणी फॉर्ममध्ये खालील माहिती भरायचे आहे
- वैयक्तिक माहितीचे तपशील – जसे तुमचे नाव, वडिलांचे नाव, लिंग, जन्मतारीख, उत्पन्न, आधार क्रमांक, मोबाइल नंबर. पत्ता आणि पत्रव्यवहार तपशील – राष्ट्रीयत्व, निवासाचा प्रकार, राहण्याचे ठिकाण, राज्य, जिल्हा, तहसील, गाव प्रभाग क्रमांक, पिन कोड इ. उत्पन्नाचा तपशील – उत्पन्नाचा दाखला क्रमांक शारीरिक तपशील – उमेदवाराच्या शारीरिक स्थितीबद्दल माहिती इ. स्वघोषणापत्र – उपकरणे तपशील –
Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
mukhyamantri vayoshri yojana maharashtra form pdf | https://drive.google.com/file/d/1cczKy-YoaGBZQQnBNZ9Kg1adRzZJZ6tD/view?usp=drivesdk |
mukhyamantri vayoshri yojana gr pdf | https://drive.google.com/file/d/1cnRCFPd7jFkrbn1V9vQVG4Z1znH9ufLP/view?usp=drivesdk |