Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 Apply: महाराष्ट्र मध्ये अनेक जाती धर्माचे लोक वास्तव्य करतात. त्यांना वृद्धापणाच्या काळामध्ये आपापल्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यायचे असते. परंतु काही कारणांमुळे प्रत्येकाला ते शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केलेली आहे.
बांधकाम कामगारांवर पैशाचा पाऊस कामगारांना मिळणार 6 लाख रुपये Bandhkam kamgar Yojana 2024 benifits
ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्या सर्वांना देशातील व राज्यातील तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शन घेता येणार आहे. याबाबतचा निर्णय हा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील एकूण 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश केला गेलेला आहे.राज्य सरकार व केंद्र सरकार देशातील विविध घटकांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते.
त्यातच आता वृद्धांसाठी देखील ही मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणल्यामुळे वृद्धां मध्ये देखील आनंदाचे वातावरण तयार झाले आहे .मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना देवाचे दर्शन घडवून त्यातून अध्यात्म व शांती निर्माण व्हावी हा सरकारचा मुख्य उद्देश्य आहे.
माझा लाडका शेतकरी योजना शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये ladka shetkari yojana maharashtra online apply
या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना केवळ एक वेळेसच मोफत दर्शन घेण्याच्या लाभ घेता येणार आहे. देशातील मोठ-मोठ्या तीर्थक्षेत्रांचा या योजनेत समावेश केलेला आहे
यामध्ये सरकार प्रत्येक व्यक्ती मागे 30 हजार रुपये खर्च करणार आहे या योजने बाबत काही अटी घालून दिलेले आहेत. या योजनेचा लाभासाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायचे याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचा.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana माहिती
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य शासन |
लाभार्थी | 60वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक |
लाभ | मोफत तीर्थ दर्शन |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा उद्देश
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना या वयामध्ये देशातील मोठ मोठ्या तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शन मिळावे व त्यांच्यामध्ये शांती व चैतन्य निर्माण व्हावे यासाठी ही योजना सुरू केलेली आहे
या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचे राहणीमान सुधारेल अशी सरकारला अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ
- राज्यातील साठ वर्षे व अधिक वय असलेल्या व्यक्तींना मोफत तीर्थ दर्शन घडावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
- या योजनेत एकूण भारतातील 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थ क्षेत्रांचा समावेश आहे
- लाभार्थ्यांसाठी या योजनेत प्रतिव्यक्ती प्रवास जेवण व निवासासाठी तीस हजारापर्यंत रुपये सरकार देणार आहे
- या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन ऑफलाइन अर्ज प्रक्रिया करता येणार आहे
- अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पात्रता
- या योजनेसाठी लाभार्थी हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे
- व्यक्तीचे वय 60 किंवा त्यापेक्षा अधिक असावी
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावी
- संबंधित व्यक्तीचे मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी असायला पाहिजे
- कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरात नसावी
- व्यक्ती सेवा निवृत्ती नंतरचे निवृत्तीवेतन घेत असल्यास ते या योजनेसाठी अपात्र ठरतील
- कुटुंबातील सदस्य नोकरीत नसावा
- कुटुंबातील सदस्य आमदार खासदार अशा पदावर कार्यरत नसावी
- ज्येष्ठ नागरिकांकडे चार चाकी वाहन नसावे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- ज्येष्ठ नागरिकाचे आधार कार्ड
- योजनेचा अर्ज
- मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- जवळच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर
- हमीपत्र
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 Apply
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ज्या नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्यात अडचण येत असल्यास त्यांनी सेतू कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी या योजनेसाठी अजून कोणतेही पोर्टल व मोबाईल ॲप उपलब्ध नसल्याने सध्या या योजनेसाठी नागरिक अर्ज प्रक्रिया करू शकत नाही त्यामुळे जेव्हा सरकार वेबसाईट उपलब्ध करून देईल तेव्हा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे आणि जिल्हे
सिद्धिविनायक मंदिर मुंबई
विश्व विपश्यना पॅगोडा गोराई मुंबई
चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ क्यॅवेल मुंबई
सेंट अँड्र्यू चर्च मुंबई मुंबई
माउंट मेरी चर्च वांद्रे मुंबई
चैत्यभूमी दादर मुंबई
महालक्ष्मी मंदिर मुंबई
वाळकेश्वर मंदिर मलबार हिल मुंबई
मुंबादेवी मंदिर मुंबई
सेंट जॉन द ब्याप्टीस चर्च, सीपझ औद्योगिक क्षेत्र अंधेरी मुंबई
सेंट जॉन द बॅटरी चर्च मरोळ मुंबई
गोदीजी पार्श्वंत मंदिर मुंबई
नेसेट एलियाहू सिनेगॉग मस्जिद भंडार मुंबई
मॅगेन डेव्हिड सिनेमा ग भायखळा मुंबई
सेंट जॉन द ब्याप्टीस चर्च ठाणे
अग्यारी / अग्निमंदिर ठाणे
मयुरेश्वर मंदिर मोरगाव पुणे
चिंतामणी मंदिर थेऊर पुणे
चिंतामणी मंदिर थेऊर पुणे
महागणपती मंदिर रांजणगाव पुणे
खंडोबा मंदिर जेजुरी पुणे
संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू पुणे
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड पुणे
संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी पुणे
शिखर शिंगणापूर सातारा
संत चोखामेळा समाधी पंढरपूर सोलापूर
संत सावता माळी समाधी मंदिर अरण ता. माढा सोलापूर
विठोबा मंदिर पंढरपूर सोलापूर
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर
ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
जैन मंदिर कुंभोज कोल्हापूर
संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती छत्रपती संभाजी नगर
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ छत्रपती संभाजी नगर
जैन स्मारके एलोरा लेणी छत्रपती संभाजी नगर
तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिव
श्री संत नामदेव महाराज देवस्थान उब्रज तालुका कंधार नांदेड
खंडोबा मंदिर मालेगाव नांदेड
गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब नांदेड नांदेड
गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब नांदेड नांदेड
रेणुका देवी मंदिर माहूर नांदेड
मुक्तिधाम नाशिक
संत निवृत्तीनाथ समाधी त्रंबकेश्वर जवळ नाशिक
विघ्नेश्वर मंदिर ओझर नाशिक
त्र्यंबकेश्वर शिवमंदिर त्रंबकेश्वर नाशिक
जैन मंदिरे मांगी तुंगी नाशिक
गजपंथ नाशिक
सप्तशृंगी मंदिर वनी नाशिक
काळाराम मंदिर नाशिक
बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड
संत गजानन महाराज मंदिर शेगाव बुलढाणा
एकविरा देवी कारला पुणे
दत्त मंदिर औदुंबर सांगली
केदारेश्वर मंदिर बीड
वैजनाथ मंदिर परळी बीड
अष्टदशभूज रामटेक नागपूर
दीक्षाभूमी नागपूर
संत साईबाबा मंदिर शिर्डी अहमदनगर
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर
शनी मंदिर शनिशिंगणापूर अहमदनगर
श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डी अहमदनगर
गणपतीपुळे रत्नागिरी
मारलेश्वर मंदिर रत्नागिरी
पावस रत्नागिरी
महाकाली देवी चंद्रपूर
श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर सातारा
चिंतामणी कळंब यवतमाळ
भारतातील तीर्थक्षेत्र राज्य
वैष्णोदेवी मंदिर कटरा जम्मू आणि काश्मीर
अमरनाथ गुहा मंदिर जम्मू आणि काश्मीर
सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब
अक्षरधाम मंदिर दिल्ली दिल्ली
श्री दिगंबर जैनलाल मंदिर दिल्ली
श्री लक्ष्मी नारायण मंदिर दिल्ली
बद्रीनाथ मंदिर चमोली उत्तर उत्तराखंड
गंगोत्री मंदिर उत्तरकाशी उत्तराखंड
नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश उत्तराखंड
नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश उत्तराखंड
नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश उत्तराखंड
यमुनोत्री मंदिर उत्तरकाशी उत्तराखंड
वैद्यनाथ धाम देवघर झारखंड
काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी उत्तर प्रदेश
इस्कॉन मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश
श्रीराम मंदिर अयोध्या उत्तर प्रदेश
सूर्य मंदिर कोणार्क ओरिसा
श्री जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा
लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओरिसा
मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर ओरिसा
कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी आसाम
महाबोधी मंदिर गया बिहार
रणकपुर मंदिर पाली राजस्थान
अजमेर दर्गा राजस्थान
द्वारकाधीश मंदिर द्वारका गुजरात
राजस्थान सोमनाथ मंदिर वेरावल गुजरात
नागेश्वर मंदिर द्वारका गुजरात
सांची तूप सांची मध्य प्रदेश
खजुराहो मंदिर खजुराहो मध्य प्रदेश
महाकाली मंदिर उज्जैन मध्य प्रदेश
ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडोबा मध्य प्रदेश
श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम कर्नाटक
गोमटेश्वर मंदिर श्रवणबेळगोळ कर्नाटक
विरुपाक्ष मंदिर हम्पी कर्नाटक
चेन्नई केशव मंदिर बेलूर कर्नाटक
अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरानाडू कर्नाटक
महाबळेश्वर मंदिर गोकर्ण कर्नाटक
भूतनाथ मंदिर बदामी कर्नाटक
मुर्डेश्वर मंदिर मुर्डेश्वर कर्नाटक
आय हॉल दुर्गा मंदिर आय होल कर्नाटक
श्रीकृष्ण मंदिर उडुपी कर्नाटक
वीर नारायण मंदिर बेलावडी कर्नाटक
तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला आंध्र प्रदेश
मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैल्यम आंध्र प्रदेश
बृहदिशवर मंदिर तंजावर तमिळनाडू
मीनाक्षी मंदिर मदुराई तमिळनाडू
रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम तमिळनाडू
कांचीपुरम मंदिर कांचीपुरम तमिळनाडू
रंगनाथ स्वामी मंदिर स्त्रीची तमिळनाडू
सारंगपाणी मंदिर कुंभकर्ण तमिळनाडू
अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवन्ना मलाई तमिळनाडू
मुरुगण मंदिर तिरूचेंदूर तमिळनाडू
किनारा मंदिर महाबलीपुरम तमिळनाडू
कैलास नाथ मंदिर कांचीपुरम तमिळनाडू
एकंबलेश्वर मंदिर कांचीपुरम तमिळनाडू
श्री पद्मनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम केरळ
गुरुवायूर मंदिर गुरुवायूर केरळ
वडकनाथ मंदिर त्रिशूल केरळ
पार्थसारथी मंदिर अरण मुला केरळ
शबरीमाला मंदिर पथनामथीट्टा केरळ
अट्टूकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम केरळ
श्रीकृष्ण मंदिर गुरुवायूर केरळ
तिरूमिल्ली मंदिर वायनाड केरळ
वेकोम महादेव मंदिर वर्कला केरळ
तिरवल्ला मंदिर तिरुमल्ला केरळ
शिवगिरी मंदिर वर्कल्ला केरळ
श्री सम्मेद शिखरजी गिरीडीह झारखंड
शत्रुंजय हिल गुजरात गिरनार गुजरात
देवगड उत्तर प्रदेश पावापुरी बिहार
रणकपुर राजस्थान भीलवाडा टेम्पल राजस्थान
उदयगिरी मध्य प्रदेश
Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना
निष्कर्ष
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली असून या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राज्य व देशातील तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शन देण्यात येणार आहे या योजनेसंबंधीच्या पात्रता अर्ज प्रक्रिया लाभ योजनेचा संपूर्ण तपशील तसेच योजनेचा उद्देश्य यांची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघितली आहे. या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास आपण वरील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी नागरिकांचे वय किती असावे?
नागरिकांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये एकूण किती तीर्थक्षेत्राचे दर्शन घेता येणार आहे?
या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 66 व भारतातील 73 तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शन घेता येणार आहे
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी सरकार प्रतिव्यक्ती किती रुपये खर्च करणार आहे?
योजनेद्वारे प्रतिव्यक्ती एकूण 30 हजार रुपये खर्च प्रवास जेवण आणि निवास यासाठी करणार आहे