मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असा भरा ऑनलाइन फॉर्म | OTP ची गरज नाही | आता होणार फॉर्म झटपट मंजुर |Majhi ladki bahin online from prosess 2024

Majhi ladki bahin online from prosess 2024:काही महिलांचा माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर होत नाही.असे दिसत आहे. तर हा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नवीन पद्धत सरकारने सुरू केली आहे . त्यानुसार तुम्ही फॉर्म भरल्यास तुमचा फॉर्म हा मंजूर होणार आहे . तर त्या नवीन अपडेट नुसार बिना OTP कसा भरायचा ते आपण आज पाहणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये सध्या माझी लाडकी बहीण या योजनेची जोरदार चर्चा चालू आहे.तर या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नवीन पद्धत आलेली आहे. त्या ऑनलाईन पद्धतीने नुसार ऑनलाइन फॉर्म कशाप्रकारे बिना ओटीपी भरायचा.याची संपूर्ण माहिती आपण यामध्ये स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. तरी ती तुम्ही शेवटपर्यंत पहावी .

Majhi ladki bahin online from prosess 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2024! याच महिलांना मिळणार 3000 रुपये! तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर करावे लागेल अशी प्रक्रिया?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थोडक्यात माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
घोषणाएकनाथ शिंदे
लाभार्थीमहाराष्ट्रातील सर्व महिला
उद्देशमहिलांना आर्थिक मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे
लाभमहिलांना दर महिना दीड हजार रुपये मिळणार आहे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन आणि ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरुवात15 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक31 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना राज्यातील गरीब महिलांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची घोषणा केली.

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश्य राज्यातील महिलांना इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या गरजा पूर्ण करता याव्यात हा आहे.

या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना दर महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर वर्षामध्ये तीन सिलेंडर देखील मोफत देण्यात येणार आहे.यासाठी राज्यातील 21 ते 60 वयोगटातील सर्व महिला पात्र असणार आहे. या मागचा सरकारचा एकच उद्देश आहे की महिलांना आत्मनिर्भर बनविणे.

पात्रता

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपया पेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे.
  • अधिवास प्रमाणपत्रप्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक
  • वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
    • अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
    • ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • नवविवाहितेच्या बाबतीतरेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
  • बँक खाते तपशील(खाते आधार लिंक असावे)
  • लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते पहा|Majhi ladki bahin online from prosess 2024

  • महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदार लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • यावरती तुमचे अकाउंट असेल तर तुम्ही तेथे तुमचा मोबाईल नंबर व कॅपच्या कोड टाकून लॉगिन करू शकता.
  • पण यावरती तुमचे अकाउंट नसेल तर तुम्हाला खाली खाते नाही खाते तयार करा या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्यावर तुम्हाला खाते तयार करायचे आहे.
  • सुरुवातीला तुमचे नाव टाकून जे आधार कार्ड वरती आहे ते नाव तुम्हाला इंग्लिश मध्ये टाकायचे आहे.
  • त्यानंतर मोबाईल नंबर टाकून एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्या पासवर्डची पुष्टी करून घ्यायची आहे.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा ,तालुका, गावाचे नाव आणि तुमच्या गावांमध्ये जर महानगरपालिका, नगरपालिका हे असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करून घेऊ शकता नाही तर ग्रामपंचायत वगैरे असेल तर लागू नाही या बटणावरती क्लिक करा.
  • आता authorised person या पर्यायावर ती क्लिक करून. तुम्ही जे काही काम करत असाल त्यावर ती ते सिलेक्ट करा. आणि turms and conditions यांचा स्वीकार करून sign up या बटणावरती क्लिक करा.
  • आता तुमचे अकाउंट तयार केले जाईल.
  • आता परत होमपेज वरती येऊन अर्जदार लॉगिन बटणावरती क्लिक करायचे आहे.
  • तेथे तुमचा मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो टाकून कॅपच्या कोड तिथे टाकायचा आहे आणि लॉगिन बटणावरती क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला होमपेज वरती डाव्या बाजूला भाषा सिलेक्ट करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.
  • त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन भाषा आहेत त्यापैकी तुम्हाला जी काही योग्य वाटेल त्यावर ती क्लिक करा.
  • आता होम पेज वरचा दोन नंबरचा पर्याय माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यावरती क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला ज्या कोणत्याही महिलेचा फॉर्म भरायचा आहे त्या महिलाचा आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे. आणि खाली दिलेल्या कॅपच्या कोड टाकून व्हॅलिडीडेटेड आधार या बटनावर क्लिक करायचे आहे.

नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता | या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

  • आता तुमच्यासमोर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ओपन होईल. त्यावर ते तुम्हाला खालील माहिती भरायची आहे
    • महिलेचे जे आधार कार्ड वरती नाव आहे ते पूर्ण इंग्लिश मध्ये टाकायचे आहे
    • वडील किंवा पतीचे नाव यामध्ये जर ज्या महिलांचे लग्न नाही झाले त्यांनी वडिलांचे नाव टाकावे व त्यांचे लग्न झालेले आहेत त्यांनी आपल्या पतीचे पूर्ण नाव टाकायचे आहे
    • त्यानंतर लग्नापूर्वीचे नाव विचारले जाईल लग्न झालेले असेल तर ते टाकायचे आहे आणि लग्न झालेले नसेल तर तो पर्याय सोडून द्यायचा आहे
    • तुमची वैवाहिक या पर्यायांमध्ये तुम्ही विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटीत निराधार या पर्यायातून एक पर्याय निवडून घ्यायचा आहे
    • त्यानंतर जन्मतारीख {महिना /दिवस /वर्ष }याप्रकारे टाकायचे आहे.
    • आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का या पर्यायांमध्ये हा किंवा नाही एक सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
    • आता आधार कार्ड वरील अर्जदाराचा पत्ता इंग्लिश मध्ये टाकायचा आहे.
    • त्यानंतर पिन कोड टाकायचा आहे.
    • जिल्हा तालुका गावाचे नाव अशी संपूर्ण माहिती सेलेक्ट करून भरून घ्यायची आहे.
    • त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका असेल तर सिलेक्ट करा आणि ग्रामपंचायत वगैरे असेल तर लागू नाही या बटणावरती क्लिक करा.
    • मतदार संघ या पर्यायांमध्ये तुमचा जो काही मतदारसंघ असेल तो निवडून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे.
    • तुम्ही जर शासनाची तर योजनांचा लाभ घेत असाल तर होय किंवा नाही या बटनावरती क्लिक करायचे आहे.
    • जर लाभ घेत असाल तर त्या योजनेचे नाव आणि महिन्याला किती पेन्शन मिळते ते रक्कम टाकायची आहे.
  • आता तुम्हाला बँकेची माहिती भरायची आहे.

Pm SuryaGhar muft bijali Yojana | प्रधानमंत्री सूर्यघर योजना,३०० यूनिट वीज मोफत मिळणार |बसवा सौर ऊर्जा पॅनल फ्री मध्ये

  • त्यामध्ये बँकेचे नाव महिलेचे पासबुक वरील नाव खाते नंबर टाकून त्या ची पुष्टी करण्यासाठी पुन्हा एकदा अकाउंट नंबर IFCIS नंबर टाकून घ्यायचा आहे.
  • बँकेला आधार कार्ड लिंक आहे का? यावर क्लिक करून होय निवडायचे आहे.
  • आता नवीन पद्धतीची कागदपत्रे अपलोड करायची आहे त्यामध्ये कागदपत्राची 50 केबी ते 5 एमबी पर्यंत साईज असायला पाहिजे.
  • त्या म्हणते तुमचे आधार कार्ड ची मागील व पुढील बाजू अपलोड करायची आहे.
  • डोमोसाईल/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला/ पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/ पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड यापैकी एक कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे.
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास होय बटनावरती क्लिक करा. आणि रेशन कार्ड ची समोरील बाजू ज्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव असते ती व मागील बाजू ज्यामध्ये कुटुंब सदस्यांची संख्या असते. ती अपलोड करून घ्यायचे आहे. आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसल्यास नाही या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे अपलोड करून घ्यायचे आहे.

नमो शेतकरी योजना 4 था हप्ता तारीख 2024|शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये या तारखेला जमा होणार थेट बँक खात्यात पहा माहिती

  • आता अर्जदाराचे हमीपत्र त्यामध्ये सही तारीख सर्व माहिती टाकून स्वीकार करायचा आहे. आणि ते अपलोड करून घ्यायचे आहे.
  • यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे.
  • यानंतर हा फॉर्म चेक करून घ्या आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा.
  • अशाप्रकारे नवीन पद्धतीने तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता हा फॉर्म योग्यरित्या भरला आहे. की नाही हे चेक करण्यासाठी होमपेज वरती यायचे आहे. आणि यापूर्वी केलेले अर्ज या पाटणावरती क्लिक करायचे आहे.
  • आता तिथे तुम्ही भरलेला फॉर्म दिसेल. त्यावर मोबाईल नंबर नाव एप्लीकेशन नंबर फोटो स्टेटस तुम्हाला दिसे..
  • हा फॉर्म चेक होईल रियू मध्ये जाईल तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असेल तर तुमचा फॉर्म हा मंजूर होईल.
  • अशाप्रकारे आपण माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन पद्धतीने फॉर्म कशाप्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे.

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून सरकारी चे अधिकृत वेबसाईट सुरू केलेली आहे. हे ॲप्स द्वारे महिला घरबसल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता.
तर या संबंधीची नवीन अपडेट नुसार माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ती माहिती पाहून तुम्ही घरबसल्या देखील माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता..त्यासाठी वरील लेख काळजीपूर्वक वाचावा.