Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा

Majhi ladaki bahin Yojana online apply Maharashtra official website

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावमाझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील सर्व महिला
लाभदर महिना 1500 रुपये
योजनेची घोषणामुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2024 अर्थसंकल्पामध्ये
अर्ज प्रक्रियाऑफलाइन व ऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

Mukhymantri annpurna Yojana Maharashtra 2024;महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 1 वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत, त्यासाठी अशा प्रकारे करावे लागणार अर्ज

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा?

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन प्रकारे अर्ज करण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यापैकी एक मोबाईलवर नारीशक्तीदूत ॲप च्या डाऊनलोड करून त्याद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता.दुसरा मार्ग म्हणजे राज्य शासनाने एक ऑगस्ट 2024 पासून माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे त्याद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिलांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

नारीशक्तीदूत ॲपच्या साह्याने कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा?

  • सर्वप्रथम आपल्याला play Store वरती जाऊन नारीशक्तीदूत ॲप डाऊनलोड करून इंस्टॉल करायची आहे.
  • नारीशक्ती ॲप ओपन ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर terms and condition चा स्वीकार करून लॉगिन बटनावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती otp मिळेल तो otp नारीशक्तीदूत ॲप मध्ये टाकून verify बटणावरती क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमची सर्व माहिती तिथे टाकायची आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी होमपेज वरती यावे लागेल तिथे तुम्हाला लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म लिंक मिळेल त्याच्यावरती क्लिक करा.
  • माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यावरती तुमची वैयक्तिक तसेच कौटुंबिक माहिती तिथे टाकायची आहे.
  • तिथे खाली सबमिट करायचे बटन असेल तिथे तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही या आधी शासनाच्या कोणत्या योजना चा लाभ घेत आहेत का घेत असेल तर yes वरती क्लिक करा घेत नसाल तर no वरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर बँक खाते नंबर बँकेचा IFSC नंबर टाकायचा आहे आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • याच्यानंतर तुम्हाला Accpect हमीपत्र disclaimer पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि नंतर माहिती जतन करा या विकल्पावरती क्लिक करायचे आहे
  • आता आपण टाकलेली सर्व माहिती आपल्यासमोर दिसायला सुरुवात होईल ती आपण चेक करून सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपण नारीशक्ती ॲप द्वारे अर्ज प्रक्रिया करू शकता.

Majhi ladaki bahin Yojana online apply Maharashtra official website:

  • सर्वप्रथम तुम्हाला https://mukhyamantrimajhiladkibahinyojana.in/ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे.
  • त्यानंतर मेनू ऑप्शन वरती क्लिक करून अर्जदार लॉगिन पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
  • तिथे तुम्हाला doesn’t have create account विकल्पावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ओपन होईल.
  • त्यावरती तुमची गाव जिल्हा सर्व माहिती टाकायचे आहे.
  • ज्याप्रमाणे तुमची आधार कार्डवर आहे.
  • त्यानंतर तुमचा पासवर्ड आणि municipal corporation निवडून terms and condition चा स्वीकार करायचा आहे.
  • captcha code टाकून sign up वरती क्लिक करायचे आहे.
  • आता परत मेनू वरती येऊन Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana link वरती क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर एक नवीन पेज येईल तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून send otp वरती क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आधार कार्ड वरून मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP टाकून verify वरती क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर,पतीचे नाव, गावाचे नाव,तालुका,जिल्हा आणि बँकेचा IFSC नंबर इत्यादी माहिती टाकून सबमिट करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला विचारले जाईल तुमचा आधार कार्ड नंबर बँकेची लिंक आहे की नाही तिथे तुम्हाला yes वरती क्लिक करायचे आहे.
  • अर्ज करण्याच्या आधी तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायचे आहे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला या दोन्हीपैकी एक अपलोड करा.
  • यानंतर Do You Have An Orange Or Yellow Ration Card? यावर ती क्लिक करायचे आहे
  • यानंतर शिधापत्रिकेचा पहिल्या पानाचा आणि शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करायचा आहे
  • जर आपल्याकडे पिवळे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला देखील अपलोड करू शकता.
  • यानंतर आम्ही पत्र आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करून Accpect हमीपत्र disclaimer पर्यावर क्लिक करून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Mazi Ladki bahin Yojana आपल्या अर्जाची स्थिती चेक करा अशा प्रकारे

Mukhymantri man ki ladki bahan Yojana साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असेल तर त्याची यादी नगरपालिकेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता ज्या महिलांचे नाव यादी मध्ये आले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणे चालू होणार आहे.

ज्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲप च्या साह्याने तसेच ऑनलाईन वेबसाईटवरून अर्ज केले असेल त्या सहजपणे माझी लाडकी बहीण योजना यादी चेक करू शकतील.

नारीशक्ती दूत ॲप वरून अर्ज केल्यास अशी अर्जाची स्थिती चेक करा

  • सर्वप्रथम आपल्याला नारीशक्ती दूत ॲप ओपन करायचे आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला पूर्वी केलेले अर्ज यावर ती क्लिक करायचे आहे.
  • येथे तुम्ही केलेला अर्ज ओपन होईल त्या अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता.
  • अशाप्रकारे तुम्ही नारीशक्ती दूत आमच्या साह्याने अर्ज ची स्थिती चेक करू शकता.

सर्व योजणाच्या माहितीसाठी आमच्या https://yojnapoint.com/ ला भेट द्या

Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज

वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज केल्यास अशी आपल्या अर्जाची स्थिती चेक करा.

  • जर तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून अर्ज प्रक्रिया केली असेल त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
  • त्यानंतर लॉगिन बटणावरती क्लिक करा.
  • मेनू मध्ये येऊन Application Made Earlier या ऑप्शनवर क्लिक करा
  • आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • येथे application status आपल्याला चेक करता येईल.

ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यास अशा प्रकारे यादी चेक करा.

राज्यातील ज्या महिलांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया केली आहे. त्या महिलांची यादी नगरपालिकेच्या वेबसाईट वरती जाहीर करण्यात आली आहे.खालील प्रमाणे तुम्ही ते चेक करू शकता.सर्वप्रथम नगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.त्यानंतर Scheme या बटणावर क्लिक करायचे आहे.येथे ladaki bahin yojana yadi यावरती क्लिक करायचे आहे.आता आपल्यासमोर Ladki Bahin Yojana Beneficiary List ओपन होईल.तिथे तुम्हाला वार्ड नंबर टाकून डाऊनलोड वरती क्लिक करायचे आहे.अशाप्रकारे माझ्या लाडकी बहीण योजनेची यादी डाउनलोड होईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now