महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर जमा झाले 3000 रुपये! तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळवू शकता ते पहा! Majhi ladaki bahin Yojana maharastra

Majhi ladaki bahin Yojana maharastra:महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्यभरातून 1.5 कोटीपेक्षा जास्त फॉर्म जमा झालेले आहेत. या योजनेच्या अर्ज प्रक्रियेचा कालावधी 15 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्य सरकारने ठेवलेला आहे.या योजनेमार्फत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये महिलांना त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे.अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे.या योजनेसाठी आलेल्या फॉर्म पैकी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत जे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांना 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.

Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना

तुम्हाला देखील या योजनेचे1500 रुपये प्रति महिना मिळवायचा असेल.तर याबाबतची पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया याबाबत सर्व माहिती खाली दिलेली आहे त्या मार्फत तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता.

योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावमाझी लाडकी बहीण योजना
योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संबंधित राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्रातील महिला
लाभ 1500 हजार रुपये प्रति महिना
उद्देश राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविणे
अर्ज प्रक्रियेची सुरुवात15 जुलै 2024
अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची दिनांक31 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! रेशन कार्डधारकांना मिळणार ४ वस्तु फ्री पहा माहिती ! Ration card Anandacha sidha 2024

माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्र सरकार माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दर महिना 1500 रुपये त्यांच्या खात्यावर DBT मार्फत जमा करणार आहे.या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै 2024 रोजी केली होती. आणि यासाठी 15 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली होती. या योजनेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद राज्य सरकारला मिळालेला आहे.सुमारे 1.5 कोटी पेक्षा जास्त अर्ज सरकार जवळ जमा झालेले आहेत. त्यापैकी पात्र महिलांना त्यांचे कागदपत्र तपासून त्यांचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत. आणि त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

यासंबंधी राज्य सरकारने सांगितले आहे की 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना या योजनेचे दोन महिन्याचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट असे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर 15 ऑगस्ट रोजी जमा केले जातील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असा भरा ऑनलाइन फॉर्म | OTP ची गरज नाही | आता होणार फॉर्म झटपट मंजुर |Majhi ladki bahin online from prosess 2024

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे?

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत करून त्याद्वारे त्यांना आत्मनिर्भर बनवून त्यांना जीवनातील समस्यांचा सामना करता यावा.

यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना दर महिना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिलांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना इतर कोणाचेही आधाराची गरज भासणार नाही. या दृष्टीने ही योजना एक महत्त्वपूर्ण आहे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता काय आहे?

  • लाभार्थी महिला ही मूळ महाराष्ट्रातील रहिवासी असावी
  • महिलाचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे
  • महिला व तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी
  • तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
  • महिला व तिच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी
  • महिला किंवा कुटुंबातील व्यक्ती विधानसभा विधान परिषद व इतर कोणत्याही शासकीय पदावर सदस्य नसावी
  • महिलाचे स्वतःचे बँक खाते असून त्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणते महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत?

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रेशन कार्ड
  • हमीपत्र
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी राज्यातील महिलांकडे वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या कागदपत्राच्या आधारे महिला योजनेसाठी पात्र ठरतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2024! याच महिलांना मिळणार 3000 रुपये! तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर करावे लागेल अशी प्रक्रिया?

Majhi ladaki bahin Yojana maharastra

नारीशक्तीदूत ॲपच्या साह्याने कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा?

  • सर्वप्रथम Play Store वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा
  • ॲप ओपन केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून terms and condition यांचा स्वीकार करून लॉगिन बटणावर क्लिक करा
  • तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून verify बटनावर क्लिक करा
  • होम पेज वरती येऊन माझी लाडकी बहीण योजना फॉर्म लिंक या वरती क्लिक करा
  • तिथे तुमची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा
  • याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला असेल त्यानुसार हो किंवा नाही हा पर्याय निवडा
  • योजनेसंबंधी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • यानंतर except हमीपत्र disclaimer क्लिक करून माहिती जतन करा हा पर्याय निवडा.

Majhi ladaki bahin Yojana online apply Maharashtra official website

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
  • मेनू पर्यायामध्ये अर्जदार लॉगिन बटणावर क्लिक करा
  • तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
  • त्यानंतर doesn’t have create account पर्याय क्लिक करा
  • आता तुमच्यासमोर योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यावरती तुमची वैयक्तिक माहिती भरा त्यानंतर तुमचा पासवर्ड आणि municipal corporation निवडून terms and condition चा स्वीकार करून captcha code टाकून sign up बटनावर क्लिक करा
  • आता मेनू मध्ये Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana link वरती क्लिक करा
  • आता आधार कार्ड नंबर टाकून सेंड ओटीपी वर क्लिक करा आणि तो ओटीपी टाकून verify वरती क्लिक करा
  • आता तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि बँकेची माहिती भरायची आहे
  • आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही या पर्यायामध्ये हा किंवा नाही पर्याय निवडा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • यानंतर Do You Have An Orange Or Yellow Ration Card? यावर ती क्लिक करा
  • शिधापत्रिकेचा पहिल्या पानाचा आणि शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करा
  • हमीपत्र आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करून except करून disclaimer यावर क्लिक करा
  • आता फॉर्म सबमिट बटन दाबा

महत्त्वाची नोंद

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. नाही तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत.यासाठी तुमच्या आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

PM Kisan samman nidhi 18th installment date! हे करा आणि खात्यावर ४००० रुपये जमा करून योजनेचा लाभ घ्या…

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होतील?

14 ऑगस्ट 2024 पासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे

माझी लाडकी बहीण योजनेद्वारे किती पैसे मिळणार आहे?

प्रति महिना 1500 रुपये महिलांना त्यांच्या खात्यावर ऑनलाइन जमा केला जाणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक काय आहे?

31 ऑगस्ट 2024 पर्यंत याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे.