mahajyoti free tablet Yojana:महाराष्ट्र सरकारने दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रेरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव आहे महाज्योती फ्री टॅबलेट योजना या मार्फत दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट त्याचबरोबर सहा जीबी इंटरनेट देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET Bacth करिता पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महा ज्योती मार्फत देण्यात येत आहे.
Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024!प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची,पात्रता, कागदपत्रे,लाभ
महा ज्योती मार्फत जे ऑनलाईन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते त्यासाठी त्यांना मोफत मध्ये टॅबलेट व 6 जीबी दिवसाला इंटरनेट उपलब्ध केले जाणार आहे दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे तसेच त्याच्या पालकांचे मोठमोठे स्वप्न असतात. परंतु त्यांना काही कारणामुळे आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणे शक्य होत नाही. त्यासाठी राज्य शासनाने महाज्योती मार्फत दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत मध्ये टॅब आणि सहा जीबी इंटरनेट पुरवून त्यांना अर्थसहाय्य करण्याचे ठरवून त्यांच्या प्रगती मधील अडथळे दूर करण्यासाठी महाज्योती योजना सुरू केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे यासाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र असणार आहे यासाठी पात्रता काय आहे कशाप्रकारे अर्ज प्रक्रिया करायचे आहे निवड कशा प्रकारे केले जाणार आहे व काय लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती तुम्ही वाचावी
महा ज्योती योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | महाज्योती फ्री टॅबलेट योजना |
विभाग | शिक्षण विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
योजना कोणी सुरू केली | महाज्योती संस्था |
उद्देश्य | विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे |
लाभार्थी | महाराष्ट्रातील विद्यार्थी |
लाभ | अभ्यासक्रमासाठी मोफत टॅबलेट मिळणार |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://mahajyoti.org.in/en/notice-board/ |
महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेचे उद्देश्य
महाराष्ट्र राज्यातील भटक्या जाती जमातीच्या व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी त्यांना मदत करणे गरजेचे आहे.
यासाठी त्यांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे त्यांना उच्च पदावर शिक्षण घेण्यासाठी व देशाची सेवा करण्यासाठी आधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी महा ज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे
पात्रता
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर गटातील असावा
- 2024 मध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील
- विद्यार्थ्यांनी दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता | या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
निवड
विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या परीक्षेतील गुणपत्रिकेतील टक्केवारीनुसार तसेच सामाजिक प्रवर्ग समांतरवार आरक्षणा नुसार करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे संबंधित लाभार्थी विद्यार्थी हा ग्रामीण भागातील आहे की शहरी भागातील हे त्याच्या आधार कार्ड वरील पत्त्यानुसार ठरविले जाईल
कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट)
- दहावी पास गुणपत्रिका
- दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
लाभ
महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेमार्फत पात्र विद्यार्थ्याला फ्री टॅबलेट त्याचबरोबर दिवसाला सहा जीबी इंटरनेट उपलब्ध केले जाणार आहे
प्रशिक्षण पुस्तके या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांला अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके उपलब्ध केले जाणार आहे
स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण: पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत JEE, NEET आणि CET ऑनलाईन कोचिंग क्लासेस ची मोफत सुविधा दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट चा वापर करून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.टॅबलेट च्या साहाय्याने विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील.
ऑनलाईन शिक्षण: या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाईन शिक्षण व कोर्से पूर्ण करू शकतील.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल.
डिजिटल लायब्ररी: महाज्योती फ्री टॅबलेट च्या अंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेटच्या सहाय्याने विद्यार्थी शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके डाउनलोड करून अभ्यास करू शकतील.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेटच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःची इतर कामे सुद्धा करू शकतील.
अटी व शर्ती
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 जुलै 2024 आहे
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाणार आहे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काही चुकीची माहिती तसेच दोषपूर्ण आढळण्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल.
जाहिरात रद्द करणे मुदतवाढ करणे तसेच अर्ज स्वीकारणे व न स्वीकारणे निवड प्रक्रियेच्या पद्धती बदलणे याचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहणार आहे तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास महाज्योतीच्या हेल्पलाइन नंबर 0712287012021 या नंबर वरती संपर्क करू शकता
महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र चा लाभ घेण्यासाठी खालील प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- OBC (इ मा व)
- VJNT (वि जा भ ज)
- SBC (वि मा प्र)
ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम महाज्योती या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे

- तेथे तुम्हाला registration link या बटनावरती क्लिक करायचे आहे
- आता तुमच्यासमोर महाज्योती योजनेचा फॉर्म ओपन होईल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे
- मोबाईल नंबर टाकून सबमिट बटणावर क्लिक करा
- आता एक ओटीपी येईल तो OTP टाकून सबमिट करा
- आता तुमच्यासमोर पूर्ण फॉर्म ओपन होईल त्यामध्ये
personal details | qualification details | document |
मध्येविद्यार्थ्याचे पूर्ण नाव त्याच बरोबर वडीलाचे नाव जन्मतारीख लिंग ही माहिती टाकायची आहे | दहावीचे शाळेचे नाव आणि ठिकाण त्याचबरोबर बोर्ड वर्ष 2024 सिलेक्ट करून पुढे तुमची टक्केवारी टाकाआणि save and continue वरती क्लिक करा | पासपोर्ट साईज फोटो डिजिटल सही अपलोड करायची आहे |
आता खाली तुम्ही अनाथ असल्यास हो करा आणि कशा मार्फत आहात ते सिलेक्ट करा (संस्थात्मक संस्थाबाह्य) | आता विद्यार्थ्यांचे आधार कार्ड , जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट,ssc सर्टिफिकेट, 11 वी बोनाफाईट,11 वी ऍडमिशन पावती अशाप्रकारे सर्व माहिती अपलोड करून खाली सबमिट बटनावरती क्लिक करा. | |
अपंग असल्यास आहे बटनावर क्लिक करून अपंग प्रकार निवडा | ||
आता जात प्रवर्ग निवडून त्यातून तुमची जात सिलेक्ट करा | ||
नॉन क्रिमीलेअर सिलेक्ट करायचे खाली विद्यार्थ्यांचा आधार नंबर टाकायचा आहे | ||
नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायचे आहे डोमेसाईल जिल्हा सिलेक्ट करा | ||
त्यानंतर तुम्ही ग्रामीण/शहरी या दोन्हीतून एक पर्याय निवडा | ||
आता तुम्हाला तुमचा पत्त्याची संपूर्ण माहिती ते भरायचे आहे(त्यामध्ये गावाचे नाव तालुका जिल्हा पिनकोड इत्यादी) | ||
विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे |
mahajyoti free tablet Yojana

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…