lek ladki yojana official website 2024: महाराष्ट्र सरकारने एक एप्रिल 2023 रोजी भाग्यश्री योजना सुरू केली होती त्याच योजनेचे आता रूपांतर लेक लाडकी योजनेमध्ये करण्यात आलेले आहे.

या योजनेमार्फत पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येतील.
Ladki Bahin Yojana 2024 :’हा’ फॉर्म भरा !झटपट बँकेत योजनेचे पैसै होतील जमा
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार आहे.
राज्यात पैशाअभावी अनेकदा मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाही, त्यामुळे अनेकदा मुलींची लग्ने लवकर होतात. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तरच योजनेसंबंधीच्या पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक पहावी
pmfby village list PM Fasal Bima Yojana List 2024
लेक लाडकी योजनेची थोडक्यात माहिती
योजना नाव | लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 |
---|---|
उद्देश | राज्यात मुलीचा जन्म आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे |
रक्कम | रु 1,01,000/- |
योजना सुरू होण्याची तारीख | ऑक्टोबर 2023 |
योजना क्षेत्र | महाराष्ट्र |
विभाग/नियोजन मंत्रालय | महिला आणि बाल विकास विभाग |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | लेक लाडकी योजना |
हेल्पलाइन | लवकरच अपडेट केली जाईल |
लेक लाडकी योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारने 2023 चा अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती परंतु ती आजपर्यंत लागू करण्यात केलेली नाही या योजनेद्वारे राज्यातील पिवळ्या व केशरी कुटुंबांना मुलींचा जन्म झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
महाराष्ट्रामध्ये मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस घटत असल्याने मोठी समस्या निर्माण झालेली आहे ही समस्या भरून काढण्यासाठी मुलींचा जन्मदर वाढणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांचा जन्म झाल्यापासून ते मुलगी 18 वर्षापर्यंत ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे याची अधिक माहिती म खाली दिलेली आहे
लेक लाडकी योजनेच्या पात्रता काय आहे?
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लेक लाडकी योजनेसाठी राज्यातील फक्त मुलीच पात्र असतील.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचीच कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल.
महिलांसाठी खुशखबर! महिलांना मिळणार 50,000 रुपये ! तुम्हाला लाभ मिळू शकतो का?ते पहा
लेक लाडकी योजनेसाठी काय कागदपत्रे लागणार आहे?
- पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- Birth Certificate जन्म दाखला लागणार आहे.
- उत्पन्न दाखला (1 लाख पेक्षा जास्त उत्पन्न नसावे)
- आधार कार्ड मुलीचे (परंतु पहिलाच लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ची आवश्यकता नाही).
- पिवळे किंव्हा केशरी रेशन कार्ड.
- पालकांचं आधार कार्ड.
- बँक पासबुक
- Voter ID मतदान कार्ड
- शाळेचा दाखला.
- शेटवटचा 75 हजार रुपये लाभ 18 वर्षानंतर मिळणार आहे त्यावेळी मुलीचे लग्न झालेले नसावे.
Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना
लेक लाडकी योजनेच्या लाभाचे टप्पे
लेक लाडकी योजनेचा लाभ संबंधित कुटुंबाला लाभ विविध टप्प्यावर वेगवेगळी रक्कम देण्यात येणार आहे त्याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे ती पहावी
पहिला टप्पा : मुलीचा जन्म झाल्यानंतर लगेच पाच हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. (मुलीच्या आहारासाठी आरोग्यासाठी ही मदत केली जाणार आहे)
दुसरा टप्पा : मुलगी वर्ग पाहिलीत असताना 6000 रुपये.(मुलीच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी दिला जाणार आहे)
तिसरा टप्पा : मुलगी सहावीत असताना 7000 रुपये मिळणार.
चौथा टप्पा : मुलगी 11 वी शिक्षण घेत असताना 8000 रुपये मिळणार.
पाचवा टप्पा : मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75 हजार रुपये मिळणार आहे.
नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता
अशाप्रकारे लेक लाडकी योजनेतून मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.
लेक लाडकी योजनेचा उद्देश्य
राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील मुलींच्या आहारासाठी शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षण आरोग्य उच्च शिक्षण यासाठी केशरी व पिवळे शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य असून याद्वारे मुलींना सशक्तिकरण घडवून आणणे व त्यांना समाजात प्रतिष्ठेने वावरता यावे यासाठी ही लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेद्वारे दुर्बल घटकातील मुली उच्च पदापर्यंत पोहोचवू शकतील व देशाचा विकास देखील करू शकतील.
लेक लाडकी योजना या योजनेतून राज्यातील मुलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ज्यामुळे, मुलींना जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. शिक्षणात मुली प्रगती करणार आहे. मुलींचे भविष्य सुधारणार आहे. आर्थिक अडचणीमुळे मुलींचा वाढलेला मृत्युदर कमी होणार आहे. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे
लेक लाडकी योजनेच्या अटी काय आहे?
दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल.
मुलीचा जन्म दाखला अवश्य आहे.
कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे : पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हफ्त्या साठी व दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
जुळी अपत्ये : दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी एक मुलगी एक मुलगा किंव्हा दोन्ही मुली जन्माला आल्यास एक किंव्हा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
lek ladki yojana official website
महाराष्ट्र सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना जाहीर केली होती, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही योजना लागू होताच अर्ज प्रक्रियेची माहितीही सार्वजनिक केली जाणार आहे. सध्या तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्जाची माहिती सरकारकडून उपलब्ध होताच, आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे कळवू जेणेकरून तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता आणि लाभ मिळवू शकता.
लेक लाडकी योजनेचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा?
सर्वप्रथम लेक लाडकी योजनेचे फॉर्म डाउनलोड करा. यानंतर त्यामध्ये तुमची माहिती भरा, जसे की नाव, पत्ता, आधार कार्ड, जन्मतारीख इ. त्यानंतर मुलाचे नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती भरा. त्यानंतर तुमची बँक माहितीही भरा.
त्यानंतर तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा लेक लाडकी योजनेच्या कार्यालयात जा आणि तेथे हा फॉर्म भरा. आता तुमची आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत सबमिट करा. यानंतर, तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल, आणि सर्व माहिती योग्य आढळल्यास, योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
लेक लाडकी योजना फॉर्म pdf
निष्कर्ष
महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना महाराष्ट्रातील केसरी व पिवळे कुटुंब धारक वर्गातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून त्यांना टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपयांची मदत केली जाणार आहे ही मदत पाच टप्प्यांमध्ये केली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शासनाने हा निर्णय घेऊन मुलींच्या जन्म दरामध्ये वाढ करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे
FAQ
लेक लाडकी योजनेची तरतूद केव्हा करण्यात आलेली आहे?
महाराष्ट्र सरकारने 2023 24 अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजनेची तरतूद केलेली आहे
लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे?
राज्यातील केशरी व पिवळे शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण किती रक्कम लाभार्थ्याला मिळणार आहे?
लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत ही संबंधित कुटुंबाला दिली जाणार आहे
लेक लाडकी योजनेचा उद्देश्य काय आहे?
महाराष्ट्रातील मुलींची संख्या कमी होत असल्याने त्यांच्या जन्म दरामध्ये वाढ घडून आणून मुलींचे सशक्तीकरण करणे हा आहे
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?
जवळच्या अंगणवाडी केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करायचे आहे

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…