ladki bahin yojana online apply: महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे
या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिना १५०० रुपये महिना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प 2024 च्या दरम्यान म्हणजेच एक जुलै 2024 रोजी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती.
माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील विधवा विवाहित व घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे सशक्तिकरण घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत तसेच या योजनेच्या पात्रता काय आहेत अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायचे आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये देणार आहेत ज्याने तुम्हाला या योजनेचा फायदा होण्यास मदत भेटणार आहे तर ती माहिती तुम्ही लक्षपूर्वक वाचावी.
माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजनेची घोषणा एक जुलै 2024 रोजी केली आहे या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.
Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024!प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची,पात्रता, कागदपत्रे,लाभ
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वय वर्ष असलेल्या कमी उत्पन्न व निराधार असलेल्या महिलांना या योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे.ही योजना मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेद्वारे प्रेरित होऊन महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या अर्ज प्रक्रियेची सुरुवात जुलै 2024 पासून सुरुवात झालेली आहे नारीशक्ती दूध ॲपच्या सहाय्याने राज्यातील महिला माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करू शकतात.
ॲनिमिया या रोगापासून 50 टक्के महिला प्रभावित आहेत महिलांना छोट्या छोट्या कामासाठी घरच्यांवर अवलंबून राहावे लागते व महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. व त्या वेगवेगळ्या आजाराच्या बळी पडतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात दर महिना जमा करण्यात येणार आहे त्याद्वारे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
माझी लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती
योजनेची घोषणा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 15 जुलै 2024 |
अर्जप्रक्रियेची शेवटची दिनांक | 31 ऑगस्ट 2024 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
लाभ | १५०० रुपये दर महिना |
उद्देश | महिलांना आर्थिक मदत देऊन आत्मनिर्भर बनविणे |
अधिकृत वेबसाईट | www.maharastra.gov.com |
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- रहिवासी दाखला
- राशन कार्ड
- हमीपत्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता
महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही पात्रता सरकारने निश्चित केलेले आहेत त्या खालील प्रमाणे
- या योजनेचा फायदा फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे
- महिलांचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे
- महिलांजवळ स्वतःची बँक खाते असावी
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावी
- कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी
- कुटुंबातील तसेच स्वतः कोणीही सरकारी नोकरीत नसावी
- कुटुंबातील कोणीही राज्यसभा व विधानपरिषद तसेच इतर कोणत्याही पदावर सदस्य नसावी
- ५ एकर पेक्षा जास्त जमीन नसावी
- अर्ज करता जवळ व कुटुंबातील व्यक्तीजवळ ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही चार चाकी वाहन रजिस्ट्रेशन नसावे.
हे देखील पहा प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना २०२४
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे फायदे
महिलांचे सशक्तीकरण घडवून आणण्यासाठी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत खालील फायदे महिलांना मिळणार आहेत.
- दर महिना पगार: महिलांना त्यांच्या बँक खात्यावर दीड हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे त्याद्वारे त्या आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करू शकतील.
- मोफत गॅस सिलेंडर:या योजनेद्वारे गरीब महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत
- कॉलेज फी माफ:राज्यातील ओबीसी व इतर मागासवर्गीय तसेच इतर EWS श्रेणीमधील मुलींची कॉलेज फी मोफत करण्यात आलेली आहे. याद्वारे जवळजवळ २ लाख मुलींना याचा फायदा होणार आहे गरीब कुटुंबातील मुली याद्वारे उच्च शिक्षण घेऊ शकतात.
माझी लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट लिंक
महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करायची असेल तर त्या खालील प्रकारे करू शकतात.
- सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
- आपल्यासमोर होम पेज उघडेल
- होम पेजवर आल्यानंतर लगेच अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- त्यावरती मोबाईल नंबर व captcha code टाकून द्यायचा आहे
- व पुढे चला या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- माझी लाडकी बहीण योजना अर्ज फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल
- अर्ज फॉर्मवर दिलेले आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे व सबमिट पर्यावरण क्लिक करायचे आहे अशा प्रकारे आपण ऑनलाइन कर्ज प्रक्रिया करू शकता.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ladki bahin yojana online apply
नारी शक्ती दूत या ॲपच्या सहाय्याने आपण माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करू शकता ती खालील प्रमाणे
- सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोर वरती यायचे आहे
- प्ले स्टोअर वरती आल्यानंतर आपल्याला नारीशक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे
- ॲप मध्ये लॉगिन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर टाका
Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा
- मॅप उघडल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेवरती क्लिक करायचे आहे
- योजनेचा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल त्यावरती आवश्यक माहिती भरायची आहे
- संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे आपण ॲपच्या साह्याने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करू शकतात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र pdf डाउनलोड link
लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला हमी पत्राची pdf डाउनलोड करावी लागणार आहे ते आपण खालील प्रमाणे डाऊनलोड करू शकता
महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे
येथे आल्यानंतर आपल्याला फॉर्म डाउनलोड या विकल्पावरती क्लिक करायचे आहे
तेथे आपल्याला माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र डाऊनलोड लिंक शोधायची आहे
हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
हे पहा माझ्या लाडका भाऊ योजना २०२४
हमीपत्र वरती माहिती कशाप्रकारे भरायची
- वैयक्तिक माहिती तुमचे संपूर्ण नाव संपर्क पत्ता आणि आधार नंबर टाका
- उत्पन्नघोषणा तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही असे घोषित करा
- रोजगार स्थिती तुम्ही व तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत नाही असे घोषित करा
- योजनेतील सहभाग तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही असे घोषित करा
- जमीन व वाहन मालकी तुमची जमीन व वाहनांची माहिती येथे भरून घ्या
- आधार प्रमाणीकरण आधार कार्ड नंबर भरून आपली ओळख निश्चित करा.
हमीपत्र भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
- अंगणवाडी केंद्राला भेट द्या तुम्ही भरलेल्या हमीपत्र व आवश्यक कागदपत्रासह अंगणवाडीला भेट द्या
- कागदपत्रांची पडताळणी पडताळणीसाठी हमीपत्र व तुम्ही दिलेले कागदपत्रे सबमिट करून घ्या
- पावती संकलन यशस्वी पडताळणी नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या सबमिशन पुष्टी करणारी पावती मिळेल.
निष्कर्ष
माझी लाडकी बहीण योजना हा एक राज्य सरकारचा एक महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी हा एक महत्वपूर्ण योजना मानली जाते अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या व तुमच्या गावातील अंगणवाडी ला भेट द्या.
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र कसे downlaod कसे करायचे
महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे
येथे आल्यानंतर आपल्याला फॉर्म डाउनलोड या विकल्पावरती क्लिक करायचे आहे
तेथे आपल्याला माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र डाऊनलोड लिंक शोधायची आहे
हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
माझी लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट लिंक कोणती आहे
www.maharastra.gov.com ही आहे
या योजनेदवारे महिलांना किती पेसे मिळणार आहे
या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिना १५०० रुपये महिना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.