Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज जर चुकला तर त्याला दुरूस्त करता येतो पण जर अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर नक्कीच टेन्शन वाढते.
माझी लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात majhi ladki bahin Yojana 2024
त्यामुळे हे टेन्शन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाचा तुम्ही अवलंब केलात तर निश्चित तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे हा नेमका पर्याय काय आहे? आणि तुमच्या बँकेत पैसे कसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.
NPCI Form माझी लाडकी बहीण योजनेसाठी हा फॉर्म भरावा लागेल?
लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज मंजूर झाला असला तरी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024 या महिलांना मिळणार (४५०० रुपये)
जर तो नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच जमा होणार नाही आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे बँकेत जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला एनपीसीआय फॉर्म (NPCI Form) भरावा लागणार आहे. हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होते आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार आहे.खरं तर बऱ्याच वेळेस शासनामार्फत जे पैसे येतात ते DBT पद्धतीने म्हणजेच (Direct Benefit Transfer) पद्धतीने पाठविले जातात.
Ladki Bahin Yojana 2024
जेव्हा हे पैसे पाठविले जातात तेंव्हा ते ज्या बँक खात्याला NPCI सीडिंग आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात. पण बऱ्याच वेळेस असा समज होतो कि आपले जे आधार कार्ड आहे हे सगळ्याच बँक खात्यांना लिंक आहे परंतु तसे नसते. कोणत्याही एका बँक खात्याला हे NPCI आधार लिंक होत असते आणि त्याच बँक खात्यामध्ये शासकीय अनुदानाचे पैसे जमा होत असतात.जर तुम्हाला हा फॉर्म बँक शाखेत जमा करून द्यायचा आहेत.
तर हि सर्व प्रोसेस अगदी सविस्तरपणे समजून घेऊयात, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अडकलेले पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
NPCI आधार सीडिंग संदर्भातील प्रोसेस कशी असते?
NPCI हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा बँकेत मिळणार आहे.फॉर्मवर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा चिटकवीने आवश्यक आहे.
बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, तुमचा खाते क्रमांक, खातेदार यांची सही आणि खातेदाराचे नाव फॉर्मवर लिहायचे आहे.
आधार कार्ड आणि बँक पासबुकचे झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहेत.
हा फॉर्म तुम्हाला बँक शाखेत जमा करून द्यायचा आहेत.
ही प्रोसेस बँकेकडून पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेचा थोडक्यात आढावा
aditi tatkare : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गतराज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळाला आहे?
आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.
सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक?
या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.
निष्कर्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ न घेतलेल्या महिलांना तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये देण्यात येणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे व त्यांनी 26 ऑगस्ट पर्यंत त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांना 31ऑगस्टपर्यंत राज्य सरकार पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करणार आहेत.
FAQ
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत?
ज्या महिलांचे 26 ऑगस्ट पर्यंत फॉर्म मंजूर झालेले आहेत व त्यांना अप्रोवल चा मेसेज आलेला आहे त्या महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळणार आहेत
उर्वरित महिलांना किती रक्कम मिळणार आहे?
जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांचे मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती प्रक्रिया करणे आवश्यक आहे?
महिलाचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे