Ladka Shetkari Yojana:लाडक्या बहिणी’नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladka Shetkari Yojana:विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यात या योजनेची मोठी चर्चा सुरु आहे.

Ladka Shetkari Yojana

lek ladki yojana official website 2024 पासून मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये पहा योजना

या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु आहे अशातच आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले

Ladka Shetkar Yojana महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं होय. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे.

कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली.त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली.

आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरही लाडका होणार”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

Ladka Shetkari Yojana काय आहे?

माझा लाडका शेतकरी योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ येथे भरलेले आहे का कृषी प्रदर्शन कार्यक्रमामध्ये केलेली आहे या योजनेमार्फत राज्यातील गरीब तुमच्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चे आर्थिक मदत dbt मार्फत त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारने कापूस सोयाबीन अनुदान योजना सुरू केलेली आहे योजनेअंतर्गत राज्यातील दुष्काळ कीटक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते परंतु राज्यातील काही भागांमध्ये उत्कृष्ट उत्पादनाची जमीन असून देखील शेतकरी शेती करू शकत नाही तर आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि याचीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारने माझा लाडका शेतकरी ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केली आहे

माझा लाडका शेतकरी ही योजना केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ladka shetkari Yojana registration करणे अनिवार्य आहे तरच तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने माझा लाडका शेतकरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे आपण यासाठी ऑनलाइन ऑफलाइन रजिस्ट्रेशन करू शकता

माझा लाडका शेतकरी योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावमाझा लाडका शेतकरी योजना
घोषणाएकनाथ शिंदे
ठिकाणपरळी वैजनाथ
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
उद्देश्यशेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
लाभ2000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटmaza ladka shetkari Yojana

लाडका शेतकरी योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?

  • या योजनेचा लाभ केवळ गरीब शेतकऱ्यांना मिळणार आहे
  • शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी.
  • शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असावे
  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे
  • शेतकऱ्याचे कृषी विभागांमध्ये नोंदणी असावी

लाडका शेतकरी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • जमिनीचा सातबारा
  • पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

लाडका शेतकरी योजनेचा उद्देश काय आहे?

माझा लाडका शेतकरी योजना ही प्रामुख्याने राज्यातील गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व त्यांच्या कुटुंबातील लहान मुला मुलींसाठी आहार पालनपोषण आरोग्य यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामना करावा लागतो

त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती रोग दुष्काळ यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र सरकारने माझा लाडका शेतकरी योजना सुरू केली आहे

लाडका शेतकरी अर्ज प्रक्रिया

माझा लाडका शेतकरी योजनेसाठी राज्यातील शेतकरी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही मार्गाने अर्ज प्रक्रिया करू शकतात महाराष्ट्र सरकारने माझा लाडका शेतकरी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल सुरू केलेले नाही

निष्कर्ष

राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना सुरू असताना शेतकऱ्यांसाठी अजून एक योजना सुरू झाली आहे ती म्हणजे लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे त्याद्वारे ते आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करू शकतील व त्यांना शेती करण्यास मदत होणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment