Favarni Pump Yojana Maharastra 2024 : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या उत्पादनामध्ये देशातून नंबर लागतो. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे योजना राबविल्या आहेत. या योजना मार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे व त्यांना शेतीसाठी आर्थिक मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. याच प्रकारे आता शेतकऱ्यांना फवारणीसाठी पंप हा देण्यात येणार आहे यावर १०० टक्के सबसिडी शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे.
यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सरकारने चालू केलेली आहे. हे अर्ज प्रक्रिया MAHADBT पोर्टल वरती सुरू करण्यात आलेली आपल्याला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्याच प्रकारे यासाठी काही पात्रता देखील आहे कागदपत्रे ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेल्या लेखांमध्ये दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे.
योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारची शेतीसाठी फवारणी पंप योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना 100 टक्के सबसिडीवर बॅटरी फवारणी पंप फ्री मध्ये देण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून उत्पादनामध्ये वाढ घडून आणणे. यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.महाराष्ट्रामध्ये अजूनही काही आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी आहेत त्यांना शेतीसाठी विविध प्रकारचे उपकरणाची आवश्यकता असते .ते शेतीसाठी काही उपकरणे खरेदी करू शकत नाही. त्यांच्यासाठी ही योजना लाभदायी ठरणार आहे.पिकावरील कीटक हा एक उत्पादन कमी करण्याचा प्रमुख प्रश्न होता आणि यालाच नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना फवारणी पंप मोफत देण्याची योजना आणलेली आहे.

या योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | फवारणी पंप योजना |
लाभ | बॅटरीवर चालणारा स्प्रे फवारणी पंप |
सुरुवात | ऑगस्ट 2024 |
शेवटची दिनांक | 14 ऑगस्ट 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login |
पात्रता
- लाभार्थी शेतकरी हा मूळ महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- त्याच्याकडे आधार कार्ड असावे
- शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी
- शेतकऱ्याजवळ शेतीचा 7/12 व 8 अ उतारा पाहिजे.
- या काही योजनेसाठी ठराविक पात्रता सरकारने ठरवलेल्या आहेत त्या असल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- जमिनीचा 7/12 उतारा
- जमिनीचा 8 अ उतारा
- जात प्रमाणपत्र
- स्वयंघोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
- बँक पासबुक
- मोबाइल नंबर
फवारणी पंप योजना ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करायचा?
लाभार्थी शेतकऱ्यांना फवारणी पंप फ्री मध्ये मिळवायचा असल्यास त्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे . ही अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सरकारने महाडीबीटी पोर्टल वर सुरू केलेली आहे.

- सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
- मेनू मध्ये शेतकरी योजना हा पर्याय सिलेक्ट करावा.
- येथे अर्जदार येथे लॉगिन करा यामध्ये दोन पर्याय दिसतील
- वापरकर्ता आयडी व आधार कार्ड नंबर या दोन्हीपैकी एक पर्याय निवडून तुम्ही कॅपच्याcode टाकून लॉगिन करा
- आणि येथे जर तुमचे खाते नसल्यास तुम्ही प्रथम उजव्या साईडला तेथे तुम्हाला अर्जदार नोंदणी करा हा पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करून तुम्ही नोंदणी करून घ्या व नंतर लॉगिन करा
- आता कृषी विभाग व अर्ज करा ही दोन पर्याय दिसतील त्यापैकी अर्ज करा या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे
- तुमच्यासमोर अनेक योजना येतील त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण यामध्ये जाऊन बाबी निवडा या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे
- आता तुम्हाला खालील दिलेल्या पर्यायांमध्ये हे पर्याय निवडायचे आहेत
- मुख्य घटक या पर्यायामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य हा पर्याय निवडायचा आहे
- तपशील पर्यायामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा
- यंत्रसामग्री अवजारे व उपकरणे या पर्यायांमध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा
- मशीन या पर्यायामध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप निवडायचा आहे
- अशाच प्रकारे खाली आल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पंप अवजारांची खरेदी नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी या अनुदानाचा पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे या पर्यायावर ती टिक करून खाली जतन या बटणावरती क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुमची बाब या अर्जामध्ये सबमिट केली जाईल.
अर्ज सादर कशाप्रकारे करायचा?
यासाठी तुम्हाला पुन्हा मुखपृष्ठावरती यायचं आहे आणि अर्ज करा या पर्यावरण क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला पहा हे बटन दिसत असे.. त्यावरती क्लिक करून तुम्ही केलेला अर्ज तुम्हाला दिसेल त्याला प्राधान्य द्यायचे आ.. आता खाली तुम्हाला योजनेअंतर्गत बाबींसाठी निवड बटनावर टिक करून अर्ज सादर करा या बटणावरती क्लिक करायचे आहे .हे केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर तुम्ही फक्त 23 रुपयांचे पेमेंट करून त्या पावतीची प्रिंट काढून घ्या.
अशाप्रकारे तुमचा बॅटरी संचलित फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पूर्ण झालेला आहे.
तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस कशाप्रकारे बघायचे?
तुम्हाला मुख्यपृष्ठावर डाव्या साईडला मी केलेल्या अर्जाच्या बाबी या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.मी केलेल्या अर्ज बाबींमध्ये आल्यानंतर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्टेटस दिसेल त्यामध्ये जर तुमची या योजनेमध्ये लॉटरी लागली तर तुम्हाला असा एक मेसेज येईल आणि तुमचा अर्ज मंजूर होईल त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत.अशाप्रकारे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या फवारणी पंप योजनेचा लाभ घेऊ शकता.
निष्कर्ष
महाराष्ट्र शासन सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचप्रमाणे आता बॅटरी संचलित फवारणी पंप शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानामध्ये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आ.. यासाठी महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी MAHADBT पोर्टल वरती जाऊन तिथे एक खाते तयार करून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तुम्ही यासाठी पात्र ठरला तर तुम्हाला शासनातर्फे स्वयंचलित बॅटरी चा फवारणी पंप मोफत मध्ये मिळणार आहे. यासंबंधीची सर्व माहिती आपण वरील लेखांमध्ये दिलेली आहे.
फवारणी पंप योजने संदर्भातील प्रश्न
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?
महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
फवारणी पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची?
यासाठी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करून या संदर्भात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करायची आहे
फवारणी पंप 100% अनुदान ही योजना कोणी व कधी सुरू करण्यात आली आहे?
महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना ऑगस्ट 2024 मध्ये सुरू केलेली आहे
या योजनेचा सरकारचा उद्देश काय आहे?
राज्यातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना शेती संदर्भातील उपकरणे उपलब्ध करून देणे व त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणे हा उद्देश आहे.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…