Dharmaveer Anand Dighe Divyang Scheme: राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. दरम्यान दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
mahajyoti free tablet Yojana! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट आणि 6जीबी डाटा दररोज
आनंद दिघे योजना काय आहे?
दिव्यांग व्यक्तींच्या जीवनामध्ये सुधारणा घडवून येण्यासाठी बृहन्मुंबई नगर निगम (बीएमसी) ने धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक मदत योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत बृहन्मुंबई नगरपालिका क्षेत्रात असलेल्या 60 हजार दिव्यांगांना दर सहा महिन्याला सहा हजार पासून 18000 रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे
महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे.
Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024!प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची,पात्रता, कागदपत्रे,लाभ
सन 2024-25 ते सन 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजने अंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.
आनंद दिघे योजनेद्वारे किती दिव्यांगांना लाभ मिळणार आहे?
60 हजार दिव्यांगांना लाभ पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे 60 हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी 111.83 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.
या दिव्यांगांना मिळणार योजनेचा लाभ
पालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग आणि इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा आणि व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे, यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ सुरू करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
पात्रता
योजने अंतर्गत वय वर्ष 18 वरील 40 टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील. तसेच 80 टक्क्यांपेक्षा अधिकदिव्यांगत्व असलेल्या
योजनेद्वारे किती रक्कम मिळणार आहे?
व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित 18 हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे.
Dharmaveer Anand Dighe Divyang Scheme
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक आहे.
आनंद दिघे योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन2024-25 ते सन 2028-29)’ यावर क्लिक केल्यास तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल. सदर योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या