Bandhkam kamgar Yojana 2024 benifits:बांधकाम कामगारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता त्यांना विविध प्रकारच्या योजना सरकार लागू करत असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार या करिता नोंदणी करणे आवश्यक असते. या योजनेमधून विविध फायदे बांधकाम कामगारांना दिले जातात.
BandhKam kamgar Yojana| महाराष्ट्र बांधकाम योजना कामगारांना मिळणार 5000 रुपये,पहा योजना काय आहे?
बांधकाम कामगार या योजनेसाठी नोंदणी केल्यांनतर तुम्हाला त्वरित 5000 हजार रुपयांची अर्थीक मदत सरकारकडून दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना अर्थसहाय्य्य देण्यासाठी म्हणजेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शैक्षणिक तसेच विमा, घरकुल, आरोग्य त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सरकारने हि योजना सुरु केलेली आहे. जेणेकरून गरजू आणि गरीब कुटुंबाना आर्थिक लाभ मिळेल.
बांधकाम कामगार योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना |
विभाग | महाराष्ट्र बांधकाम व कामगार कल्याण मंडळ |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्रातील कामगार वर्ग |
उद्देश | कामगारांना आर्थिक मदत करणे |
लाभ | 2000 ते 5000 रुपये पर्यंत आर्थिक मदत |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://mahabocw.in/mr/ |
बांधकाम कामगार योजना काय आहे?
कोरोना काळामध्ये कामगार वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते कामगार वर्ग हा आर्थिक सामाजिक अडचणी मध्ये गुंतला गेला होता या अडचणीच्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने बांधकाम कामगार योजना सुरू केली होती त्यांना या योजनेमार्फत 2000 ते 5000 रुपये पर्यंत आर्थिक मदत घेतली जाणार आहे तसेच त्यांना भांड्याचा सेट देखील दिला जाईल योजना मार्फत मिळणारे रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे
अशा प्रकारे राज्यातील कामगार वर्गाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रासाठी या योजनेत मार्फत लाभ मिळणार आहे व त्यांच्या जीवनमानाची पातळी वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम चालू केला आहे
बांधकाम कामगार योजनेचा उद्देश
- राज्यातील कामगार वर्गाला 2000 ते 5000 रुपयापर्यंत आर्थिक मदत करणे.
- राज्यातील कामगार वर्गाला आत्मनिर्भर बनविणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे.
- या योजनेमार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेमार्फत कामगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचाविणे व त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कोणत्या कामगारांना लाभ मिळणार आहे?
- रस्ते बांधकाम
- रस्ते बोगद्याचे बांधकाम
- रेल्वे बांधकाम
- तळ्याचे बांधकाम
- सिंचन बांधकाम
- पूलावरील बांधकाम
- रेडिओ बांधकाम
- बंधारे बांधकाम
- धरण बांधकाम
- पूर नियंत्रण बांधकाम
- कालवे बांधकाम
- पाणीपुरवठयाचे बांधकाम
- पाईप लाईन बांधकाम
- वीजपुरवठा बांधकाम
- टॉवर्स बांधकाम
- सौर पॅनल बांधकाम
- वॉटर फिल्टर बांधकाम
- अग्निशमन युनिट बांधकाम
ज्या कामगारांनी या पैकी कोणतेही काम केले आहे, आणि जे सध्या काम करत आहेत. ते सर्व कामगार हा फार्म हा भरू शकतात, अशाप्रकारे सर्व कामगारांचा समावेश हा शासनाकडून बांधकाम कामगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. या कामगारांना आर्थिक साहाय्य्य देऊन त्यांचे राहणीमान व जीवनमानातं बदल करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
Bandhkam kamgar Yojana 2024 benifits
मुलांच्या विवाह साठी:
बांधकाम कामगारांच्या अपत्य विवाहासाठी 30 हजार रुपये एवढी रक्कम त्यांना हातभार लावण्यासाठी देण्यात येते.
बांधकाम साहित्य / अवजारे खरेदीसाठी
कामगारांना 5000 हजार रुपये एवढे आर्थिक सहायय दिले जाते, त्याचसोबत त्यांना अवजार पेटी प्रदान केली जाते.
व्यक्तिमत्व पुस्तक संचाचे वाटप केले जाते.
विमा संबंधी:
प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना अंतर्गत त्यांची नोंद केली जाते, म्हणजेच त्यांचा बिमा काढला जातो.
कौशल्य विषयक
कामगारांसाठी कौशल्य वृत्तिकारं लाभाचे आयोजन केले जाते.
शैक्षणिक लाभ
कामगारांचा मुलगा, मुलगी किंवा मग पत्नी यांच्या शिक्षणासाठी 2 हजार 500 ते एका लाखापर्यंत त्यांना लाभ हा दिला जातो.
कामगारांच्या 2 मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाते, म्हणजेच त्यांना कॉम्पुटर मोफत शिकवले जाते.
आर्थिक मदत
कामगारांच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार झाल्यास किंवा दुखापत झाल्यास त्यांना उपचारासाठी 1 लाख रुपये पर्यंत मदत दिली जाते.
मुलगी झाल्यास
कामगारांच्या पहिल्या मुलीला जन्मांनंतर कुटुंबनियोजन केलेले असल्यास, मुलींच्या नावे 1 लाख रुपये जमा केले जातात.
अपंगत्व आल्यास
कामगाराला 75 टक्के अपंगत्व आल्यास 2 लाखाच्या अर्थी साहाय्याची मदत त्यांना केली जाते.
मृत्यू झाल्यास
कामगारांचा कामाच्या ठिकाणी जर मृत्यू झाला तर त्यांच्या वारसाला 5 लाख रुपये एवढी मदत केली जाते.
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे आर्थिक सहायय त्यांच्या परिवारास दिले जाते.
pm kisan samman nidhi yojana, online application form list प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2024
घर खरेदी
कामगाराला घर खरेदी साठी 6 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहायय दिले जाते.
अंत्यविधीसाठी
ज्या कामगारांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या अंत्यविधीसाठी 10: हजर रुपयांचे अर्थसहायय त्यांना देण्यात येते.
मृत्यू झाल्यानंतर
कामगाराचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पत्नी किंवा पतीला 24 हजार रुपयांची अर्थी मदत दिली जाते.
बांधकाम कामगार योजनेसाठीच्या पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट राज्यच रहिवासी असावा.
- अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 60 च्या दरम्यान असावे.
- या व्यक्तीने सलग 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले पाहिजे. म्हणजेच 90 दिसाचे प्रमाणपत्र असले पाहिजे.
- बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळात नोंदणी केलेली असावी.
बांधकाम कामगार योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत?
- आधारकार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- रेशन कार्ड
- तुमचा मोबाईल नंबर
- ओळखपत्र
- 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची त्यासाठी हे पहा
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करू शकता?
बांधकाम कामगार या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात आधी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
- त्यांनतर तुम्हला खाली कामगार हा पर्याय दिसेल त्या बटनावर क्लीक करायचे आहे.
- क्लिक केल्यांनतर तुम्ही तुमचीजन्मतारीख टाका.
- त्यांनतर तुम्हाला पुढे 90 दिवस काम करत आहेत या पर्यायावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर रहिवासी पुरावा आहे या पर्यायावर क्लिक करा.
- आता आधार कार्ड आहे या पर्यायावर क्लिक करा.
- त्यांनतर तुमची पात्रता तपासा यावर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडा.
- त्यांनतर तुमचा आधार क्रमांक टाका.
- त्यांनतर कुटुंबाची माहिती भरा.
- त्यांनतर तुम्हि 90 दिवस काम केल्याच्या दाखल्याची माहिती भरा.
- माहिती भरून झाली कि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो, सही व तुमचा अंगठा अपलोड करा.
- त्यांनतर सहमत आहात या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
- यांनतर तुम्हाला तुमचा पोच पावती क्रमांक दिसेल. म्हणजेच तुमचा अर्ज सबमिट झाला आहे असे समजावे.