अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|महाराष्ट्र सरकार देणार युवकांना व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज| पहा योजनेची संपूर्ण माहिती|

Annasaheb Patil loan Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी त्याचप्रमाणे सुरू असलेल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरू केलेली आहे या योजनेमार्फत राज्यातील तरुणांना व्यवसायासाठी बिगर व्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे हे कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते तुम्हाला देखील स्वतःचे व्यवसाय सुरू करायचा असेल आणि बिगर ऐवजी कर्ज मिळवायचे असेल तर ही तुमच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आहे तरी या योजनेचा लाभ काय आहे कशाप्रकारे त्यासाठी अर्ज प्रक्रिया करायची त्याची पात्रता आवश्यक कागदपत्रे नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती साठी आलेख शेवटपर्यंत वाचा

mahajyoti free tablet Yojana! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट आणि 6जीबी डाटा दररोज

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे ?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमार्फत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बिगर व्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज परतावा योजना अशा दोन योजना बँकेमार्फत राबविल्या जातात त्यामध्ये ज्या तरुणांना व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल त्यांना वैयक्तिक परतावा योजना आहे

या योजनेसाठी सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते ही योजना ऑनलाइन पद्धतीची आहे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यावर तुम्हाला हमीपत्र मिळते व त्या मार्फत तुम्हाला बँकेतून 15 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते

सध्या महामंडळाच्या योजनेअंतर्गत 98 हजार लाभार्थ्यांना 76,679 कोटीचे व्यावसायिक कर्ज बँकेने वितरित केलेले असून महामंडळाने 812 कोटींचा व्याज परतावा लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा केला आहे अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक मुंबई श्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे.

Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना

Annasaheb Patil loan Yojana 2024

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची स्थापना 27 ऑक्टोबर 1998 रोजी केली होती

उद्देश्य

राज्यात आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे त्याकरिता विशेष म्हणजे या घटकातील बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 29 ऑगस्ट 1998 रोजी निर्णय घेण्यात आला व या निर्णयाला अनुसरून अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना करण्यात आली या मार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना माहिती व मार्गदर्शन त्याचबरोबर आर्थिक मदत केली जाते

पात्रता

लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे उमेदवाराची वयाची अट पुरुषांकरिता 50 वर्ष व महिलांकरता 55 वर्ष आहे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत मध्ये असावे लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा अक्षम महामंडळाच्या अंतर्गत कर्ज करताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे दिव्यांगा करिता अर्ज दाखल करत असल्यास त्याचे दिवंगत्वाचे प्रमाणपत्र असावे या योजनेचा लाभ एका व्यक्तीला केवळ एकदाच लाभ घेता येणार आहे

रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! रेशन कार्डधारकांना मिळणार ४ वस्तु फ्री पहा माहिती ! Ration card Anandacha sidha 2024

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम टॅक्स फाईल

लाभाची प्रक्रिया

सर्वप्रथम महास्वयंसेवक या अधिकृत वेबसाईटवर येऊन प्रोफाइल बनवा त्याकरिता तुम्हाला युजर आयडी पासवर्ड अशी तुमची बेसिक माहिती द्यावी लागते

आणि तुमचे प्रोफाईल खाते तयार होते हे प्रोफाइल खाते तयार झाल्यानंतर महामंडळाने सांगितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात

त्यानंतर तुम्हाला महामंडळाचे हमीपत्र मिळते ते हमीपत्र 1 वर्ष वैद्य राहते

हे तुम्हाला बँकेत जमा करावे लागते बँक तुम्हाला काही कागदपत्रे मागतील ती कागदपत्रे {प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी असू शकतात }परंतु आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला प्रोजेक्ट रिपोर्ट यावर देखील तुम्हाला बँक कर्ज देऊ शकते

बँक तुम्हाला हप्ते ठरवून देतील त्याबरोबर त्यावरील व्याज देखील बँक कापून घेते त्याकरिता तुम्हाला आता त्या स्लिपची पावती महामंडळाच्या वेबसाईटवर येऊन लॉगिन करायचे आहे

आणि ती पावती अपलोड करायची आहे महास्वयम वेबसाईटवर पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला अप्रोवल मिळून जाईल व तुमच्या बँक खात्यामध्ये महामंडळ बँकेचे व्याज कापले आहे ते जमा करून देईल अशाप्रकारे हे बिनव्याजी कर्ज तुम्हाला मिळून शकते

महामंडळाच्या अटी आणि शर्ती

15 लाख वैयक्तिक योजनेसाठी पाच ते सात वर्षांपर्यंत महामंडळ 12% व्याज परतावा देते.

जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत व्याज परतावा लाभार्थ्याला मिळतो.

व्यवसाय सुरू केल्यानंतर सहा महिन्यांमध्ये तुमच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावे लागतात

त्यानंतर दर चार महिन्याला ते फोटो पाठवत राहावे लागतात

व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसायाच्या फलकावर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या सौजन्याने असा स्पष्ट उल्लेख करावा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2024! याच महिलांना मिळणार 3000 रुपये! तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर करावे लागेल अशी प्रक्रिया?

अर्ज प्रक्रिया

  • अर्जदाराला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
  • होम पेजवर वैयक्तिक कर्ज परतावा योजना (IR-i) वर क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुमचा जिल्हा निवडून लागू पाटणावर क्लिक करा
  • आता अर्ज ओपन होईल त्यावर तुमची वैयक्तिक माहिती (तुमचे नाव जन्मदिनांक आधार नंबर मोबाईल नंबर ईमेल लिंग) ही माहिती भरायची आहे आणि अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्या निवासस्थानाची माहिती (राष्ट्रीयत्व अधिवास राज्य पॅन कार्ड नंबर कायमचा पत्ता शैक्षणिक अहर्ता) ही माहिती भरून जतन करा बटनावर क्लिक करायचे आहे
  • आता कर्जदाराला त्याच्या कर्जाचा तपशील (व्यवसायाचे नाव व्यवसायातून मिळणाऱ्या अंतिम उत्पन्न व्यवसायाचा पत्ता बँकेकडून आवश्यक लागणारी रक्कम) भरायचे आहे आणि अर्ज जतन करा बटनावर क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्या कागदपत्रांचे प्रती (आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंब सदस्याचे ITR रिटर्न व इतर कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करून जतन करा बटनावर क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्यासमोर शपथपत्र येईल त्यामध्ये मला सहमत आहे यावर क्लिक करायचे आहे
  • अशाप्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

Pm Jan dhan Yojana 2024 प्रधानमंत्री जन धन योजना लाभार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये पहा कशाप्रकारे करायचा अर्ज

निष्कर्ष

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या मार्फत राज्यातील तरुणांना व्यवसायासाठी दहा लाख ते 50 लाख पर्यंत आर्थिक मदत केली जाते तरी वरील माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून घेण्यात आली असून तुम्ही अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.