उद्धव ठाकरे : “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करू शकतो, हे भविष्यात दिसेल,” अशा कडव्या शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इशारा दिला. “जेवढे अंगावर याल, तेवढे अंगावर वळ घेऊन दिल्लीत परत जाल,” असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यासोबतच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करत, “शिवसैनिक वेळ आल्यावर रक्तदान करतील, पण संघाचे कार्यकर्ते गोमूत्र वाटतील,” अशी टीका केली. शिवाय, मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात “शिवसैनिकांच्या मनाप्रमाणे एकटे लढण्याचा निर्णय घेईन,” असे जाहीर करत ठाकरे यांनी महाविकास आघाडीवरही टांगती तलवार ठेवली आहे. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “दोन महिन्यांपूर्वी जो निकाल लागला, तो मला पटला नाही. जिथे आणि जेव्हा आणि आणि जर औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा ‘किस झाड की पत्ती’ अशी घणाघाती टीका केली.” यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, “लोकसभेनंतर आपण भ्रमात राहिलो हे सत्य मान्य करायल हवे.” ठाकरे यांनी भाजपवर आरोप केला की, त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार केला.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दंगलीसाठी माफी मागण्याच्या आरोपावर सुस्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले, “माझ्या माफी मागण्याचा कांगावा केला जातो, मात्र माफी मी नाही, तर अटलबिहारी वाजपेयींनी मागितली होती. ‘It was a terrible mistake’ असे लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले होते,” असे सांगत त्यांनी शहांना सल्ला दिला की, याबाबत अडवाणींना विचारावं. यावेळी ठाकरे यांनी वांद्र्यात गद्दारांचा मेळावा सुरू असल्याची टीका केली आणि एकनाथ शिंदेवर हल्ला चढवला. “गद्दार जिंकले असले तरी महापालिका निवडणुकीनंतर त्यांना त्यांच्या जागा दाखवून दिल्या जातील,” असा इशारा त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांची अमित शहा आणि पंकजा मुंडेवर जोरदार टीका
उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना लक्ष्य करत सांगितले, “माझी जागा ठरवताना, तुमची जागा काय होती, त्यातून बाळासाहेबांनी कसे बाहेर काढले, हे पाहा.” यासोबतच, पंकजा मुंडे यांच्या गुजरातमधून ९० हजार लोक आणल्याच्या विधानावर ते म्हणाले, “ते लोक कुठे गेले आहेत ते विचारा,” असा टोला शहा यांना लगावला. उद्धव ठाकरे यांच्या या चोख टीकेने राजकीय वातावरण आणखी तणावपूर्ण केले आहे.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…