Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024:प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही देशातील गरीब जनतेसाठी मोफत धान्य पुरवण्याच्या हेतूने चालू केलेली होती. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी ही एक महत्वपूर्ण योजना आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची सुरुवात 26 मार्च 2020 रोजी केली होती.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ देशातील 80 कोटी लोक घेत आहेत. या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला 35 किलोग्रॅम धान्य योजनेमार्फत दिले जाते. तसेच प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला पाच किलो अन्नधान्य अतिरिक्त देण्यात येते. यामध्ये तांदूळ गहू एक किलो डाळ यांचा समावेश आहे.

कोरोना काळामध्ये अनेक लोक बेरोजगार झाले होते. त्यामुळे त्यांना अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती.त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे व त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना 2028 पर्यंत चालू राहणार आहे. व या योजनेचा लाभ देशातील गरीब जनतेला घेता येणार आहे. तर या सर्वांची माहिती आपण खाली दिलेली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना |
सुरुवात | 26 मार्च 2020 |
शेवटची दिनांक | 2028 पर्यंत लागू राहणार |
उद्देश | गरीब जनतेला अन्नधान्य पुरविणे |
लाभ | देशातील जनतेला प्रत्येक कुटुंबाला 35 किलो तसेच अंत्योदय योजनेद्वारे दर महिना पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जाते. |
अधिकृत वेबसाईट | https://dfpd.gov.in/Home/ContentManagement?Url=pmgka.html&ManuId=3&language=1 |
Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024
कोरोना काळामध्ये अनेक लोक बेरोजगार झाले होते. त्यांना जीवनाच्या वस्तू मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. हे सरकारने लक्षात घेऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची सुरुवात केली होती. या योजनेचा लाभ देशातील 80 कोटी लोक घेत आहेत. या योजनेची सुरुवात 26 मार्च 2020 रोजी केली होती.या योजनेअंतर्गत कुटुंबाला 35 किलो धान्य मिळते. तसेच प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त धान्य दर महिन्याला देण्यात येते .
अलीकडेच ही योजना 2028 पर्यंत राबविण्याचे घोषणा सरकारने केलेली आहे त्यामुळे जनतेला या योजनेचा लाभ 2028 पर्यंत घेता येणार आहे. अन्नधान्यांच्या टंचाई पासून लोकांना मुक्त करणे व ज्यांच्याकडे अंत्योदय कार्ड आहे त्यांना दुप्पट अन्नधान्य या योजनेनुसार दिले जाते. कोरोना काळात देशातील गरीब जनतेला या बिकट परिस्थिती मधून बाहेर काढणे खूप आवश्यक होते. अनेक लोक बेरोजगार झाल्याने त्यांचे जीवनमान खालवले होते यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे फायदे
मोफत धान्य वाटप कोरोना काळामध्ये जे लोक बेरोजगार झाले होते. किंवा जे लोक अन्नधान्य मिळवण्यासाठी असमर्थ आहेत .अशा लोकांना पाच किलो अतिरिक्त धान्य दर महिना मिळणार आहे. त्यामध्ये गहू तांदूळ एक किलो दाळ यांचा समावेश आहे आर्थिक मदत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनतेला अन्नधान्य उपलब्ध करून दिल्याने जनतेचे अन्नधान्य वर होणारा खर्च वाचणार आहे. त्यामुळे त्यांचे परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होणार आहे .
प्रधानमंत्री कल्याण अन्न योजनेचा उद्देश
देशातील सर्व गरीब लोकांना धान्य देऊन आर्थिक मदत करणे प्रत्येक व्यक्तीला दर महिना पाच किलो अतिरिक्त धान्य पुरविणे गरीब जनतेला मोफत धान्य देणे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या पात्रता
- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत विधवा स्त्रियांना अन्नधान्य उपलब्ध करून त्यांना सहाय्य केले जाणार आहे.
- जे लोक गंभीर आजारी आहेत अशा लोकांना चांगल्या दवाखान्यामध्ये उपचार देण्यात येणार आहे.
- अपंग असलेल्या व्यक्तींना पाच किलो प्रति महिना अतिरिक्त धान्य मिळणार आहे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींना देखील मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे.
- दारिद्र्य रेषेखाली असलेले शिधापत्रिका धारक
- नॅशनल फूड सेक्युरिटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थी
- अंत्योदय योजनेचे लाभार्थी
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- शिधापत्रिका
- आधार कार्ड
- दारिद्र रेषेखालील कार्ड
- अंत्योदय अन्न योजना कार्ड
योजनेचा लाभ कसा मिळवायचा?
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याकडे असलेली शिधापत्रिका घेऊन जवळच्या सार्वजनिक धान्य वितरण केंद्रावर जायचे आहे व तेथून आपल्याला धान्य देण्यात येईल अशा प्रकारे आपण योजनेचा लाभ घेऊ शकता
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अर्ज प्रक्रिया
या योजनेसाठी देशातील सर्व नागरिक पात्र असतील ज्यांच्याकडे शिधापत्रिका उपलब्ध आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिरिक्त अर्ज करण्याची काही गरज नाही आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले शिधापत्रिका जवळच्या सार्वजनिक धान्य वितरण केंद्रावर घेऊन जायचे आहे व तेथे जमा करायचे आहे. योजनेअंतर्गत मिळणारे धान्य तुम्हाला त्या केंद्रावरून देण्यात येईल
निष्कर्ष
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही कोरोना काळामध्ये सुरू केली होती कोरोनामुळे देशातील जनता बेरोजगार झाल्यामुळे त्यांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे होते हे लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री करीत कल्याण योजना 26 मार्च 2020 ला सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 35 किलो धान्य व अंत्योदय योजनेमार्फत पाच किलो अतिरिक्त दर महिना धान्य मोफत दिली जाते. ही योजना 2028 पर्यंत चालवण्याचा सरकारचा निर्णय आहे. विधवा महिला साठ वर्षापर्यंत वयोवृद्ध व्यक्ती तसेच अपंग आणि गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींना तसेच दारिद्र रेषेखालील लोकांना या योजनेमार्फत मार्फत लाभ दिला जाणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने बाबत विचारलेले प्रश्न
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना का सुरू केली होती?
कोरोना काळामध्ये अनेक लोक बेरोजगार झाले होते त्यांना अन्नधान्य उपलब्ध करण्यासाठी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यांना अन्नधान्य पुरविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली होती
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा उद्देश्य काय आहे?
देशातील जनतेला मोफत मध्ये अन्नधान्य पुरविणे व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत किती किलो अन्नधान्य मोफत मध्ये मिळते?
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो दर महिना तसेच अंत्योदय योजनेमार्फत प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त धान्य मोफत मध्ये दिले जाते.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची केव्हा सुरुवात केली होती?
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची सुरुवात 26 मार्च 2020 रोजी करण्यात आली होती.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…