प्रधानमंत्री जन धन योजना (JMJDY) प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी केली होती या जनधन योजनेचा देशातील लाखो कुटुंबांना लाभ झाला आहे. जनधन योजनेचा मुख्य उद्देश्य ग्रामीण भागातील लोकांना बँकेच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा होता भारतामध्ये कोटीच्या संख्येने लोकांनी जनधन खाते उघडले होते. याच जनधन योजनेमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कार्य करत आहे.
पीएम जनधन योजनेद्वारे खाते उघडणाऱ्या ग्राहकाला फ्री मध्ये सर्व बँकेच्या सेवा पुरविल्या जाणार आहे. जनधन योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर 10000 रक्कम ओव्हर ड्राफ्ट स्वरूपात केंद्र सरकार देणार आहे. म्हणजेच खात्यावर 1 रुपया सुद्धा नसला तरी पण हे दहा हजार रुपये ओव्हर ड्राफ्ट च्या स्वरूपात ग्राहकाला भेटणार आहेत,

ज्या ग्राहकांचे खाते आधार कार्डशी लिंक नाही. त्यांना खाते लिंक केल्यावर 5 ते 6महिन्यांनी या योजनेचे 10000 रुपये ओव्हरड्राफ्ट करता येतील. प्रौढ नसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी बँक खाते उघडण्याचे लक्ष या योजनेचे आहेत 2024 मध्ये जनधन योजनेच्या लाभामध्ये वाढ करण्यात आली आहे.
ओव्हरड्राफ्ट करण्याची रक्कम 5000 पासून 10000 रुपये करण्यात आली आहे .रूपे कार्ड असणाऱ्या ग्राहकांना1 लाख ते 2लाखापर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे .ही जनधन योजना 2024 देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. हे जनधन खाते उघडल्यानंतर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याला 30000 रुपये विमा स्वरूपात सरकार देणार आहे हे खाते उघडल्यानंतर ग्राहकांना वित्तीय सेवा सुविधांचा सहजपणे लाभ प्राप्त होणार आहे .जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठीची संपूर्ण माहिती आम्ही खाली लेखांमध्ये नमूद केलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक पहावी.
प्रधानमंत्री जन धन योजना
योजनेचे नाव | पीएम जनधन योजना 2024 |
योजनेची घोषणा | नरेंद्र मोदी |
सुरुवात | 15 ऑगस्ट 2014 |
लाभ | खाते उघडल्यानंतर 10000 रुपये ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात मिळणार |
लाभार्थी | देशातील नागरिक |
अधिकृत वेबसाईट | pmjdy.gov.in |
BandhKam kamgar Yojana| महाराष्ट्र बांधकाम योजना कामगारांना मिळणार 5000 रुपये,पहा योजना काय आहे?
JMJDY योजना काय आहे?
आतापर्यंत देशातील 47 कोटी पेक्षा जास्त लोकांनी जनधन खाते उघडले आहेत. हे जनधन खाते नागरिक मोफत ओपन करू शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक भरणे करण्याची काहीही गरज नाही. याशिवाय ग्राहकांना सर्व बँकिंग क्षेत्राच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. या योजने द्वारे देशातील लोकांचे खाते सेविंग खात्याला तसेच विमा संरक्षण आणि पेन्शन सारख्या इतर खात्याला जोडले गेले आहे.
याद्वारे ग्राहकांना एकाच खात्यावर सर्व योजनांचा लाभ मिळतो. जनधन योजनेअंतर्गत ग्राहक आपल्या बँक खात्याचे कोणतेही कागदपत्र न दाखवता 5000 रुपये ते 10000 रुपये पर्यंत रकमेचे ओव्हर ड्राफ्ट मिळू शकतात.जनधन खाते उघडल्यास ग्राहकांना दहा हजार रुपये मिळतात .त्याचबरोबर 1 लाख 30000 रुपये विमा संरक्षण देखील मिळते.
प्रधानमंत्री जन धन योजना benefit
जनधन खाते उघडल्यानंतर एक लाखापर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळते. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस 10000 रुपये ओवरड्राफ्ट करता येणार आहे. जनधन खात्यामार्फत विमा संरक्षण पेन्शन इतर सर्व बँकिंग क्षेत्राच्या सेवा सुविधा एकाच खात्यावर मिळतात. केंद्र सरकारने आत्तापर्यंत 117095.50 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. आपण खात्यावर शून्य बॅलन्स देखील ठेवू शकता पीएम जनधन योजनेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांना लाभ दिला जाणार आहे, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची बँकिंग सुविधा उपलब्ध नाही.
Pm Jan dhan Yojana पात्रता
- लाभार्थी हा मूळ भारतीय नागरिक असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावी.
- दहा वर्षाखालील मुलांनी अर्ज केल्यास त्यांना त्यांच्या pmjdy खाते व्यवस्थित करण्यासाठी कायदेशीर पालकांकडून समर्थन असावे.
- अर्जदाराचे जास्तीत जास्त वय 65 वर्षे असावे शून्य बॅलन्स सह खाते उघड होऊ शकतात .
- या योजनेचा लाभ केंद्र व राज्य सरकारी नोकरीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.
- कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावी.
Pm Jan dhan Yojana कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड यापैकी एक असणे आवश्यक आहे.
- कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट फोटो
- Pmjdy खाते उघडण्याचा भरलेला फॉर्म आणि त्यावर केलेले स्वाक्षरी फॉर्म
- केंद्र सरकारने काही बदल केलेले असल्यास त्यांनी सांगितलेले कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे .
जनधन खात्यावरून 10000 रुपये ओव्हरड्राफ्ट कशाप्रकारे करायचे?
प्रधानमंत्री जनधन योजने द्वारे केंद्र सरकार खाते धारकांना दहा हजार रुपये ओव्हरड्राफ्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही रक्कम ग्राहकांना उधार स्वरूपात मिळणार आहे.त्यानंतर आपल्याकडे जेव्हाही रक्कम येईल तेव्हा आपण ती रक्कम सरकारला परत करू शकता.
ही रक्कम ग्राहकांना घ्यायचे असल्यास त्यांना त्यांचे जनधन खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकेत जाऊन ओव्हरड्राफ्ट फॉर्म घ्यायचा आहे आणि तो भरून जमा करायचा आहे हा फॉर्म भरून दिल्यानंतर 48 तासात तुम्हाला तुमच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करण्यात येतील.
How to open bank account in pradhanmantri Jan dhan Yojana अर्ज प्रक्रिया

- सर्वप्रथम फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट pmjdy वर जायचे आहे .
- तिथे आल्यानंतर ही कागदपत्रांमध्ये नवीन खाते उघडा या लिंक बटणावरती क्लिक करायचे आहे.
- आपण मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतून अर्ज प्रक्रिया करू शकता.
- यातील योग्य ते भाषेचा निवड करा.
- आता तुमच्यासमोर फॉर्म पीडीएफ स्वरूपात ओपन होईल तो डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या.
- त्या फॉर्म वरती बँकेची शाखा गावाचे नाव जिल्हा आधार नंबर वार्षिक उत्पन्न व्यवसाय किसान क्रेडिट कार्ड ची माहिती इतर सर्व माहिती भरून घ्या .
- ही माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन तो फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म सबमिट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर व आधार कार्ड नंबर किंवा ईमेल आयडी ही कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागतील.
- अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री जनधन खाते उघडू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
निष्कर्ष
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 मध्ये जनधन योजनेची घोषणा केली होती याद्वारे देशातील कोटीच्या संख्येने नागरिकांनी हे जनधन खाते उघडले होते. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत देशातील नागरिकांच्या बँक खात्यावर सरकारने सुमारे एक लाख 18 हजार कोटी रुपये जमा केलेले आहे 2024 मध्ये आता या जनधन योजनेमध्ये मिळणाऱ्या लाभामध्ये वाढ करण्यात आलेली असून त्यामध्ये विविध क्षेत्रांचा आणि सेवा सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे .त्यामुळे ग्राहकांना आता सर्व सेवांचा लाभ एकच खात्यावर ती उपलब्ध होऊन ते सुरळीतपणे सेवांचा फायदा प्राप्त करू शकतात. तरी आम्ही वरती लेखांमध्ये या योजनेसाठीचे पात्रता आवश्यक कागदपत्रे जनधन खाते कसे उघडायचे या योजनेचा उद्देश्य लाभ हे सर्व ची माहिती दिलेली आहे तरी आपल्याला या लेखांमधून महत्वपूर्ण माहिती मिळाली असेल. अशी आशा बाळगतो. तुम्ही या योजनेची अधिकृत माहिती केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्राप्त करू शकता, धन्यवाद
केंद्र सरकार जनधन योजनेअंतर्गत ओवरड्राफ्टच्या स्वरूपात किती रक्कम ग्राहकांना देणार आहे?
प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस जनधन खाते उघडल्यानंतर दहा हजार रुपये ओव्हर ड्राफ्ट च्या स्वरूपात मिळणार आहेत
जनधन योजनेचा उद्देश काय आहे?
देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोकांपर्यंत बँकिंग क्षेत्राच्या सेवा सुविधा सहज रित्या उपलब्ध करून देणे
जनधन योजनेअंतर्गत अपघाती विमा स्वरूपात किती रुपये मिळतात?
जन धन योजनेअंतर्गत अपघात झाल्यानंतर एक लाखा पासून दोन लाखापर्यंत विमा मिळतो

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…