Newasa news :दि. 3 जानेवारी रोजी सौंदाळा येथील मंदिरातून 4,000 रुपये किमतीची गणपती मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ माजली. याबाबत संजय मोहन आरगडे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी अ-दखलपात्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आणि तात्काळ कारवाई करत डीबी पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशी सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नेवासा पोलिसांची तातडीची कारवाई: चोरीस गेलेल्या गणपती मूर्तीचा शोध लावला
नेवासा तालुक्यातील सौंदळा परिसरातील मंदिरात झालेल्या गणपती मूर्ती चोरीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला होता. या भावनांची गंभीर दखल घेत नेवासा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस ठाण्यातील डीबी पथकाला विशेष जबाबदारी सोपवून तपासाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली.
तपासादरम्यान, मंदिर आणि सौंदळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. त्यातून चोरीच्या दिवशी दुपारी 2.30 च्या सुमारास एक संशयित व्यक्ती सिटी हंड्रेड मोटरसायकलवर संशयास्पदरीत्या जाताना दिसून आला. पोलिसांनी त्या मोटरसायकलच्या मार्गावरील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताच्या ठिकाणापर्यंत पोहोचले. तपासात बाभुळखेडा येथील नवनाथ कडू हा इसम संशयित म्हणून सापडला.चोरीबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला नवनाथने दोष नाकारला. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशीसाठी योग्य दबाव आणल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली आणि चोरलेली गणपती मूर्ती पोलिसांच्या ताब्यात दिली. या घटनेमुळे पोलिसांच्या तातडीच्या कारवाईचे कौतुक होत आहे.
सौंदाळा गणेश मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा: पोलिसांची तातडीची कारवाई
सौंदाळा येथील गणेश मूर्ती चोरी प्रकरणात ताब्यात घेतलेला इसम नवनाथ कडू हा मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
गणपती मूर्ती चोरीने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिनांक 24 जानेवारी रोजी कुकाना पोलीस दूरक्षेत्रासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून मूर्तीचा छडा लावण्याचे आश्वासन दिले. यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
दरम्यान, गणेश मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागल्याने सौंदाळा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.ही कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या पथकात पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवे, नारायण डमाळे, सुमित करंजकर, अविनाश वैद्य, भारत बोडके, आणि अरुण गांगुर्डे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश भोंगळ आहे. मी तीन वर्षापासून लॉगिन क्षेत्रात आहे मला सरकारी योजना सरकारी नोकरी विषयी लिहिण्यासाठी आवडते.