ladki bahin yojana 6th installment fix: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की लाडकी बहीण योजना या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही.
राज्यातील महिलांना मिळणार दिवाळी बोनस..! महिलांच्या खात्यावरती जमा होणार १०००० रुपये
ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत आणि काहीच बदल नाहीये. मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण अपरेंटली असं लक्षात येतंय की काहींनी चार-चार खाती उघडलेली आहेत.
जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे.
आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसांनीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यांना या योजनेपासून फायदा देण्यात येणार नाही असे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत म्हणाले आहेत.