Newasa news:शनिशिंगणापूर येथे ऋषिकेश शेटे यांना का येता आले नाही, पहा निवडणूक प्रक्रियेतील प्रशासनाची भूमिका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Newasa news :शनिशिंगणापूर​ येथे बाळासाहेब मुरकुटे यांनी विरोधकांना आवाहन केले होते की तुम्ही लावलेले आरोप माझ्यावर सर्व खोठे आहे, यावर ऋषिकेश शेटे यांनी दिलेले आव्हान स्वीकारले होते व तुम्ही या आम्ही पण येतो असे आव्हान दिले होते,

त्यानंतर पोलीस प्रशासनाने ऋषिकेश शेटे यांना तेथे न जाण्यास कळविले व आदर्श आचारसंहितेची नोटीस देऊन त्यात असे म्हटले की ,श्री. ऋषिकेश शेटे यांना शनिशिंगणापुर पोलिसांनी आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या संदर्भात नोटीस दिली आहे त्यामध्ये असे म्हटले होत ,

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापुर पोलिसांनी भाजप कार्यकर्ते श्री. ऋषिकेश वसंत शेटे यांना आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या संदर्भात नोटीस जारी केली आहे. पोलिस निरीक्षक श्री. खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शेटे यांना जारी केलेल्या नोटीसमध्ये मतदान प्रक्रिया आणि प्रचारादरम्यान काही ठराविक नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नोटीसच्या तपशिलांनुसार, श्री. शेटे यांना खालील आदेश दिले आहेत.

Newasa news

प्रहार जनशक्तीचे उमेदवार श्री. बाळासाहेब मुरकुटे यांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रचार फेरीसाठी परवाना देण्यात आलेला आहे. त्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वये परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. शनि मंदिर परिसरात समोरासमोर येणे मनाई:
श्री. बाळासाहेब मुरकुटे यांच्या शनिशिंगणापुर येथील प्रचार फेरीदरम्यान विरोधकाच्या उमेदवाराचे कार्यकर्त्यांसोबत वादविवाद किंवा समोरासमोर चर्चा करणे कायदा आणि सुव्यवस्था भंग करणारे ठरू शकते. त्यामुळे शनिमंदिर परिसरात ९ नोव्हेंबर २०२४ रोजी कोणत्याही प्रकारची अशी भेटघाट किंवा वादविवाद करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.आदर्श आचारसंहिता उल्लंघनासारख्या गंभीर प्रकरणात कारवाई
वरील सूचनांचे पालन न केल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग होईल आणि त्याप्रमाणे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी सांगितले की, आदर्श आचारसंहिता भंग केल्यास संबंधित व्यक्तीला जबाबदार ठरवले जाईल आणि पुरावा म्हणून नोटीस न्यायालयात सादर करण्यात येईल.नोटीस जारी करण्याची तारीख ही नोटीस ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री. खगेंद्र टेंभेकर यांच्या सहीसह दिली गेली आहेत ,त्यातच आज नऊ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब मुरकुटे यांनी शनि देवाची शपथ घेतली आहे, तसेच ऋषिकेश शेटे यांना कायद्याने थांबविल्यामुळे राजकीय वर्तुळात या आरोप प्रत्यारोपचा मोठी चर्चा होत आहे

Newasa news

आणि मिरवणुकीवर प्रतिबंध:
मतदान प्रक्रिया आणि प्रचारादरम्यान सार्वजनिक ठिकाणी मिरवणूक काढणे, जमाव तयार करणे किंवा गर्दी निर्माण करणे यावर पूर्णपणे प्रतिबंध आहे. तसेच, प्रार्थना स्थळांचे आसपास कोणत्याही सार्वजनिक जागी लोकांचा एकत्र येणे किंवा अडथळा निर्माण करणे मनाई आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a comment