राज्यातील महिलांना मिळणार दिवाळी बोनस..! महिलांच्या खात्यावरती जमा होणार १०००० रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दिवाळी बोनस : लाडकी बहीण योजने संदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य शासनाच्या आजच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यातील महिलांना दिवाळी बोनस म्हणून 10000 रुपये देण्यात येणार आहे. तर कोणत्या महिलांना 10000 रुपये मिळणार आहेत यासाठी पात्रता काय असणार आहे अर्ज कसा करायचा आहे याचीच माहिती आज आपण बघणार आहोत.

हे देखील वाचा –माझी लाडकी बहीण योजनेसाठी या तारखेपर्यंत करा अर्ज मिळतील दीड हजार रुपये प्रति महिना

ज्या महिलांना mazhi Ladki bahin योजनेचे 7500 रुपये मिळालेले आहेत त्यांना उर्वरित 2500 रुपये केव्हा मिळणार आहेत यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे आणि ज्या महिलांना आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळालेला नाही त्यांना या योजनेचे 7500 रुपये मिळणार आहे

महिलांना दिवाळी बोनस 7500 रुपये मिळण्याची आज शेवटची दिनांक म्हणजे 10 ऑक्टोंबर ही आहे. आज राज्यातील 80 लाख महिलांना हे 7500 रुपये त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे.

कोणत्या महिलांना ७५०० रुपये मिळणार आहेत?

ज्या महिलांनी 31 ऑगस्ट पूर्वी आपला फॉर्म सबमिट कर केला होता आणि तो अप्रुवल देखील झालेला होता त्याचबरोबर त्यांचे डीबीटी ही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेले होती त्या महिलांना आता या योजनेचे साडेसात हजार रुपये देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा –Ladki Bahin Yojana 2024 :’हा’ फॉर्म भरा !झटपट बँकेत योजनेचे पैसै होतील जमा

कोणत्या महिलांना दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत

ज्या महिलांना ladki bahin या योजनेचे तीन टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत त्यांना आता दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये देण्यात येणार आहेत.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार १०००० रुपये

माझी लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये आणि उर्वरित अडीच हजार रुपये हे अन्नपूर्णा योजनेचे असणार आहेत अशा एकूण दहा हजार रुपये राज्यातील महिलांना दिवाळी साजरी होण्यासाठी देण्यात येणार आहे तर annpurna Yojana चे अडीच हजार रुपये कशा प्रकारे मिळवायचे यासाठी निकष पात्रता खाली दिलेली आहे.

Mukhymantri annpurna Yojana Maharashtra 2024;महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 1 वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत, त्यासाठी अशा प्रकारे करावे लागणार अर्ज

अन्नपूर्णा योजना पात्रता काय?

  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • सद्यस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत पात्र असलेले सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल.
  • एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल.
महिलांच्या खात्यावरती जमा होणार १०००० रुपये

निकष

राज्यात सुमारे अडीच कोटी महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेला आहे राज्यातील महिलांना चौथ्या व पाचव्या महिन्यातील साडेसात हजार रुपये पर्यंत रक्कम आतापर्यंत त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त दिवाळी आनंद साजरी व्हावी यासाठी अन्नपूर्णा योजनेचे आणखी अडीच हजार रुपये येईल महिलांना देण्यात येणार आहे अशा प्रकारे एकूण दोन योजनांचे मिळून दहा हजार रुपये महिलांना मिळणार आहेत.

FAQ

महिलांच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये किती तारखेपर्यंत जमा केले जाणार आहेत?

10 ऑक्टोंबर या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा केले जाणार आहेत .

कोणत्या महिलांना साडेसात हजार रुपये मिळणार आहेत?

ज्या महिलांना आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजना चा एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना हे साडेसात हजार रुपये मिळणार आहेत. त्यापैकी ज्या महिलांनी 31 ऑगस्ट पूर्वी आपला फॉर्म जमा करून तो अप्रोवल देखील झाला होता. त्याच महिलांना हे साडेसात हजार रुपये मिळणार आहेत

राज्यातील महिलांना दहा हजार रुपये कशाप्रकारे मिळणार आहेत?

माझी लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये आणि अन्नपूर्णा योजनेचे अडीच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये महिलांना मिळणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “राज्यातील महिलांना मिळणार दिवाळी बोनस..! महिलांच्या खात्यावरती जमा होणार १०००० रुपये”

Leave a comment