Crop Insurance 2024 : जालना जिल्ह्यात पिक विमा मंजूर झालेला आहे.जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
Crop Insurance 2024 माहिती
यासंबंधी जिल्हा स्तरीय पीक विमा समितीने 25% पिक विमा मंजूर केला आहे.जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आलेल्या रँडम सर्वेक्षणात 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने जमा केले 10,000 रुपये
यामध्ये तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन यांसारखी पिके समाविष्ट आहेत. संबंधित अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक मंडलातील नुकसानाचे प्रमाण स्पष्ट केले जाईल.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी या विम्याचे वितरण करण्यात येईल, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत मिळू शकेल. या संदर्भातील इतर जिल्ह्यांची अद्यतने देखील उपलब्ध केल्या जातील.