Honor 200 Smart 5G : ही कंपनी भारतातील एक महत्वपूर्ण मोबाईल कंपनी पैकी एक आहे. या कंपनीने नुकताच आपल्या 200 सिरीज मध्ये एक नवीन फोन लॉन्च केलेला आहे त्याचे नाव आहे Honor 200 Smart 5G या फोनच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना कमी किमतीमध्ये चांगले फ्युचर देणार आहे.
Honor कंपनीने आपल्या 200 सिरीज मध्ये Honor 200 Smart 5G हा मोबाईल फोन जोडलेला आहे.हा मोबाईल फोन त्या ग्राहकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ज्या ग्राहकांना कमी किमतीमध्ये चांगला फोन पाहिजे होता,त्यांच्यासाठी हा फोन फायद्याचा ठरणार आहे.हा मोबाईल फोन Honor 200 , 200 प्रो, 200 लाईट या सिरीजच्या तुलनेमध्ये फारच कमी किमतीचा आणि चांगल्या वैशिष्ट्ये असलेला मोबाईल फोन आहे.
या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 6.8 इंच डिस्प्ले,50 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा, 35w सपोर्ट,यासोबत या फोनची बॅटरी 5200mAh देण्यात आलेली आहे चला तर मग बघूया या फोनचे काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
Honor 200 Smart 5G Specifications
Honor 200 स्मार्टफोनमध्ये 2412*1080 पिक्सल रेगुलेशन चा 6.8 इंच टीएफटी एलसीडी डिस्प्ले वापरण्यात आलेला आहे हा डिस्प्ले 16.7 मिलियन कलर्स ला सपोर्ट करतो. त्यामुळे या मोबाईल फोन मध्ये काढण्यात आलेले फोटो अतिशय व्हायब्रेट आणि क्लिअर दिसतात. हा डिस्प्ले हॅलो मिनी सिलिकेट ग्लास पासून बनलेला आहे. यामुळे हा फोन टिकाऊ बनलेला आहे. ह्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन फोर जनरेशनचे टू प्रोसेसर आहे.जे ब्राउझिंग सोशल मीडिया हे ॲप वापरण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी त्याचप्रमाणे दररोजच्या कामांमध्ये तुम्हाला परफेक्ट परफॉर्मन्स देणार आहे. हा फोन 4GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज सोबत येणार आहे.
: 50MP कॅमेरा आणि 5200mAh बॅटरीसह Honor 200 Smart 5G लवकरच भारतात लॉन्च होईल, जाणून घ्या वैशिष्ट्येHonor 200 Smart 5G डिस्प्ले
या मोबाईल फोन मध्ये 6.8 इंच असलेला मोठा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले टीएफटी एलसीडी डिस्प्ले आहे हा डिस्प्ले 120 रिफ्रेश रेट सोबत येतो. या फोनमध्ये तुम्हाला व्हिडिओ अतिशय कलरफुल दिसणार आहे. त्याचबरोबर हा या फोनचा डिस्प्ले बनवण्यासाठी सिलिकेट क्लास चा वापर केल्यामुळे हा फोनचा डिस्प्ले अतिशय मजबूत तुम्हाला मिळणार आहे. इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला इतर कोणताही मोबाईल फोन इतक्या चांगल्या वैशिष्ट्या सोबत मिळणार नाही.
Honor 200 Smart 5G कॅमेरा
या फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा सेटअप तुम्हाला बघायला मिळणार आहे. या फोनमध्ये मागील बाजूस 2 कॅमेरे दिलेले आहेत. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सल चा असणार आहे तर 2 मेगापिक्सल चा डेप्थ सेंसर असलेला कॅमेरा असणार आहे. 50 एम पी चा मेगापिक्सल असलेला कॅमेरा वेगवेगळ्या प्रकाशामध्ये चांगली फोटो घेऊ शकतो. त्याचबरोबर दोन मेगापिक्सल सेन्सर असलेला कॅमेरा पोट्रेट साठी ब्लर बॅकग्राऊंड करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर या फोनमध्ये 8x डिजिटल झूम देखील करता येणार आहे. या कॅमेरा द्वारे तुम्ही1080p पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी तुम्हाला फोनच्या समोरील बाजू 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे जो चांगल्या प्रकारे सेल्फी फोटो कॅप्चर करतो आणि 1080p व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
Honor 200 Smart 5G बॅटरी
Honor 200 samrt 5g Battery या फोनमध्ये तुम्हाला 6.8 इंच असेल मोठा डिस्प्ले मिळालेलाच आहे परंतु याचबरोबर तुम्हाला याचा अधिक फायदा घेण्यासाठी बॅटरी देखील 5200mAh देण्यात आलेली आहे आणि एवढी मोठी बॅटरी म्हटल्यावर याला फास्ट चार्जिंग करण्यासाठी 35w वॅट सपोर्ट करणार आहे त्यामुळे हा फोन लवकरात लवकर चार्जिंग होणार आहे.
Honor 200 Smart 5G Price
Honor कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर या मोबाईलची किंमत €219.90 तीन भारतीय रुपयांमध्ये 20500 एवढी होते.कंपनीने हा मोबाईल फोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे आणि हा फोन लवकरात लवकर भारतात देखील लॉन्च करण्यात येणार आहे
या मोबाईलचे कलर आणि त्याचे वजन
हा मोबाईल फोन दोन कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे एक म्हणजे मिड नाईट ब्लॅक आणि दुसरा म्हणजे फॉरेस्ट क्रीम या दोन कलर मध्ये हा फोन लॉन्च करण्यात आलेला आहे. मिड नाईट ब्लॅक मॉडल 8.09 एम एम एवढा पातळ आहे आणि याचे वजन 191 ग्राम आहे. आणि फॉरेस्ट ग्रीन मॉडेल असलेला मोबाईल ८.२४ एमएम एवढा पातळ आहे आणि त्याचे वजन 193 ग्राम आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता येथे बघा
निष्कर्ष
Honor ह्या कंपनीने त्यांच्या 200 सिरीज मध्ये हा नवीन फोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे आणि हा मोबाईल लवकरच Honor 200 smart 5g india मध्ये लॉन्च होऊ शकतो या मोबाईल मध्ये वीस हजार रुपयांच्या किमतीमध्ये अनेक नवनवीन फीचर तुम्हाला बघायला मिळणार आहे या मोबाईल मध्ये तुम्हाला दोन कलर मिळणार आहे त्याचबरोबर आठ जीबी रॅम आणि 256 स्टोरेज मिळणार आहे या फोनचा डिस्प्ले आणि बॅटरी बॅकअप देखील चांगल्या प्रतीचा तुम्हाला देण्यात यायला आहे त्याचबरोबर या मोबाईल मध्ये दोन कॅमेरे जे तुम्ही एचडी मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही यांची ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अधिकृत माहिती देखील मिळवू शकता
- सनी लिओनीचे नाव ‘महतारी वंदन योजना’च्या लाभार्थी यादीत; बस्तरमधील मोठा गैरव्यवहार उघड
- राष्ट्रीय शेतकरी दिन 2024: इतिहास, महत्त्व आणि थीम
- २०२५ मध्ये अक्षय कुमारचे आगामी सिनेमे: बॉक्स ऑफिसचा खिलाडी पुन्हा सज्ज!
- ” Amazon वर Vivo V40 Pro 5G वर मोठा डिस्काउंट! जाणून घ्या ऑफर्स आणि फीचर्स”
- हरियाणाचे माजी मुख्यमंत्री OP Chautala News Live ओमप्रकाश चोटाला यांचे वयाच्या 86 या वर्षी निधन