Yojana Doot Bharti 2024 : महाराष्ट्रात युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. या योजनेचा एक भाग म्हणून राज्यात 50000 योजना दुतांची राज्य सरकारतर्फे निवड करण्यात येणार आहे तर या योजनेमार्फत योजना दूतांची निवड कशा प्रकारे केली जाणार आहे ही योजना काय आहे याचीच माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत तेव्हा तुम्ही आलेख काळजीपूर्वक बघावा
महाराष्ट्र सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करून सरकारची योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा यासाठी राज्यभरातून 50000 योजना दुधाची नेमणूक केली जाणार आहे.
2024 25 या आर्थिक वर्षापासून हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी 300 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
योजना दूत योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | योजना दूत |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | माहिती व जनसंपर्क मंत्रालय |
लाभार्थी | राज्यातील पदवीधर तरुण |
कालावधी | सहा महिन्यासाठी |
वेतन | दहा हजार रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 7 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 13 सप्टेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | योजना दूत भरती |
Yojana Doot Bharti 2024 काय आहे?
महाराष्ट्र सरकार विविध घटकांसाठी अनेक नवनवीन योजना घेऊन येत असतात. या योजनांची माहिती सर्व नागरिकांना मिळावी व त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी योजनांचा प्रसार व प्रसिद्धी करण्यासाठी राज्यभरातून पन्नास हजार योजना त्यांची नेमणूक राज्य सरकार करणार आहेत यामध्ये सुशिक्षित पदवीधर तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यांच्यासोबत एक करार केला जाणार आहे हा करार सहा महिन्यासाठी असणार आहे त्यांना यासाठी दहा हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.
योजना दुताची लोकसंख्या मागे निवड
प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक योजनादूत नेमण्यात येणार आहे
शहरी भागामध्ये 5000 लोकसंख्येमागे एक योजना दूताची निवड केली जाणार आहे
अशाप्रकारे राज्यभरात 50000 योजना दूतांची निवड केली जाणार आहे
योजना दूताला किती मानधन मिळणार आहे?
या योजना दूताला दर महिना दहा हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रवास खर्च व सर्व भत्ते समाविष्ट असणार आहेत
ज्या योजना दूताची निवड झाली आहे त्याच्यासोबत फक्त सहा महिन्याचा करार करण्यात येणार आहे आणि हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येणार नाही.
पात्रता
- उमेदवाराचे वय 18 ते 35 असणे आवश्यक आहे
- तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
- त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
- त्याच्याकडे मोबाईल पाहिजे
- त्याच्याकडे स्वतःचे बँक खाते असावे
- त्याच्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- त्याचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असले पाहिजे
कागदपत्रे
- मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज
- आधार कार्ड
- पदवी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
योजना दूत योजना अर्ज प्रक्रियेचा कालावधी
योजना दूत योजनेमार्फत पदवीधर तरुणांना अर्ज करण्याची सुरुवात 7 सप्टेंबर 2024 पासून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
यासाठी उमेदवाराला राज्य सरकारच्या महास्वयम या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला स्थान या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि योजनदूत या कार्यक्रमासाठी अर्ज करायचा आहे हा अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन देखील मिळवू शकता.
या योजनेसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आहे
प्रत्येक उमेदवारासोबत सहा महिन्याचा करार केला जाणार आहे या योजना दूध कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उमेदवारांचे काम हे शासकीय काम म्हणून बघितले जाणार नाही आणि या कामकाजाचा अनुभव भविष्यात त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मागणी किंवा हक्क सांगता येणार नाही आहे.असे हमीपत्र त्यांच्याकडून अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेच लिहून घेतले जाणार आहे.
निष्कर्ष
पुढच्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी सरकारची एक यंत्रणा असते त्याचबरोबर आता योजनेत या कार्यक्रमांतर्गत देखील सरकारच्या विविध योजनांचा प्रचार केला जाणार आहे यासाठी 300 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे
FAQ
योजना दूत योजनेअंतर्गत किती पदांची भरती केली जाणार आहे
महाराष्ट्रातून एकूण पन्नास हजार पदांची भरती केली जाणार आहे
या योजनेमार्फत किती वेतन दर महिना मिळणार आहे?
योजनेअंतर्गत दरमहा दहा हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे
योजना दूत कार्यक्रमाचा कालावधी किती असणार आहे?
या योजनेचा कालावधी सहा महिने असणार आहे
ग्रामपंचायत साठी किती योजनादूताची नेमणूक केली जाणार आहे?
प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक योजना दूत नेमण्यात येणार आहे
I have not received july august month month only September month received ₹1500
₹3000 pending
I have not received any amount when it will receive