सुकन्या समृद्धी योजना:भारत देशाचे नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात गेल्यापासून मुलींसाठी व महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू करण्यात आले आहेत त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे
त्या योजनेमार्फत सरकार मुलींना मोफत शिक्षण आणि लग्नाच्या वेळी लागणारा खर्च यासंबंधी आर्थिक निधी उपलब्ध करून देणार आहे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय पात्रता लागते काय कागदपत्रे आवश्यक आहेत तसेच कशाप्रकारे आपण या सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडू शकता तसेच याच्या अटी व शर्ती संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती काळजीपूर्वक पहावी
सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेमार्फत मुलींना भविष्यात शिक्षण उच्च शिक्षण त्याप्रमाणे लागण्यासाठी लागणारा खर्च यासंबंधी आर्थिक निधीची पूर्तता केली जाणार आहे त्यामुळे मुलींच्या आई वडिलांना मुलीसाठी जो काही भविष्यात खर्च लागणार आहे त्यासाठी चिंता करण्याचे काही कारण राहणार नाही
ही योजना भारत सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव या योजनेमार्फत सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या मुलीच्या नावाने एक बँकेत खाते उघडायचे आहे यामध्ये दरवर्षी कमीत कमी अडीशे रुपये पासून जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा ते करू शकतात या सुकन्या समृद्धीच्या खात्यावर जमा केलेल्या रकमेवर सरकारकडून 7.6 व्याज देखील भेटते
सुकन्या समृद्धी योजनेबाबत थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना |
सुरुवात | केंद्र सरकार |
लाभार्थी | दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली |
उद्देश्य | मुलींचे भविष्य सुरक्षित करणे |
लाभ | शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक मदत |
सुकन्या समृद्धी खात्यात भरायची रक्कम | दरवर्षी 250 रुपये पासून 1.5 लाखापर्यंत |
खात्यातून रक्कम कशी काढता येणार | मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येणार |
पूर्ण रक्कम कधी काढता येणार | मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर |
खात्यावरील रकमेवर किती व्याज मिळणार | 7.5 टक्के व्याज सरकार देणार |
कुटुंबातील किती मुलींचे खाते उघडता येतील | कुटुंबातील फक्त दोनच मुलींचे खाते उघडता येतील |
अधिकृत वेबसाईट | https://www.india.gov.in/sukanya-samriddhi-yojna |
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश्य काय आहे?
केंद्र सरकार मार्फत सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश्य लहान मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे
घरात मुलगी जन्माला आली की आई वडिलांना तिच्या भविष्यासाठी त्यामध्ये शिक्षण लग्नाचा खर्च त्याचे चिंता असते त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे
या योजनेमार्फत गरीब कुटुंबातील व्यक्ती सुद्धा सहजपणे आपल्या मुलीचे पूजेला भविष्यासाठी बँकेत जाऊन किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघड होऊ शकते त्यामुळे त्यांना आपल्या मुलीच्या भविष्यासाठी चिंता करण्याची काही गरज राहणार नाही
सुकन्या समृद्धी योजनेच्या अटी व शर्ती
सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते मुलगी दहा वर्षे होईपर्यंत उघडू शकतात
सुकन्या समृद्धी खात्यावर अडीचशे रुपयेपासून दीड लाखापर्यंत दरवर्षी जमा करू शकतात
सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडल्यानंतर त्यावर पंधरा वर्षे रक्कम जमा करणे अनिवार्य आहे
मुलीला उच्च शिक्षणासाठी खात्यावरील रक्कम काढायचे असल्यास ती 18 वर्षाची झाल्यावर एकूण रकमेतून 50 टक्के रक्कम ती काढू शकते
खाते उघडल्यानंतर रक्कम जमा केली नाही तर खात्यावर पन्नास रुपये दरवर्षी पेनल्टी पडते
एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींचे खाते सुकन्या समृद्धी योजनेसाठी उघडता येऊ शकते
सुकन्या खात्यावर जमा रकमेवर 7.6 व्याज मिळते सुकन्या समृद्धी खाते उघडल्यानंतर इन्कम टॅक्स पासून मुक्तता मिळते
सुकन्या समृद्धी योजनेच्या पात्रता
- मुलगी व तिच्या आई वडील भारताचे मूळ रहिवासी असावे
- एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींचे खाते या योजनेसाठी उघडू शकतात
- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी एका मुलीचे एकच खाते उघड होऊ शकतात
Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना
सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
सुकन्या समृद्धीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे घेऊन तुम्हाला पोस्ट ऑफिस वर येऊन जावे लागणार आहे ती खालील प्रमाणे आहेत
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- आई-वडिलांच्या आधार कार्ड/पॅन कार्ड/ओळखपत्र
- रहिवासी दाखला
- बँक किंवा पोस्ट ऑफिस ने मागितलेले इतर कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर 2024
जर तुम्हाला मॅच्युरिटी रकमेची गणना करायची असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी कॅल्क्युलेटर (SSY कॅल्क्युलेटर) द्वारे गणना करू शकता. प्रत्येक वर्षी केलेली गुंतवणूक आणि व्याजदर यासारख्या तपशिलांमधून मॅच्युरिटी रकमेची माहिती मिळवता येते. SSY योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर 7.6% व्याज दर प्रदान केला जातो.
सुकन्या समृद्धी खाते कसे उघडायचे?
SSY खाते उघडण्यासाठी, सर्वप्रथम पालकांना त्यांच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. आता येथून त्यांना सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज मिळवायचा आहे. आता तुम्हाला या अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्मसोबत जोडा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज सबमिट करावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुमच्या मुलीचे खाते उघडू शकता.
नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता | या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
FAQ
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कसे उघडायचे?
तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला सुकन्या योजनेंतर्गत खाते उघडायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता.
सुकन्या खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
सुकन्या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज, मुलीचा जन्म दाखला, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसने मागणी केलेली इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.