मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2024: महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सर्वांनाच याची काळजी आहे की, मला या योजनेचे पैसे जमा होतील की नाही.या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? आमचे अर्ज मंजूर झालेले आहेत मग आम्हाला हे योजनेचे पैसे जमा होतील काय? असे अनेक प्रश्न राज्यातील महिलांच्या मनात निर्माण होताना दिसत आहे.महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. तरीदेखील त्यांना एक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तरच त्यांना या योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत. तर ती कोणती प्रक्रिया आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत योजनेच्या पात्रता, यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याची सर्व माहिती आपण बघणार आहोत. ती तुम्ही लक्षपूर्वक वाचावी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
घोषणा | एकनाथ शिंदे |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व महिला |
उद्देश | महिलांना आर्थिक मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे |
लाभ | महिलांना दर महिना दीड हजार रुपये मिळणार आहे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन आणि ऑनलाईन |
अर्ज करण्याची सुरुवात | 15 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 31 ऑगस्ट 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |

Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024!प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची,पात्रता, कागदपत्रे,लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना राज्यातील गरीब महिलांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची घोषणा केली.
माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश्य राज्यातील महिलांना इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या गरजा पूर्ण करता याव्यात हा आहे.
या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना दर महिना1500 रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वर्षामध्ये तीन सिलेंडर देखील मोफत देण्यात येणार आहे.यासाठी राज्यातील 21 ते 60 वयोगटातील सर्व महिला पात्र असणार आहे. या मागचा सरकारचा एकच उद्देश आहे की महिलांना आत्मनिर्भर बनविणे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता,कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया खात्यामध्ये पैसे जमा होणार का नाही?त्याची माहिती खालील प्रमाणे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मिळणारे लाभ
- राज्यातील महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे 1500 रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहे.
- त्याचबरोबर महिलांना तीन गॅस सिलेंडर दरवर्षी मोफत मिळणार आहे.
- लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
- या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही मोफत आहे त्यासाठी महिलेला कोणत्याही प्रकारची पैसे देण्याची गरज नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता
- लाभार्थी महिला महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असावी.
- महिलेचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत नसावी.
- कुटुंबातील सदस्य पैकी कोणीही विधानसभा तसेच विधान परिषद व इतर कोणत्याही पदावर असू नये.
- लाभार्थ्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी.
- महिलेचे स्वतःचे बँक खाते असावे.
- महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती पेन्शन घेत नसावी.
- कुटुंबातील व्यक्ती किंवा संबंधित महिला सरकारी नोकरीत नसावी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- अधिवास किंवा जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- लग्नाचे प्रमाणपत्र
माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा?
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन प्रकारे अर्ज करण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यापैकी एक मोबाईलवर नारीशक्तीदूत ॲप च्या डाऊनलोड करून त्याद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता.
दुसरा मार्ग म्हणजे राज्य शासनाने 1 ऑगस्ट 2024 पासून माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे. त्याद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिलांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
नारीशक्तीदूत ॲपच्या साह्याने कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा?
- सर्वप्रथम आपल्याला play Store वरती जाऊन नारीशक्तीदूत ॲप डाऊनलोड करून इंस्टॉल करायची आहे.
- नारीशक्ती ॲप ओपन ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर terms and condition चा स्वीकार करून लॉगिन बटनावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती otp मिळेल तो otp नारीशक्तीदूत ॲप मध्ये टाकून verify बटणावरती क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमची सर्व माहिती तिथे टाकायची आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी होमपेज वरती यावे लागेल तिथे तुम्हाला लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म लिंक मिळेल त्याच्यावरती क्लिक करा.
- माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यावरती तुमची वैयक्तिक तसेच कौटुंबिक माहिती तिथे टाकायची आहे.
- तिथे खाली सबमिट करायचे बटन असेल तिथे तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही या आधी शासनाच्या कोणत्या योजना चा लाभ घेत आहेत का घेत असेल तर yes वरती क्लिक करा घेत नसाल तर no वरती क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर बँक खाते नंबर बँकेचा IFSC नंबर टाकायचा आहे आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- याच्यानंतर तुम्हाला Accpect हमीपत्र disclaimer पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि नंतर माहिती जतन करा या विकल्पावरती क्लिक करायचे आहे
- आता आपण टाकलेली सर्व माहिती आपल्यासमोर दिसायला सुरुवात होईल ती आपण चेक करून सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे आपण नारीशक्ती ॲप द्वारे अर्ज प्रक्रिया करू शकता.
Majhi ladaki bahin Yojana online apply Maharashtra official website:
- सर्वप्रथम तुम्हाला https://mukhyamantrimajhiladkibahinyojana.in/ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे.
- त्यानंतर मेनू ऑप्शन वरती क्लिक करून अर्जदार लॉगिन पर्यावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
- तिथे तुम्हाला doesn’t have create account विकल्पावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ओपन होईल.
- त्यावरती तुमची गाव जिल्हा सर्व माहिती टाकायचे आहे.
- ज्याप्रमाणे तुमची आधार कार्डवर आहे.
- त्यानंतर तुमचा पासवर्ड आणि municipal corporation निवडून terms and condition चा स्वीकार करायचा आहे.
- captcha code टाकून sign up वरती क्लिक करायचे आहे.
- आता परत मेनू वरती येऊन Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana link वरती क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज येईल तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून send otp वरती क्लिक करायचे आहे.
- यानंतर आधार कार्ड वरून मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP टाकून verify वरती क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर,पतीचे नाव, गावाचे नाव,तालुका,जिल्हा आणि बँकेचा IFSC नंबर इत्यादी माहिती टाकून सबमिट करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला विचारले जाईल तुमचा आधार कार्ड नंबर बँकेची लिंक आहे की नाही तिथे तुम्हाला yes वरती क्लिक करायचे आहे.
- अर्ज करण्याच्या आधी तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायचे आहे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला या दोन्हीपैकी एक अपलोड करा.
- यानंतर Do You Have An Orange Or Yellow Ration Card? यावर ती क्लिक करायचे आहे
- यानंतर शिधापत्रिकेचा पहिल्या पानाचा आणि शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करायचा आहे
- जर आपल्याकडे पिवळे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला देखील अपलोड करू शकता.
- यानंतर आम्ही पत्र आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करून Accpect हमीपत्र disclaimer पर्यावर क्लिक करून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कशाप्रकारे जमा होणार?
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना DBT मार्फत म्हणजेच direct benefit transfer द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.
मित्रांनो या योजनेसाठी1.5 कोटीपेक्षा जास्त फॉर्म जमा झालेले आहेत .राज्यातील काही महिलांना प्रथमच DBT मार्फत पैसे त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्याने त्यांना याची पूर्ण माहिती नाही.
याचप्रमाणे योजनेचे पैसे DBT मार्फत बँक खात्यात येण्यासाठी महिलेचे खाते NPCI ला लिंक असणे आवश्यक आहे .म्हणजेच आधार कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहे. ज्या महिलांचे बँक खाते IPCI लिंक आहे. त्यांनाच या योजनेचे पैसे 17 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
राज्यातील महिलांचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते असल्याने आपल्या आधार कार्ड नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे याची माहिती नसते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याची दिनांक
राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगस्ट 2024 रोजी 3000 रुपये डीबीटी मार्फत जमा केले जाणार आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर वितरित केले जाणार आहे.
Npci link to bank account
मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्या महिलांचे मंजूर झाले आहेत. त्यांना अजून एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. तरच त्यांच्या बँक खात्यामध्ये 17 तारखेला माझ्या लाडकी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जर तुम्ही हे काम केले नाही .तर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत.
त्यामुळे ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांना एक महत्त्वाचे काम करायचे आहे की ज्याद्वारे महिलांना या योजनेचे पैसे मिळवण्यास अडचण येणार नाही तर या माझी लाडकी बहीण योजनेचे कोणते काम महिलांना करावे लागणार आहे? त्याची प्रक्रिया काय असणार आहे? याची संपूर्ण माहितीसाठी हा लेख तुम्हाला वाचावा लागणार आहे.
तुमचे कोणते बँक खाते आधार कार्ड ला लिंक आहे हे अशाप्रकारे चेक करा
जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही हे घरी बसून देखील मोबाईलच्या मदतीने चेक करू शकता. याची माहिती खाली स्टेप बाय स्टेप दिलेली आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला https://uidai.gov.in/en/ या वेबसाईटवर जायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटणावरती क्लिक करायचे आहे.
- आता तुम्ही तिथे आधार नंबर टाकून कॅपचा कोड टाकायचा आहे.
- नंतर लॉगिन विथ ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून लॉगिन बटणावरती क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर ती तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटस या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुमची जी कोणतीही बँक एनपीसीआय म्हणजेच आधार कार्ड लिंक आहे त्याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन होईल.
त्यावरती अशी माहिती तुम्हाला मिळेल
त्यावर तुमचे आधार कार्ड चे शेवटचे चार अंक तुम्हाला दिसतील.
आधार कार्ड ला जी बँक लिंक आहे तिचे नाव दिसेल.
बँक सेंडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह दिसेल.
लास्ट अपडेट कधी केले होते ते दिसेल.
अशाप्रकारे तुमची जी बँक आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
आणि ज्या कोणत्याही महिलांचे खाते आधार कार्ड ला लिंक नाही त्यांना दोन दिवसात हे आधार कार्ड ला लिंक करावे लागणार आहे.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…