मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात राज्यभरातून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.या योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून पहिल्या 25 दिवसांमध्ये ८० लाखापेक्षा अधिक अर्ज सादर झाले होते .यामध्ये 30 ते 40 या वयोगटातील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर आले होते .यामध्ये विवाहित ,घटस्फोटीत ,अविवाहित महिलांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यामधून सर्वाधिक अर्ज जमा झाले आहेत .तर वाशिम जिल्ह्यामधून सर्वात कमी अर्ज या योजनेसाठी सादर झाली ची बातमी सांगितली जात आहे.
महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 1जुलै 2024 पासून सुरू झाली होती. योज योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी सुरुवात 15 जुलै 2024 पासून झाली होती. आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2024 आहे महिलांचा या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अर्ज भरण्यासाठी राज्यात सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. आपले सरकार देखील चालू आहे. आणि अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार?
या योजनेत सरकारने असे सांगितले होते की पात्र महिलेला महिन्याला 1500 रुपये तिच्या बँक खात्यावर जमा होणार आहे परंतु आता एक रुपया जमा होणार असा मेसेज व्हायरल झाला आहे.
याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी असे सांगितले आहे की ,महिला व बाल विकास मंत्रालयाकडे एक कोटी पेक्षा अधिक अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जमा झाले आहेत.पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंतची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी काही निवडक अर्जदाराच्या खात्यामध्ये हा एक रुपया जमा केला जाणार आहे. हा एक रुपया सन्माननिधी नसून तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे त्यांनी सांगितले आहे.
अशाप्रकारे हा एक रुपया फक्त तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे पात्र महिलेच्या खात्यावर सरकारने सांगितल्याप्रमाणे दीड हजार रुपये जमा होणार आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याची दिनांक
राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगस्ट 2024 रोजी 3000 रुपये डीबीटी मार्फत जमा केले जाणार आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर वितरित केले जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
घोषणा | एकनाथ शिंदे |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व महिला |
उद्देश | महिलांना आर्थिक मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे |
लाभ | महिलांना दर महिना दीड हजार रुपये मिळणार आहे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन आणि ऑनलाईन |
अर्ज करण्याची सुरुवात | 15 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 31 ऑगस्ट 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करून आत्मनिर्भर बनविण्याचे उद्देशाने 1 जुलै 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती.या योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या योजनेसाठी 15 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया देखील चालू केली होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांना इतर कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही .तसेच त्यांना स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने त्यांना माझी लाडकी बहीण योजनेद्वारे आर्थिक निधी दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मिळणारे लाभ
- राज्यातील महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे 1500 रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहे.
- त्याचबरोबर महिलांना तीन गॅस सिलेंडर दरवर्षी मोफत मिळणार आहे.
- लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
- या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही मोफत आहे त्यासाठी महिलेला कोणत्याही प्रकारची पैसे देण्याची गरज नाही.
माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता
- लाभार्थी महिला महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असावी.
- महिलेचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत नसावी.
- कुटुंबातील सदस्य पैकी कोणीही विधानसभा तसेच विधान परिषद व इतर कोणत्याही पदावर असू नये.
- लाभार्थ्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी.
- महिलेचे स्वतःचे बँक खाते असावे.
- महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती पेन्शन घेत नसावी.
- कुटुंबातील व्यक्ती किंवा संबंधित महिला सरकारी नोकरीत नसावी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- अधिवास किंवा जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- लग्नाचे प्रमाणपत्र
नारीशक्ती दूत ॲप काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर अर्ज जमा होत आहेत .राज्यातील अनेक सेतू केंद्र अंगणवाडी व आपले सरकार या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून नारीशक्ती दूत ॲप लॉन्च केले आहे.
या नारीशक्ती दूत ॲप द्वारे दररोज सात ते आठ लाख अर्ज सादर होत आहेत या ॲपचे 88 लाख डाउनलोड सुद्धा झालेले आहे या ॲप मधून दर मिनिटाला 800 अर्ज सादर होत आहे. या ॲपच्या साह्याने महिला घरबसल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते.
नारीशक्ती दूत ॲपच्या साह्याने अर्ज प्रक्रिया कशी करायची त्यासाठी हे पहा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती अशा प्रकारचे करा
अर्ज सबमिट झाला आहे की नाही हे कसे समजेल
अर्ज सबमिट केल्यानंतर “in pending to submitted”असा पर्याय दिसेल तर घाबरू नका तुमचा अर्ज नामंजूर झालेला नाही तर तुमचा अर्ज सबमिट झाला आहे आणि आता तो वरिष्ठ पातळीवर पडताळणीसाठी गेलेला आहे अर्ज मंजूर झाला की ना मंजूर झाला हे नंतरच्या काळामध्ये तुम्हाला कळविण्यात येईल.
अर्जाचे स्टेटस कसे चेक करावे?
अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी अर्ज भरल्यानंतर स्क्रीनवर उजव्या बाजूला “I”या बटणावरती क्लिक करा तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस ladki bahan Yojana status pending या बटनावर क्लिक करून चेक करता येतील
Free silai Machine Yojana 2024 how to apply online मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
SMS verification done
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला SMS verification done हा पर्याय दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी झाली आहे असे समजावे
अर्ज दुरुस्त करण्याची संधी
तुमचा अर्ज दुरुस्त करण्यासाठी “Edit”हा पर्याय तुम्हाला तेथे दिलेला आहे. त्यातून तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता आणि पुन्हा सबमिट करू शकता.
माझी लाडकी बहीण योजनेबाबत विचारलेले प्रश्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खात्यावर किती पैसे जमा होणार आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी पात्र महिलेच्या खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये एवढे रक्कम जमा करण्यात येणार आहे
माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता काय आहे?
लाभार्थी महिला महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असावी
महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
महिला किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत नसावी
महिला व तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी
महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य विधानसभा केव्हा विधानपरिषद व अन्य कोणत्याही पदावर अस्तित्वात नसावी
कुटुंबातील कोणीही आयकर भरत नसावे
महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असावे
संबंधित महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती पेन्शन घेत नसावी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा जमा होणार आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा होणार आहेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे किती पैसे जमा होणार आहेत?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे?
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.