माझा लाडका भाऊ योजना 2024|जॉब कार्ड,नोंदणी,अर्ज प्रक्रिया,लाभ,पात्रता,कागदपत्रे याची संपूर्ण माहिती CMYkPk

माझा लाडका भाऊ योजना 2024 : लाडकी बहीण योजने नंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे यालाच माझा लाडका भाऊ योजना असे देखील म्हणतात महाराष्ट्रात तरुणांच्या बेरोजगाराची प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकार तर्फे उचललेले हे एक महत्वपूर्ण पाऊल मानले जाते राज्यातील तरुण आपल्या शिक्षण पूर्ण करतो परंतु त्याला नोकरी मिळत नाही किंवा त्याला नोकरीसाठी जी आवश्यक कौशल्य पाहिजे ते त्याच्याकडे नसते याचा विचार करून ही योजना आखण्यात आणली आहे या योजनेमार्फत इच्छुक तरुणांना कंपनीमध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्यात येणार आहे त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे व याच दरम्यान त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार वेतन देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे जर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल आणि या योजनेची पात्रता लाभ नोंदणी कशी करायची ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत बघावा

Majhi ladaki bahin Yojana online apply| आता घरी बसून वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ठळक माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
उद्देश्य उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार क्षम बनविणे
आर्थिक तरतूद 5500 कोटी
अंमलबजावणी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य
लाभ राज्यातील बारावी आयटीआय पदविका पदवी पदव्युत्तर विद्यार्थी
अधिकृत वेबसाईटhttps://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
माझा लाडका भाऊ योजना 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांनी रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांना कामाचा अनुभव व कौशल्य देऊन रोजगारक्षम बनवून उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ पुरविले जाणार आहे हे प्रशिक्षण सहा महिने असणार आहे या कालावधीत सरकार द्वारा पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला सर्टिफिकेट दिले जाईल त्या आधारे विद्यार्थी कोणत्याही कंपनीत अथवा स्वयंरोजगार प्राप्त करू शकतो

PM Kisan samman nidhi 18th installment date! हे करा आणि खात्यावर ४००० रुपये जमा करून योजनेचा लाभ घ्या…

शिक्षणानुसार विद्यार्थ्यांना मिळणारी लाभ

12 वी आयटीआय /पदविका पदवी आणि पदव्युत्तर
६००० ८००० 10000

उद्देश्य

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे त्यांना रोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्याचा विकास करणे त्यांना रोजगारासाठी सक्षम बनविणे त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणाच्या कालावधीत आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे

पात्रता

  • उमेदवाराचे वय 18 ते 35 दरम्यान असावे
  • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पदविका पदवी पदवीत्तर असावी
  • शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस पात्र असणार नाही
  • उमेदवाराची आधार नोंदणी असावी
  • उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे
  • उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • वयाचे प्रमाणपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • बँक पासबुक

नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता | या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नोंदणी कशाप्रकारे करायची?

  • सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
  • तिथे आल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • नवीन नोकरी साधक यामध्ये तुमचे नाव मोबाईल नंबर जन्मतारीख लिंग आधार कार्ड नंबर कॅपच्या कोड टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे
  • तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो OTP टाकून कन्फर्म बटन क्लिक करा
  • आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे
  • त्यामध्ये आईचे नाव देश राज्य जिल्हा तालुका गाव मातृभाषा पिनकोड पत्ता राष्ट्रीयत्व धर्म व वैयक्तिक जात प्रवर्ग ही माहिती टाकायची आहे
  • त्यानंतर तुम्ही स्वयंरोजगारासाठी इच्छुक आहात का यामध्ये होय किंवा नाही सिलेक्ट करा
  • आता तुमची शैक्षणिक अहर्ता निवडून तुम्ही कोणत्या शाखेतून उत्तीर्ण झाला आहात ते निवडा तुमचे उत्तीर्ण वर्ष निवडून तुमची टक्केवारी किंवा ग्रेड टाकावे
  • आता खाली आल्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून एक पासवर्ड बनवून खाते तयार करा या बटनावरती क्लिक करा
  • अशाप्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल

Employment कार्ड कसे काढायचे?

  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावरती येऊन लॉगिन बटणावरती क्लिक करायचे आहे
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची माहिती दिसेल तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर संपादन करा या बटनावरती येऊन तुम्ही बदल करू शकता

त्यामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, extra particular मध्ये जाऊन तुम्ही केलेले कोर्स तेथे ऍड करू शकता.

इतर तपशीला मध्ये खालील माहिती भरायची आहे

कामाचा अनुभव:या पर्यायांमध्ये कुठे काम केले आहे काय किती वर्ष केले कोणत्या पोस्टला आहेत कधीपर्यंत काम केले कामचा अनुभव टाकायचा आहे

जॉब लोकेशन प्रेफर मध्ये तुम्ही कुठे काम करायचे आहे ते निवडा

इतर भाषा: तुमच्या भाषेचे ज्ञान सिलेक्ट करा

खाली आल्यानंतर तुम्ही कापड गिरणी कामगार आहात का तेथे होय किंवा नाही निवडा

दारिद्र रेषेखालील आहात का यामध्ये होय किंवा नाही निवडा

तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का यामध्ये होय किंवा नाही निवडा

तुम्ही भूकंपग्रस्त आहात का यामध्ये होय किंवा नाही निवडा

महाराष्ट्राचे रहिवासी आहात का यामध्ये होय किंवा नाही निवडा

शारीरिक विशेषता: अपंग असल्यास प्रकार निवडून अपंगाची टक्केवारी निवडावी

पार्श्वभूमीवर :तुम्ही माजी सैनिक आहात का होय किंवा नाही निवडा

तुम्ही खेळाडू आहात का होय किंवा नाही निवडा

बँक माहिती :बँकेचे नाव IFSC CODEअकाउंट नंबर ब्रांच नंबर ही माहिती भरून सुधारणा करा बटनावरती क्लिक करायचे आहे

आता वरती येऊन अपलोड प्रोफाइल इमेज वर तुमचा फोटो अपलोड करून घ्या त्याचबरोबर तुमचा रिझुम देखील अपलोड करा

आता डाव्या साईडला तुम्हाला माझी प्रोफाईल बटनावरती क्लिक करायचे आहे

त्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला generate receipt बटनावर क्लिक करा

तुमच्यासमोर employment card ओपन झालेले तुम्हाला दिसेल

आता हे कार्ड तुम्ही डाऊनलोड करून घ्या विविध योजनांमध्ये भाग घेण्यासाठी तसेच जॉब मिळावा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना यांसाठी हे कार्ड तुम्हाला उपयोगी पडणार आहे हे कार्ड एक वर्षासाठी वैद्य असते

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024!या तारखेला जमा होणार खात्यावर पैसे! Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024

माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची?

Job CMYkPk trening search यावर क्लिक करा
आणि नोकरी शोधा या बॉक्समध्ये तुमच्या आवडती नोकरी संबंधी माहिती टाकून सर्च वर क्लिक करा
आता तुमच्यासमोर महाराष्ट्रातील सर्व जाहिराती ओपन होतील त्यापैकी तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही अप्लाय या बटनावरती क्लिक करा
आणि टर्म्स अँड कंडिशन यांचा स्वीकार करून ओके बटणावर क्लिक करा अशाप्रकारे तुम्हाला जो जॉब आवडेल त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता

Job CMYkPk trening applyed stutus

तुम्ही ज्या कोणत्याही जॉब साठी अर्ज केले असतील त्यांची स्थिती तिथे दिसेल
तुम्ही जॉब साठी सिलेक्ट झाला तर तेथे status shortlisted असे दाखवेल
अशाप्रकारे तुम्ही माझा लाडका भाऊ योजना द्वारे जॉब मिळवू शकता