नमो शेतकरी योजना 4 था हप्ता तारीख 2024|शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये या तारखेला जमा होणार थेट बँक खात्यात पहा माहिती
नमो शेतकरी योजना 4 था हप्ता तारीख 2024: ज्याप्रमाणे केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबविते त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन देखील नमो शेतकरी योजना राबवत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम सन्माननिधी योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे ऐकून बारा हजार रुपये दरवर्षी मिळत असतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना भेटला आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही हा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष आहे तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर हा लेख काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे यामध्ये आम्ही नमो शेतकरी योजनेची पात्रता आवश्यक कागदपत्रे नोंदणी कशाप्रकारे करायची ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा तसेच चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार ही सर्व माहिती खाली दिली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.
नमो शेतकरी योजना महाराष्ट्र काय आहे?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येत असतात शासनाचा या मागचा मुख्य हेतू शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांचा खर्च कमी करणे व शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणे हा आहे
राज्य शासनाने आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले आहे आता शेतकरी चौथ्या हप्ता ची वाट पहात आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारतर्फे दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे तीन टप्प्यांमध्ये देण्यात येत असतात अशाप्रकारे एकूण सहा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना मिळतात. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत ऑनलाइन जमा केले जातात.

नमो शेतकरी योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | नमो शेतकरी योजना |
राज्य | महाराष्ट्र |
सुरुवात | 2023 |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व शेतकरी |
लाभ | वार्षिक सहा हजार रुपये |
उद्देश | शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ घडून आणणे |
अधिकृत वेबसाईट | https://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login |
नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठीची पात्रता
जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल व तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- शेतकरी हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- या योजनेसाठी पीएम किसान सन्माननिधी योजनेसाठी जय शेतकरी पात्र आहे त्यांनाच हा लाभ देण्यात येणार आहे.
- लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असावी
- लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी
- तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.
नमो शेतकरी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- जमिनीचे कागदपत्रे
- पीएम रजिस्ट्रेशन नंबर
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
नमो शेतकरी योजना 4 था हप्ता तारीख 2024
महाराष्ट्रातील सुमारे दीड कोटी शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेनुसार शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यावर DBT मार्फत ऑनलाईन पद्धतीने जमा केले जातात महाराष्ट्र शासन नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते.
नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे आता शेतकरी चौथे हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार आहे ते आपण पाहूया.
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना मिळणार आहे महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देखील याच दिवशी देण्यात येणार आहे
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 4 आणि 5 हप्ते एकत्रित जमा होणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चार आणि पाच हप्त्याचे एकत्रित 4000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ते जिल्हे खालील प्रमाणे आहेत.
नांदेड कोल्हापूर पालघर लातूर अहमदनगर धुळे हिंगोली अमरावती नागपूर वाशिम नवी मुंबई संभाजीनगर नंदुरबार बीड गोंदिया वर्धा जळगाव ठाणे, नाशिक परभणी रत्नागिरी अकोला बुलढाणा गडचिरोली सोलापूर सातारा सिंधुदुर्ग
नमो शेतकरी योजनेचे स्टेटस कशाप्रकारे चेक करायचे?
महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्या खात्यावरील नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची स्थिती खालील प्रमाणे चेक करू शकतात.
- महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्या खात्यावरील नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची स्थिती खालील प्रमाणे चेक करू शकतात.
- सर्वप्रथम लाभार्थ्याला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- तिथे आल्यानंतर लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- तुमच्यासमोर लॉगिन साठी एक पेज ओपन होईल तिथे मोबाईल नंबर आणि captcha code टाकायचा आहे
- त्यानंतर Get OTP हे बटन दाबायचे आहे.
- तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो OTP टाकून स्थिती दर्शवा हे बटन क्लिक करायचे आहे
- अशाप्रकारे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे स्टेटस तुमच्यासमोर ओपन होईल.
नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची?
राज्यातील जे शेतकरी पी एम किसान सन्माननिधी योजनेसाठी पात्र आहेत ते नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र असणार आहे.
परंतु जे शेतकरी नवीन नोंदणी करणार आहेत ते खालील प्रमाणे अर्ज प्रक्रिया करू शकतात.
- सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे.
- येथे आल्यानंतर न्यू Farmer registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
- 1) ग्रामीण 2) शहरी
- यापैकी तुमची शेती ज्या भागात आहे तो पर्याय निवडायचा आहे
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. राज्य निवडून captcha code टाकून Get OTP पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो OTP आणि captcha code टाकून Submit बटनावरती क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यावरती तुमची जमिनीची व इतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे
- ही आवश्यक माहिती भरून झाल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन यशस्वीपणे पूर्ण होईल.
- Registration status कशाप्रकारे चेक करायचे?
- सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- तिथे तुम्हाला farmer corner मध्ये stetus of self ragistration Farmer/Csc farmer या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर आधार कार्ड व captcha code टाकायचा आहे
- अशाप्रकारे तुमच्या समोर तुमच्या खात्याची स्थिती ओपन होईल.

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…