नमो शेतकरी योजना 2024! या तारखेला जमा होणार योजनेचा चौथा हप्ता

नमो शेतकरी योजना 2024:महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून हे आपले दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात परंतु या योजनेचा चौथा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर ती कधी जमा होणार आहे याकडे राज्यातील शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे

माझा लाडका भाऊ योजना 2024|जॉब कार्ड,नोंदणी,अर्ज प्रक्रिया,लाभ,पात्रता,कागदपत्रे याची संपूर्ण माहिती CMYkPk

तर यामध्ये या योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे आम्ही सांगणार आहोत. ही योजना काय आहे यादी कशाप्रकारे चेक करायची या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे नमो शेतकरी योजनेची नोंदणी कशी करायची नमो शेतकरी बेनीफिशर लिस्ट कशाप्रकारे चेक करायची नमो शेतकरी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत

नमो शेतकरी योजना काय आहे?

ज्याप्रमाणे केंद्रशासन पी एम किसान सन्माननिधी योजना शेतकऱ्यांसाठी राबवते त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासन नमो शेतकरी योजना ही राबवत आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 6 000व राज्य शासनाचे असे एकूण दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा होत असतात हे पैसे दर चार महिन्याला तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जात असतात

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|महाराष्ट्र सरकार देणार युवकांना व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज| पहा योजनेची संपूर्ण माहिती|

नमो शेतकरी योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावनमो शेतकरी महासन्माननिधी योजना
संबंधित राज्यमहाराष्ट्र
योजनेची घोषणामुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लाभार्थीराज्यातील सर्व शेतकरी
उद्देश्यशेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
लाभवार्षिक सहा हजार रुपये
योजनेची सुरुवात2023
अधिकृत वेबसाईटhttps://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login

Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना

पात्रता

  • शेतकरी हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • या योजनेसाठी पीएम किसान सन्माननिधी योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहे त्यांनाच हा लाभ देण्यात येणार आहे.
  • लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असावी.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी.
  • तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.
  • आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असावे.
  • पीएम किसानची ई केवायसी असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • जमिनीचा सातबारा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळण्याची दिनांक

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता विधानसभा निवडणुकीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येण्याची बातमी समोर येत आहे

विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू होणार आहे या आचारसंहिता लागू होण्याआधी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे

Sanjay Gandhi niraadhar Yojana 2024 Maharashtra lसंजय गांधी निराधार योजना| दर महिन्याला जमा होणार या तारखेला १५०० रुपये,पहा

नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची?

नमो शेतकरी योजनासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. PM किसान सम्मान निधी योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. पी एम किसान योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र असतात.जर तुम्ही PM किसान सम्मान निधी योजनासाठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ मिळेल।

नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी कशी चेक करायची?

  • नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • मुख्यपृष्ठाच्या वरच्या उजव्या बाजूला “लाभार्थी स्थिती” टॅब शोधा
  • “लाभार्थी स्थिती” टॅबवर क्लिक करा.
  • कॅप्चा कोडसह तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
  • तपशील प्रविष्ट केल्यानंतर “डेटा मिळवा” वर क्लिक करा.
  • नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल.
  • डाउनलोड बटणावर क्लिक करून तुम्ही नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी PDF देखील डाउनलोड करू शकता.

Pm Jan dhan Yojana 2024 प्रधानमंत्री जन धन योजना लाभार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये पहा कशाप्रकारे करायचा अर्ज

नमो शेतकरी योजनेची लाभार्थी स्थिती कशी चेक करायची?

  • नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट्सवर जा ( nsmny.mahait.org )
  • मुख्यपृष्ठावर, तुम्हाला लाभार्थी स्थिती टॅब दिसेल
  • लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.
  • तपशील भरा, जसे की मोबाइल नंबर किंवा नोंदणी क्रमांक, त्यानंतर कॅप्चा कोड.
  • तुम्ही तपशील भरल्यानंतर Get Mobile OTP वर क्लिक करा
  • पुढील पृष्ठावर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करणे आवश्यक असेल.
  • एकदा तुम्ही OTP एंटर केल्यावर चेक स्टेटस वर क्लिक करा.
  • तुम्ही तुमच्या स्क्रीनवर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची लाभार्थी स्थिती तपासू शकता.

नमो शेतकरी योजना 2024